Saturday, May 16, 2020

सुनील दत्त आणि त्यांची सुमधूर गाणी

सुनील दत्त एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि राजकारणी होते.  त्यांचा जन्म अविभाजित पंजाबच्या झेलम जिल्ह्यात 6 जून 1929 रोजी झाला होता.  त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात झाले.  त्यांनी रेडिओ सिलोनमध्ये उद्घोषक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.  रेडिओ सिलोन हे दक्षिण आशियातील सर्वात जुने रेडिओ स्टेशन आहे.  उद्घोषक म्हणून दत्त साहेब खूप लोकप्रिय झाले. त्यांना अभिनयात खूप रस होता. आणि या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटविला.
1955 मध्ये तयार केलेला त्यांचा पहिला चित्रपट रेल्वे प्लॅटफॉर्म' होता.  1957 मध्ये बनलेला 'मदर इंडिया' हा चित्रपट खूप गाजला होता.  या चित्रपटाने त्यांना बॉलिवूड स्टार बनविले.  त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि बर्‍याच चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले.
2003 साली 'मुन्ना भाई एमबीबीएस' हा अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता.  या चित्रपटात त्यांनी स्वत: च्या मुलाच्या म्हणजे  संजय दत्तच्या वडिलांची भूमिका साकारली होती.  त्यांना पद्मश्रींसह अनेक सन्मानाने गौरविण्यात आले.  2005 मध्ये त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. आपण याठिकाणी त्यांच्या गाण्यांबाबत चर्चा करणार आहोत. त्यांच्या गाण्यांनी त्यांची कारकीर्द घडवायला हातभार लावला आहे.  ते कदाचित राजेश खन्नासारखे म्युझिकल होरो म्हणून नावाजले गेले नसतील, राजकपूर, मनोजकुमार या चित्रपटकर्ते, कलाकारांसारखी  गाण्याची फारशी चांगली  जाण नसेल, पण सुनील दत्त ज्या काळात  'स्टार' म्हणून सर्वाना परिचित झाले त्या काळात एकाहून एक सुंदर
गाणी मला नक्की तयार झाली. साहजिकच त्यांच्या वाट्यालाही सुंदर गाणी आली. त्याना मिळालेली गाणी आजही लोकांच्या मनात ताजी आहेत.
त्यांना वैविध्यपूर्ण गाणी सकारायाला मिळाली. त्या काळात काही कलाकार ठराविक संगीतकारांशी संबंधित होते. सुनील दत्त यांनी मात्र वेगवेगळया संगीतकारांबरोबर काम केलं. त्यांच्या गाण्यांच्या यशाचं हे सर्वात महत्वाचं कारण आहे.  त्या काळात  गीतकार, संगीतकार गाण्यांवर प्रचंड मेहनत घ्यायचे. सुनील दत्त यांनी रवी आणि  लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्यासोबत बरीच  गाणी केली. पण त्याव्यतिरिक्त कल्याणजी- आनंदजी, एस.डी. बर्मन, शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन, मदनमोहन, सलील चौधरी, चित्रगुप्त, गुलाम मोहमद, उषा खन्ना, बप्पी लाहिरी आणि जयदेव अशा विविध संगीतकारांबरोबर काम केलं. त्यांच्या करिअरचा हा वैविध्यपूर्ण आलेख पाहणे क्रमप्राप्त आहे.
मुकेश आणि महेंद्र कपूर यांच्या तुलनेत मोहम्मद रफीने त्यांची बरीच गाणी गायली. पण 50,60 व 70  च्या दशकात रफीने निर्माण केलेलं वर्चस्व  पाहता हे सहजिक होतं. याशिवाय किशोर कुमार, हेमंत कुमार, तलत मेहमूद यांनीही सुनील दत्तसाठी गाणी गायिली, पण दुर्दैवाने मन्ना डे यांनी त्यांच्यासाठी गायलेलं एकही  गाणं संस्मरणीय ठरलं नाही, 'ज्वाला' मध्ये मन्ना डेने शंकर जयकिशनच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांच्यासाठी गानी गायली होती.
