Tuesday, May 12, 2020

द्व्यर्थी गाण्याला सुरुवात झाली 1947 साली

पी. एल. संतोषी
सिपाहिया (1949)
लताचा आवाज गंभीर गाण्यांसाठी सी. रामचंद्रांनी वापरला तो 1949 च्या सिपाहिया चित्रपटाद्वारा. या चित्रपटात लता-चितळकर यांनी एक गीत गायले होते. 'ऐ आँख तुम न रोना, रोना तो उम्र भर है...' हे गीत ऐकतानाच सी. रामचंद्र यांच्या संगीतातील फेरफार जाणवतात. सी. रामचंद्र (चितळकर) यांचा आवाज अशा गाण्यांसाठी अनुरूप नव्हता, तरीही लतासह त्यांनी गंभीरपणे पार्श्वगायन केले. पुढे त्यांच्या संगीतात हे गांभीर्य बऱ्याचदा दिसले. 'सिपाहिया' मध्ये लताने गायलेले 'हँसी हँसी न रही और खुशी खुशी न रही' तसेच दर्द जागा के ठेस लगा के चल गये वो' या दोन गाण्यात हे गांभीर्य जाणवल्यावाचून राहात नाही.
याशिवाय लताने 'भरोसा न कर दौलत पर ' सोलो गीत गायले होते. आणि 'ऐ आँख तुम न रोना, रोना तो उम्र भर है...' तसेच लगा है कुछ निशाना...' ही दोन गीते चितळकरांबरोबर गायली. गीता दत्त आणि कोरससह लताने ' चली घुंघट में गुलैया छुपाकर...' हे गीतही गायले.
तरीही या चित्रपटात रामचंद्र यांची उडती गीते बिलकुल नव्हती,असे नाही. 'मेरे सिपाहिया हमारी गली...', 'तुम्हे देखा जब से एक नजर...', 'सब पे नाम हमेशा तेरा...' सारखी दोन तीन हळवी गीते या चित्रपटात होती.
नमुना (1949)
द्व्यर्थी शब्दांच्या गाण्यांनी जी धूम माजवलीय त्याचा प्रारंभ दादा कोंडकेंनी केला असे अनेकजण म्हणतात, परंतु द्व्यर्थी गाण्यांचा प्रारंभ 1949 साली प्रदर्शित झालेल्या नमुना चित्रपटाद्वारा झाला. या गाण्याचे गीतकार पी.एल. संतोषी होते. साहजिकच संगीतकार सी.रामचंद्र होते. या गाण्याचे शब्द होते,' चढती जवानी में झुलो झुलो मेरी रानी...',' हिंडोला जाये उपर हिंडोला जाये नीचे रानी तुम जरा धीरे धीरे डोलना कही टूट न जाये पलना...' तसे पाहायला गेले तर नमुना मध्ये प्रथमच द्व्यर्थी गीते होती म्हणायचे कारण नाही. कारण संगीतकार-गीतकार द्वयीने केलेल्या 1947 च्या शहनाई चित्रपटात अशी गीते होती. शहनाई मध्ये 'गाडी पे गाडी चड जायेगी टांगे से टांगे लड जायेगी' आणि ' आना मेरी जान संडे के संडे...' ही गीते होती. या गाण्यांवर तेव्हाच्या रुढीप्रिय लोकांनी कडाडून विरोध दर्शविला होता. नमुना चित्रपटातील 'टमटम से झान्को ना रानीजी...' हे गाणे शमशाद बेगमने गायले होते. त्यात रामचंद्र यांची हळवी तर्ज होती. असेच एक शमशाद बेगमचे एक सोलो गीत होते. 'जिया धडक धडक आना बलम मोरे आना...,' 'दो घरों के आग में हजारो जल गये...' आणि 'रोकने से भी कभी दिल रुकता है... ही दोन गीते शमशाद बेगमने कोरससह गायली होती. परंतु सर्वात अधिक लोकप्रियता 'टमटम से ना झान्को ...' गाण्याला मिळाली.
या चित्रपटात हिरोच्या वाट्याला मुश्किलीने अर्धे गीत आले होते. 'तडपा के अब मुझे छोड दिया...' हे गीत रफी आणि लताने गायले होते. या चित्रपटात ' मुझको सजा ये दे के किसी के गुनाह की' आणि जुलुम तुम्हारे सहन सके एक ठेस लगी...' ही दोन हळवी गीते लताने या चित्रपटात गायली आहेत.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...