Wednesday, May 13, 2020

ललिता पवार यांना मिळाला अनोखा पुरस्कार; तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्या हस्ते दिला गेला पुरस्कार

जेव्हा जेव्हा सामाजिक चित्रपटांमध्ये भांडण करणार्‍या सासू-सासऱ्याच्या भूमिकांचा विचार केला जातो तेव्हा ललिता पवार यांचे नाव पहिल्यांदा लक्षात येते. हिंदी चित्रपटात चांगल्या-वाईटावर विजय मिळवण्याच्या कथा चांगल्याच पसंत केल्या जातात. जेव्हा जेव्हा ललिता पवार यांनी विशाल हृदयाच्या महिलांच्या भूमिका निभावल्या, तेव्हा त्या चांगल्याच पसंद केल्या गेल्या.   त्याचे उदाहरणच झाले तर  'अनारी' (1959) आणि 'आनंद' (1970 ) सारख्या चित्रपटांचे देता येईल. दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी श्रीमती डीसा नावाच्या एक सभ्य स्त्रीची भूमिका साकारली आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून  प्रतिसाद दिला.
अतुलनीय अभिनयाच्या आधारे ललिता पवार यांनी इतके पुरस्कार जिंकले की त्यांना ठेवण्यासाठी त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये जागा कमी पडली. पण या पुरस्कारांमध्ये एक विशेष पुरस्कार होता, कारण त्यावेळेला चित्रपटसृष्टीमध्ये पुरस्कार देण्याचा ट्रेंड नव्हता, तेव्हा त्यांना हा पुरस्कार मिळाला.  चित्रपटाला यश मिळाल्यावर निर्मात्यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता.
 ही घटना 1948 ची आहे.  1942 मध्ये 'जंगे आझादी' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अभिनेता भगवान यांच्या हाताची जोरदार थप्पड अभिनेत्री ललिता पवार यांच्या डाव्या गालावर पडली,तेव्हा  त्यांचा तो भाग लकवाग्रस्त बनला.  अडीच वर्षे त्यांना कोणताही चित्रपट मिळालेला नव्हता.  ज्या चित्रपटांवर त्या काम करत होत्या, त्या चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट संपले आणि त्यांच्या जागी इतर अभिनेत्रींना घेतले गेले.  ही घटना एखाद्या अभिनेत्रीला ग्लॅमर जगतातील करिअर संपवण्यासाठी पुरेशी होती.  ललिता पवार यांची नायिका कारकीर्दही या घटनेनंतर संपली.  पण ललिता पवार यांनी हार मानली नाही आणि चरित्र भूमिका करायला सुरुवात केली.  1948 मध्ये ती एकाचवेळी दोन चित्रपट करत होती.  त्यापैकी एक म्हणजे व्ही शांतारामचा 'दहेज' चित्रपट! या चित्रपटामध्ये त्या हुंड्याच्या लालची सासूची भूमिका साकारत होती, जी तिच्या सुनेवर अत्याचार करते.  दुसरा चित्रपट होता 'आईना पिक्चर्स' चा :गृहस्थी'. या चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी आणि सर्वांना सोबत घेणारी उदार आई बनल्या होत्या.  एकाच वेळी दोन पूर्णपणे विरुद्ध भूमिका साकारत होत्या.
     'गृहस्थी' मध्ये सुलोचना चटर्जी, श्यामा, कुलदीप कौर आणि त्यांचा जिवलग मित्र प्राण यांनी अभिनय केला होता.  याचे दिग्दर्शन एस.एम. युसूफ यांनी केले होते.   युसुफ अभिनेता होते,पण 1936 मध्ये त्यांनी 'भारत का लाल' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांचा भारतीय परंपरेवर आणि कुटूंबावर विश्वास होता आणि त्यावर आधारित ते सामाजिक चित्रपट बनवत होते.  त्यांनी निगार सुलताना या अभिनेत्रीशी लग्न केले आणि 1960 मध्ये ते पाकिस्तानमध्ये निघून गेले.  'गृहस्थी' प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतला. त्याची गाणी चांगली गाजली.  या चित्रपटाने डायमंड ज्युबिली साजरी केली.  खूश होऊन निर्मात्यांनी चित्रपटाच्या धंद्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून  प्रेक्षकांसाठी स्पर्धादेखील ठेवली होती.
       ही एक प्रकारची अनोखी स्पर्धा होती.  चित्रपटात उत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकाराला मत देण्याची स्पर्धा होती. ‘गृहस्थी’ साठी दर्शकांचे मत घेतले गेले.  प्रेक्षकांनी हा चित्रपट बघून मतदान केले.  परोपकारी आई म्हणून ललिता पवार यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. आणि ती सर्व कलाकारांमधून निवडली गेली होती.  ललिता पवार अशा प्रकारे विजेता ठरल्या.  बक्षीस म्हणून, त्याला पाच-सुवर्ण पदक देण्यात आले, पदकं म्हणजे  प्रत्यक्षात सुवर्ण तारका होत्या.
      त्यानंतर एक समारंभ पार पडला, त्यात ललिता पवार यांचा सन्मान करण्यात आला.  तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान असलेले बाळासाहेब गंगाधर खेर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले.  1937 मध्ये ते मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान झाले.  1946 ते 1952 पर्यंत खेर दुसऱयांदा पंतप्रधान होते.  ललिता पवार यांना  बाळासाहेबांच्या हस्ते सुवर्ण तारका देण्यात आल्या. ललिता पवार यांच्यासाठी हा पुरस्कार कायमच हृदयाजवळचा  राहिला आहे.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...