राज कपूर आणि नर्गिस यांनी एकत्र 16 चित्रपटांत काम केले. त्या काळातल्या या चित्रपटांच्या चर्चेपेक्षा या दोघांचं 'अफेअर' प्रकरण खूपच चर्चेत होतं. राज कपूर आणि नर्गिसच्या पहिल्या भेटीची कहाणीही खूप रंजक आहे. त्या काळात राज कपूर आपल्या चित्रपटासाठी स्टुडिओ शोधत होता. त्याला माहिती मिळाली की नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये शूटिंग करत आहे.
राज कपूरला त्या स्टुडिओमध्ये कोणत्या सुविधा आहेत हे जाणून घ्यायचे होते. जद्दनबाईला भेटायला तो तिच्या घरी पोहोचला आणि बेल वाजवली. त्यावेळी जद्दनबाई घरी नव्हती. नर्गिसने दरवाजा उघडला. ती स्वयंपाकघरातून धावत आली दरवाज्यात आली होती. घरात ती पकोडे तळत होती. यावेळी,तिच्या गालावर बेसनपीठ लागले होते. राज कपूर यांना नर्गिसचा तो मासूम चेहरा आवडला. बीबीसीच्या वृत्तानुसार, राज कपूर 1948 मध्ये नरगिसला पहिल्यांदा भेटला तेव्हा ती 20 वर्षांची होती आणि तोपर्यंत तिने 8 चित्रपटांमध्ये काम केले होते.
त्यावेळी राज कपूर 22 वर्षांचा होता आणि तोपर्यंत त्याला एकही चित्रपट करण्याची संधी चित्रपट करण्याची संधी मिळाली नव्हती. दोघांमधील संभाषण सुरू झाले आणि नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण घरचे अजिबात तयार नव्हते. नर्गिसची आई जद्दनबाई या दोघांनीही हे नाते अजिबात आवडले नव्हते. तसेच राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूरसुद्धा यासाठी तयार नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, राज कपूरबरोबर तिच्या लग्नासाठी नरगिसने तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांचीही मदत मागितली.
राज कपूर परिपूर्णतेसाठी प्रसिद्ध होते. एखाद्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एखादे दृश्य त्याला आवडले नाही तर त्यासाठी बरीच रीटेक घ्यायला लावत. त्यामुळे राज कपूरच्या मनाप्रमाणे दृश्य व्हावे,यासाठी सर्वांकडून सर्व ते प्रयत्न होत. अशीच एक घटना आवारा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली आहे.
एका चित्रपटाचे संपूर्ण बजेट 12 लाख रुपये ठेवले गेले होते, परंतु राज कपूर परफेक्टनिष्ट म्हणून प्रसिद्ध होता,हे आपल्याला माहीत आहेच.त्याने फक्त एका गाणे शूट करण्यासाठी तब्बल 8 लाख रुपये खर्च केले. साहजिकच चित्रपट बजेटच्या पलीकडे गेला. त्यानंतर नरगिस राज कपूरच्या मदतीसाठी पुढे आली आणि तिने आपले दागिने विकून त्याला मदत केली. चित्रपट हिट करण्यासाठी तिने बिकिनीही परिधान केली.
पण नंतर मात्र या दोघांमध्ये हळूहळू दरी निर्माण होऊ लागली. नात्याला तडे जाऊ लागले. याची अनेक कारणे सांगितली जातात. या दोघांच्या विभक्तीचे कारण नरगिसचा भाऊ अख्तर हुसेन यालाही जबाबदार धरले गेले. एका रिपोर्ट्सनुसार अख्तर हुसेन याचे म्हणणे होते की, राज कपूर सतत हिरोवर लक्ष केंद्रित करणारे चित्रपट बनवत असून त्यामुळे नरगिसकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याने नरगिसला आपली फी वाढवण्यासही सांगितले होते. दरम्यान, 1954 मध्ये हे दोघे मॉस्कोला गेले. त्या दोघांमध्ये तिथे कशावरून तरी वाद झाला आणि नर्गिस एकटीच भारतात परतली.
हळूहळू या दोघांमधील गैरसमज वाढू लागले. दरम्यान, नरगिसने 1977 मध्ये मेहबूब खान यांचा 'मदर इंडिया' हा चित्रपट साइन केला. या सिनेमात तिच्या विरुद्ध सुनील दत्त होता. चित्रपटाचे शूटिंग चालू होते. दरम्यान, एके दिवशी सेटला आग लागली. असं म्हणतात की सुनील दत्तने आपला जीव धोक्यात घालून नरगिसचा जीव वाचवला. यानंतर दोघेही भावनिकदृष्ट्या जवळ आले आणि वर्षभरातच त्यांनी लग्न केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
No comments:
Post a Comment