घोगऱ्या आवाजाची, सावळ्या रंगाची, विशेष उंची नसलेली, साधारण देहयष्टीची राणी मुखर्जी 1992 मध्ये चित्रपट सृष्टीत अवतरली. वडील राम मुखर्जी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका. त्यामुळे राणी लहानपणापासूनच चित्रपटाच्या वातावरणात वाढलेली.
तिला चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. तिच्या खडतर मेहनतीने आणि सहज अभिनयाच्या मदतीने तिने काही काळ आपलं स्वतःच स्थान निर्माण केलं होतं. तिचा पहिला चित्रपट 'राजा की आएगी बारात' सपशेल आपटला. पण तिच्या कामाचं कौतुक झालं. राणीच्या कारकिर्दीतला पहिला लोकप्रिय चित्रपट म्हणजे 'गुलाम' (1998) या चित्रपटातील 'आती क्या खंडाला' हे गाणं जबरदस्त हिट ठरलं. यामुळे राणी 'खंडाला गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली.
तिच्या कारकिर्दीतील लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे 'कुछ कुछ होता है'. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं ,पण कुठल्याच चित्रपटाला म्हणावं असं यश मिळालं नाही. 'हॅलो ब्रदर', 'बादल', 'बिच्छू', 'हर दिल जो प्यार करेगा', 'चोरी चोरी छुपके छुपके', 'हद कर दी आपने', 'कहीं प्यार ना हो जाये', 'बस इतनासा ख्वाब है', 'प्यार दिवाना होता है', 'मुझसे दोस्ती करोगे' असे अनेक चित्रपट राणीने केले. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्याबरोबर'हे राम' आणि अनिलकपूर बरोबर 'कलकत्ता मेल' या चित्रपटातून वेगळा मार्ग पत्करला,पण तिचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही.
2002 मध्ये आलेल्या 'साथीया' हा चित्रपट गाजला. तिला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मनिरत्नम यांच्या 'युवा' चित्रपटासाठी तिला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'हम तुम', 'वीर झारा', 'चलते चलते', 'बंटी और बबली' आणि 'ब्लॅक' हे काही तिचे गाजलेले चित्रपट. 'ब्लॅक' मध्ये तिने आंधळ्या-बहिऱ्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटातून तिच्याकडे अभिनयाचे अंग असल्याचे लक्षात आले. या काळात ती अभिनेत्री म्हणून अधिक प्रगल्भ झाली होती. त्यानंतर तिने तारा रम पम', 'कभी अलविदा ना कहना' यासारखे लोकप्रिय चित्रपट केले. 'पहेली' चित्रपटातून समांतर सिनेमाकडे वळत एक वेगळा प्रयोग तिनं केला. तिच्यासारख्या सक्षम आणि प्रगल्भ अभिनेत्रीला डोळ्यांसमोर ठेवून भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या. 'बाबुल' आणि 'लागा चुनरी में दाग' या चित्रपटातून ज्वलंत विषय हाताळण्यात आला होता. हिंदी चित्रपट सृष्टी त होणारे बदल जाणणारी आणि ते स्वीकारणारी अभिनेत्री आहे ती. 'नो वन किल्ड जेसीका' या चित्रपटातील राणीचा दमदार अभिनय आजही लक्षात राहतो. 'तलाश', 'अय्या' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना यश मिळालं नसलं तरी तिची भूमिका चांगली होती. या काळात चित्रपटाचं यश हे शंभर कोटीच्या गल्ल्यावर अवलंबून राहिलं. 'मर्दानी' नावाचा चित्रपट तिच्या दबंग आवाजाने काही अंशी लक्षात राहतो. याच काळात तिने यशराज फिल्म्सच्या सर्वेसर्वा असलेल्या आदित्य चोप्रा याच्याशी लग्न करून संसारात रममाण झाली. 21 एप्रिल 2014 मध्ये तिने आदित्यशी इटलीत लग्न केलं. तीन वर्षानंतर तिने 'हिचकी' चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. 'टॉरेट सिंड्रोम' या आजार असलेल्या नैना माथूरची व्यक्तिरेखा साकारली. मात्र तिची काहीतरी वेगळं करण्याची सततधडपड दिसून येते.
'आयुष्यात यशाने जास्त भारावून जाऊ नये आणि अपयशाने खचू नये.यश-अपयश आपल्या आयुष्याचा एक भाग असणार आहे. याचा विचार करून वाटचाल करत राहा. यश मिळत राहील.' हा राणीचा आपल्याला संदेश आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
No comments:
Post a Comment