दत्त  यांच्या 'अजंठा आर्टस ग्रुपने  सीमा भागामध्ये जवानांचे मनोधैर्य वाढवायला अनेक कार्यक्रम केले. या कार्यक्रमांमध्ये आघाडीचे गायक, संगीतकार सहभगी होत असत. दत्त यांच्या कारकीर्दीत पाच वर्षामध्ये तीन महत्वाचे टप्पे आले. त्यातील पहिला होता, रवी यांनी संगीतबद्ध केलेला १९६३ सालचा 'गुमराह'. नंतर १९६७ मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं 'मीलन (१९६७) मध्ये हमराज. रवी- साहिर यांचे महेंद्र कपूर यांनी गायलेलं 'चलो इक बार फिरसे...' हे गुमराह मधील गाणं विसरणं कधीतरी शक्य आहे का? मीलनमधील 'सावन का महिना.... (आनंद बक्षी)  या गाण्याने तर सगळे विक्रम मोडले. या गाण्याच्या बळावरच लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची दत्त यांनी स्वतःच्या 'डाकू और जवान' चित्रपटासाठी निवड केली.
नशीबही मजेदार खेळ खेळत असतं. ज्या दिवशी लक्ष्मीकांत गेले त्या दिवशी म्हणजे २५ मे रोजी दत्तसाहेबही गेले. आज ते दोघेही दूर कुठेतरी 'हम तुम युग युग से ये गीत मीलन के... ' म्हणत जुन्या आठवणींना  उजळा देत असतील. याच चित्रपटातील ''रख दी है बीच सडक मैं ने...' हे गाणही लोकप्रिय झाले. या माणसाचा माणुसकीवर खूप विश्वास होता. त्या माणुसकीचं इत्तरांना अनेकदा दर्शनहीं घडलं. 'डाकू और जवान' हा चित्रपट पडला. 'हमराज' मधील 'तुम अगर साथ देने का वादा करो..' आणि 'किसी पत्थर की मूरत को...' ही गाणी गाजली आणि त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळाली. ती साहिर- महेंद्र कपूर ही त्रयी त्यावेळी मोठं नाव कमावत होती.
'ना मुंह छुपा के जिओ... हे गाणं म्हणताना सुनील दत्तला झालेल्या ट्रासाबद्दल सागताना महेंद्र कपूर खूप रंगून जायचे. त्या सांगण्यामध्ये थोडा तक्रारीचा सूर असायचा, तलत मेहमूदचे' जलते है जिसके लिए...' (सुजाता), 'ओ निंद ना मुसको आए...' हे हेमंत कुमारचं गाणं, ही दोन्ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी साकारलेल्या 'पडोसन' मधील भोलाची गाणीही विसरता येणार नाहीत. लीप सिचिंगचा प्रत्यक्ष अनुभव प्रेक्षकांच्या कधी विस्मरणात जाणार नाही.  'मेरे सामने वाली खिडकी में 'आणि 'एक चतुर नार...' या गाण्यांनी वाहवा मिळवली. किशोरच्या आवाजातील वैविध्यताही दाद देण्यासारखी आहे. 'कहना है कहना है आज तुमसे ये पहली बार...' हेसुद्धा याच चित्रपटातील गाणं होतं. यानंतर 'जख्मि' (१९७५) चित्रपटातील 'आयी रे आयी रे होली...' हे गाणं त्याच वैविध्याचा एक नमुना होतं. याचे संगीत दिग्दर्शन बप्पी  लाहिरी यांनी केलं होतं.
'इन हवाओं में, इन फिजाओं में...' हे गुमराहमधील,
'बोल गोरी बोल...' हे मिलनमधील गाणं दत्त यांच्या
कारकीदींचा महत्त्वाचा हिस्सा म्हणून लक्षात राहतं.
