बॉलिवूडच्या चित्रपटात आयटम नंबर नसेल तर चित्रपट आपल्यापैकी अनेकांना बेरंग वाटतो. ठेका धरायला लावणार्या गाण्यांचे शौकिन आपल्यामध्ये अनेकजण असतात. त्याचबरोबर चित्रपटांची प्रसिद्धी देखील या आयटम नंबरमुळेच होते त्यामुळे प्रत्येक निर्मात्याला आपल्या चित्रपटात एक तरी आयटम नंबर ठेवावाच लागतो. त्यांचा असा विश्वास असतो, की आपला चित्रपट या आयटम नंबरमुळे हिट होऊ शकतो. पण तुम्हाला माहित आहे का या आयटम नंबरवर थिरकणार्या अभिनेत्री यासाठी किती मानधन घेतात. तर आम्ही आज तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण हे एक नाव घेतले जाते. नुकत्याच रिलीज झालेल्या छप्पाकमुळे चर्चेत आलेल्या दीपिकाने सध्या आपले लक्ष फक्त आणि फक्त अभिनयावर केंद्रीत केल्यामुळे फार कमी वेळा ती आयटम नंबरवर थिरकताना दिसली आहे. पण ती एक उत्तम डान्सर असल्याचे आपल्याला माहितच आहे. २0११ साली अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला 'दम मारो दम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तिचा या चित्रपटातील आयटम नंबर चांगलाच लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील टायटल साँगमध्ये दीपिका आयटम गर्लच्या रुपात दिसून आली होती. तिने या आयटम नंबरसाठी १.५ कोटी रुपये मानधन घेतले होते.
सलमान खानच्या 'दबंग २' मध्ये अभिनेत्री करिना कपूर खानने देखील एका आयटम नंबर डान्स केला होता. या चित्रपटातील 'फेव्हिकॉल से' या गाण्यावर ती थिरकली होती. करिनाने या गाण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.
बॉलीवूडची चिकनी चमेली अर्थात कॅटरिना कैफ ही देखील बर्याच आयटम नंबर थिरकली आहेत. त्यात मुख्य उल्लेख करायचा झाला तर ऋतिक रोशनच्या 'अग्निपथ' चित्रपटातील 'चिकनी चमेली' या गाण्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्याचबरोबर तिचे 'तीस मार खाँ'मधील 'शिला की जवानी' हे आयटम साँग देखील कमालीचे लोकप्रिय झाले होते. पण जेवढी ओळख चिकनी चमेलीमुळे मिळाली तेवढी शिला की जवानीमुळे नाही मिळाली. 'चिकनी चमेली'मध्ये कॅटरिनाने जबरदस्त डान्स केल्यामुळे तिला काही चाहत्यांनी तिचे चिकनी चमेली असे नामकरण देखील केले होते. कॅटरिनाने या गाण्यासाठी ३.५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे वृत्त आहे.
बॉलिवूडसह हॉलिवूडला आपल्या अभिनयाची भूरळ घालणारी देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राला आपण खूप कमी वेळी आयटम नंबर करताना पाहिले आहे. पण तिने संजय लीला भन्साळींच्या 'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटातील आयटम नंबरचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. तिने या गाण्यात तिच्या नृत्याने आणि चेहर्यावरील हावभावाने आपल्या चाहत्यांना घायाळ केले होते. प्रियंकाने 'राम चाहे लीला' या आयटम नंबरवर थिरकली होती. तिने या गाण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये मानधन घेतले होते.
पॉर्न सिनेसृष्टीला राम राम ठोकून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओन. याच सनीचे आजच्या घडीला असंख्य चाहते आहेत. तिच्या आयटम नंबरला देखील तिच्या चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळतो. आयटम नंबरसाठी अनेक चित्रपट निर्मात्यांचीदेखील पहिली पसंती सनीलाच असते. सनीने शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटात 'लैला मैं लैला' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. तिने या गाण्यासाठी तीन कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जाते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
No comments:
Post a Comment