Wednesday, May 13, 2020

शर्मिला टागोर: बहुआयामी आदाकारा

शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या  'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती. त्यांच्या योग्यतेनुसार सत्यजीत राय यांनी नंतर त्यांना 'देवी', 'नायक', 'अरण्येर दिन रात्रि' आणि 'सीमाबद्ध' चित्रपटांमध्ये घेतलं. करिअरच्या सुरवातीला शर्मिला यांना बंगाली चित्रपटांमध्ये संधी मिळाली. फिल्मकार तपन सिन्हा, अजय कार, आणि पार्थ चौधरी यांनी त्यांच्या चित्रपटात घेऊन त्यांच्या 'टॅलेंट' वापर करून घेतला, कारण सत्यजीत राय यांच्या दिग्दर्शिय स्पर्शाने त्या 'परीस' बनल्या होत्या.
शर्मिलाला बॉलिवूड मध्ये संधी देणारे फिल्मकार शक्ती सामंतदेखील बंगाली होते. त्यांनी 1964 मध्ये शर्मिलाला आपल्या 'काश्मीर की कली' चित्रपटात शम्मी कपूर सोबत पडद्यावर आणले. 'एन इवनिंग इन पॅरिस' मध्ये बिकनी घातल्याने प्रेक्षकांमध्ये सेन्सेशन निर्माण झाला आणि चित्रपट नियतकालिकांनी सेक्स-सिम्बॉल सारख्या आयकॉनने शर्मिलाचे हिंदी चित्रपट सृष्टीत स्वागत केले. शर्मिलाचे ग्लॅमर आणि गालांच्या खोल खळ्यांनी तिला हिंदी चित्रपट तारकांमध्ये एक वेगळी ओळख दिली. हा तो काळ होता, जेव्हा हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक नर्गिस, मीना कुमारी, निम्मी, मधुबाला, मालासिन्हा आणि सायरा बानो यांच्या बाहेरून येऊन नवे चेहरे शोधत होते. शर्मिलामध्ये जुन्या पिढीतील प्रतिभा आणि नव्या नायिकांची चपळता होती.
मुंबईचे वातावरण शर्मिलासाठी फायद्याचे ठरते. त्यांना शक्ती सामंत, ऋषिकेश मुखर्जी, गुलजार, बासू भट्टाचार्य आणि यश चोप्रासारख्या दिग्दर्शकांनी आणि शम्मी कपूर, शशी कपूर, धर्मेंद्र आणि पाहिले सुपर स्टार बनलेले राजेश खांनासारखे आदाकार मिळाले. नंतर शर्मिलाने काही चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबतही केले. सत्तरच्या दशकात राजेश खन्नासोबत शर्मिलाची जोडी खूपच जमली आणि गाजलीही. आराधना चित्रपटात किशोर कुमार यांच्या जादुभऱ्या आवाजातले 'मेरे सपनों की रानी कब आएगी..' ऐकून देशातला युवा वर्ग शर्मिलाचा दिवाना बनला. 'आराधना' नंतर शर्मिला आणि राजेश खन्ना या जोडीचा 'अमरप्रेम' आला. या चित्रपटाने दोघा कलाकारांना नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलं.
याच तऱ्हेने धर्मेंद्रसोबत ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'अनुपमा' आणि 'सत्यकाम' या दोन चित्रपटांनी शर्मिलाला गंभीर आणि उमदा आदाकाराच्या रुपात स्थापित केले. वडिलांच्या लाड आणि प्रेमाला मुकलेल्या अनुपमाला नायक धर्मेंद्र आपल्या शब्दांद्वारा सांत्वन करतो. नायिका आपल्या चुप्पीच्या माध्यमातून मनातल्या व्यथा डोळ्यांद्वारा प्रकट करते. 'सत्यकाम' स्वतंत्र भारताच्या स्वप्नांच्या तुटण्याची  प्रामाणिक  कथा आहे. शर्मिला आपल्या पतीच्या प्रत्येक पावलागणिक त्याला साथ देते. ऋषीदा यांचा 'चुपके चुपके' चित्रपट शेक्सपिअरच्या नाटकाच्या अंदाजाचा चित्रपट आहे.
गुलजार यांनी 'मौसम' चित्रपटात शर्मिलाच्या प्रतिभेचा चांगला वापर करून घेतला. कमलेश्वर यांच्या 'आगामी अतीत' या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटात संजीव कुमार यांच्या जीवनात पहिल्या प्रेमाची मुलगी अचानक येते, तेव्हा सगळी समीकरणे गडबडून जातात. 'नमकीन' चित्रपटात गुलजार यांनी एक आई आणि तीन मुली यांच्या माध्यमातून स्वीडिश फिल्मकार इंगमार बर्गमन यांच्या स्टाईलने महिला मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
बासू भट्टाचार्य यांचे तीन चित्रपट- अनुभव, आविष्कार आणि गृहप्रवेश म्हणजे विवाहाची एनाटॉमी, राजकारण आणि मानसशास्त्रचा शोध आहे. 'आविष्कार'मध्ये शर्मिला विवाह बंधन विखुरते तेव्हा साथसोबत राहणं बेनामी आहे, हे समजून घेण्यात यशस्वी होते. बंगाली चित्रपटाचे महानायक उत्तम कुमारसोबत शर्मिलाला 'अमानुष' आणि 'आनंद आश्रम' मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
आपल्या समकालीन नायिका वहिदा रहमान, रेखा आणि हेमामालिनी यांच्याशी तिची कसली स्पर्धाच राहिली नाही. ती अभिजात वर्गातून आली होती आणि  शालीनता तथा मर्यादा ती कायम ठेवण्यात यशस्वी झाली. कमी उंची असतानाही शर्मिलाचा अभिनय मात्र उंची गाठत राहिला. लग्नानंतर जवळजवळ तिने संन्यासच घेतला. नंतर 2010 मध्ये तिने चरित्र भूमिकांमध्ये पुन्हा पडद्यावर प्रवेश केला. विरुद्ध आणि एकलव्य मध्ये ती अमिताभ बच्चनसोबत आली. 'अंतहीन' या बंगाली चित्रपटात ती अपरणा सेनसोबत आली. एका अभिनेत्रीला ज्या तऱ्हेने बहुआयामी होऊन आपल्या भूमिकेला 'लार्जर देन लाईफ' बनवायला हवं, तसे अनेक गुण शर्मिलामध्ये आहेत.
शर्मिलाचे प्रमुख चित्रपट
1964-कश्मीर की कली, 1966-अनुपमा, देवर, सावन की घटा, 1967- एन इवनिंग इन पॅरिस, 1969- आराधना, सत्यकाम, तलाश, 1970- सफर 1971-अमर प्रेम, बंधन, छोटी बहु 1972- दास्तान 1973- आविष्कार, दाग, राजा जानी 1974- अमानुष 1975- खुशबू, चुपके चुपके, मौसम 1977- आनंद आश्रम 1980- गृहप्रवेश 1981- नसीब 1982- नमकीन 1983- दुसरी दुलहन 1985- न्यू दिल्ली टाइम्स 1991-मिसीसीप्पी मसाला 2000- धडकन 2005- विरुद्ध 2006- ज्वेलरी बॉक्स 2007- एकलव्य 2009- 8 x 10 तस्वीर, मॉर्निंग वोक

2 comments:

  1. खूप सुंदर अभिनेत्री, खूप छान चरित्रवर्णन

    ReplyDelete
  2. Born: 8 December 1944 (age 77 years), Kanpur

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...