त्यानंतर कल्याणजी-आनंदजी, इंदीवर यांच्या 'चाहे आज मुझे नापसंद करो....', ' तू जो नहीं कोई मेरा....' या गाण्यांनीही सुनील दत्तचा अभिनय अधोरेखित केला. 'ये हवा ये फिजा.... ', 'आप आए तो खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया...' ही गाणीही त्याच्या मागोमाग रांगेत उभी राहतात, सुनील दत्त यांचं 'छोड़ो करा की बाते' हे देशभक्तीपर गीत विसरणं अशक्य आहे. 'मेरा साया', 'रजत', 'चिराग या तीन चित्रपटांमध्ये
सुनील दत्त यांना खूप सुंदर गाण्यांवर काम करायची संधी मिळाली. 'आपके पहलू में आकर रो दिए...', रंग और नूर की बारात किसे पेश करू...', ' तेरी आँखों के सिवा दुनिया में ...'या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं हेलावली. रवी यांच्या 'कोई मुझसे पुछे तुम मेरे क्या हो.... 'यह खामोशिया...' ही गाणीही हिट ठरली. 'यह रास्ते है प्यार
के' मधील 'जान-ए-जहाँ पास आओ...' हे गाणही गाजलं.
त्यांच्या चित्रपटातील 'रात भी है कुछ भिगी-भिगी...', '
"एक मिठी सी चुभन...', 'चंदा मैं चाँदनी....', 'अब
कोई गुलशन ना उजडे अब वतन आझाद है...' ही गाणी
यादीत नक्कीच घेण्यासारखी आहेत. रवी याचं 'इतनी
हसीं इतनी जवां रात क्या करे...' 'ये वादियों ये फिजाएं
बुला रही है तुम्हें...' ही 'आज और कल'मधील गाणी,
त्यानंतर रफीचे 'जिंदगी के सफर में... '(नर्तकी) हे गाणं
केवळ अप्रतिमच...
त्यांच्या पहिल्या चित्रपटातील 'रेल्वे प्लेटफॉर्म'मधील
'देख तेरे संसार की हालत...' हे गाणं खूपच विनोदी होतं. त्या विनोदानेच हे गाणे हिट केलं. 'मदर इंडिया' मधील 'ना में भगवान हूँ, ना मैं शैतान 'हे एग्री यंग मॅनचे गाण चित्रपटाप्रमाणेच खूप गाजतं. 'चांद सा मुखडा क्यू
शरमाया...' हे मधूबालाबरोबरचं गाणं 'जाग उठा इन्सान' या चित्रपटातील आहे.  'तुम मुझे भूल भी जाओ...' हे मुकेशनं गायलेलं गाणं हृदयस्पर्शी होतं.
'झूला', 'छाया', 'उसने कहा था या चित्रपटांमध्येही
सुनील दत्तने आपला वेगळा ठसा उमटवला. 'आग पानी में लगी...', 'इतना ना मुझसे तू प्यार जता...', 'आँखों में
मस्ती शराब की...', 'आंसु समझ के क्यूँ मुझे..... ', 'आजा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए...'अशी एकाहून एक सुरेल गाणी त्यांच्या वाट्याला आली. राजेंद्र किशन यांनी लिहिलेलं 'कोई बता दे दिल है कहां... ','मतवारी नार ठुमक ठुमक चली जाए...' ही गाणीही गाजली. शंकर-जयकिशन यांच 'एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों...' हे गाणं एव्हरग्रीन आहे. 'राधिके तुने बंसरी चुराई...' है निमशास्त्रीय गीतही खूप मधुर होते. सुनील दत्त यांना मिळालेली ही गाणी त्यांनी आपल्या अभिनयाने अधिक सजवली. त्यांच्या कारकीर्दीतील वेगवेगळ्या गाण्यांनी प्रेक्षक सुखावले.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...