बॉलिवूडचं 'सावन का महिना' आणि 'पाऊस' यांच्याशी खास असं मधुर नातं आहे. चित्रपट निर्माणकर्त्यांनी पडद्यावर श्रावणछटा, पावसाची रिमझिम आणि पावसात मनसोक्त भिजणाऱ्या नायक-नायिका यांचं लोभस चित्रण अनेकदा रेखाटलं आहे. ढगांचा कडकडाट, विजेचा चमचमाट आणि टपकणारे पावसाचे थेंब जेव्हा संगीताच्या साथीनं पडद्यावर खेळू लागतात तेव्हा चित्रपटगृहात सीटवर बसलेला प्रेक्षक ते पाहताना तन-मनानं त्यात सामील होतो. श्रावण आणि पाऊस याविषयी गाण्यांचा सिलसिला चित्रपटांमध्ये सुरुवातीपासूनच चालू आहे. रोमान्स असो अथवा वियोग, शरारत असो अथवा रूसवा-फुगवा या संवेदना चित्रपटांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खुबीने पडद्यावर साकारली आहे.
गीतकार आणि संगीतकारांनीही आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून सिनेसृष्टीला पाऊस गीतांची बरसात केली. त्यात कित्येक मधुर आणि चिरकाल स्मरणात राहातील अशी गाणी आहेत. आजसुध्दा ही गाणी ऐकली की डोळ्यांसमोर पडद्यावरील रिमझिम पावसाचं दृश्य उभं राहातं. १९४९ मध्ये आलेल्या 'बरसात' चित्रपटातील 'बरसात में तुम से मिले' पासून पडद्यावर पावसाचा जो फवारा सुरू झाला दो परवा प्रदर्शित झालेल्या 'रावण'मधील 'घनघोर घटा'पर्यंत सुरूच आहे. हिंदी सिनेसृष्टीतील 'शोमन' राज कपूर यांचा 'श्री ४२०' हा बहुचर्चित चित्रपट तुम्हाला आठवत असणारच. यात राज कपूर आणि नर्गिस पावसात एका छत्रीखाली मुंबईतल्या रस्त्यावर 'प्यार हुआ इकरार हुआ' गात भिजत जाताना दिसतात. 'छलिया'मध्ये राज कपूर एका अल्लड तरुणासारखं 'डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा' म्हणत जातो तेव्हा भोवतालचं वातावरण पावसाळ्यासारखं भारून जातं. पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गाणे सुंदरतेने चित्रित करण्याचे कसब राज कपूरला चांगलेच साधले होते.
'बरसात की रात'मधील 'जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात' या गाण्यात भारत भूषण आपल्या प्रेमा'च्या भेटीची आठवण रूमानी अंदाजात व्यक्त करतो. 'दो आँखें बारह हाथ'मधील 'घुमड घुमड कर आयी रे घटा' असो अथवा 'रोटी, कपडा और मकान'मधलं 'हाय हाय ये मजबुरी' असो आपल्याला ही गाणी मदहोश करून टाकतात. 'जुर्माना'मध्ये लता मंगेशकर मधुरगोड आवाजात 'सावन के झुले पडे, तुम चले आओ' असे आळवतात तेव्हा आपलं मन त्या गाण्याच्या दिशेनं आपोआप खेचलं जातं. 'मिलन'मध्ये सुनील दत्त नूतनबरोबर जेव्हा 'सावन का महिना, पवन
करे शोर' गातो तेव्हा मनातला मोर नाचायला उठतो, 'तर पड गए झुले सावन रूत आयी रे' (बहु बेगम) असं लता गातात तेव्हा मन गावाकडं पोहोचतं. जिथं झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर ललना झोका घेत गाताना दिसू लागतात. चित्रपटातील पावसाची चर्चा होत असताना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांची नावे निघणार नाही, असं होऊच शकणार नाही. त्यांच्या कित्येक चित्रपटात पावसाची दृश्यं आहेत. 'नमकहलाल'मधील अमिताभ आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित केलेल्या 'आज रपट जाए तो' या गाण्याने त्यावेळी धुमाकूळ घातला होता. 'बादल यूं गरजता है' हे सनी देवल आणि अमृता सिंह यांचं 'बेताब'मधील गीत संगीत आणि स्पेशल इफेक्टसमुळे दीर्घकाळ लक्षात राहिले. 'सावन' या नावावर तर अनेक चित्रपट निघालेत. १९४९ मध्ये निघालेल्या 'सावन' हिट ठरला होता; नंतर 'सावन आया रे, सावन भादो, सावन की घटा, आया सावन झुमके, सावन को आने दो, प्यासा सावन' २००६ मध्ये आलेला सलमान खानचा 'सावन-द लव्ह सिझन' आदी चित्रपट त्यात आहेत. 'अबके सजन सावन में (चुपके चुपके), 'तुम्हें गीतो में ढालुंगा सा बन को आने दो' (सावन को आने दो), 'रिमझिम गिरे सावन' (मंजिल), 'सावन के झुने ने' (निगाहे), 'सावन का महिना आया है (आयी मिलन की बेला) सारखी अनेक गाणीही गाजली. 'ओ सजना बरखा बहार आयी, रिम झिम गिरे सावन, इक लडकी भिगी भागोसी, जिंदगीभर नहीं भुलेगी यह बरसात की रात, मेघा रे मेघारे' यांसारख्या पावसाळी गाण्यांनी चंदेरी पडदा भिजला होता. अलीकडच्या काळात 'ताल से ताल मिला' (ताल), 'मेरे ख्वाबो में जो आये' (दिलवाले दुल्हा नया ले जायेंगे), 'किसी के हाथ ना आएसी ये लडकी' (चालबाज), 'लगी आज सावन की फिर वो झाडी' (चांदनी),'ऑन द रूफ, इन द रेन' (मस्ती), 'जो हाल दिल का इधर रा हो रहा है' (गुलाम), 'तु ही रे' (बॉम्बे), 'घनन घनन गिर आई बरखा' (लगान), 'भागेरे मन कहीं' (चमेली), 'देखो जरा देखो र जरा बरखा की झडी' (ये दिल्लगी), 'ओ सावन राजा कहाँ से आये तुम' (दिल तो पागल है), 'रिमझिम रिमझिम' (१९४२ एलव्ह स्टोरी), 'टिपटिप बरसा पानी' (मोहरा),'बरसात का बहाना अच्छा है '(प्लॅटफॉर्म) यांसारख्या पाऊस गाण्यांनी रसिकांना रिझवले.
या शिवाय 'सावन बरसे तरसे दिल' (दहक), 'सावन में लग गई आग' (वुडस्टॉक विला), 'बरसो रे मेघा' (गुरू), 'लग जा गले' (दे दना दन) आणि 'जुबी डुबी' (३ इडियट्स), मैं बारीश का मौसम हूं... (एक खान),'तेरे संग यारा' (रुस्तुम), हम तेरे बिन रह नहीं सकते (आशिकी2) सारखी पावसात भिजवण गरी कित्येक गाणी आहेत, की ती मॉडर्न स्टाईल आणि वेस्टर्न म्युझिकने सजली माहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:
Post a Comment