(ए.पी.करंदीकर,व्ही.पी.दिवेकर आणि एस.एन.पाटणकर ) |
भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना मानले गेले. पण त्यांच्याच समांतर किंवा त्यांच्याच मागे-पुढे आणखी दोघेजण फिल्मकार प्रवर्तनाकारी प्रयत्नाला लागले होते. या तिघांच्या कार्यस्वरूपात एक सुक्ष्म अंतर होते. हे सूक्ष्म अंतरामुळे दादासाहेब फाळके यांना खास श्रेय देण्यात आले. बाकीच्या दोघा फिल्मकारांचा मात्र मामुली उल्लेख करून त्यांना बाजूला सारण्यात आलं. ही दोन माणसं विसरली गेली. ते दोघे आहेत, रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे आणि श्रीनाथ पाटणकर. इथे आपल्याला या दोघांविषयी चर्चा करायची आहे.
दादासाहेब तोरणे हे ते फिल्मकार आहे, ज्यांनी 'पुंडलिक' नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटाला भारतातला पहिला चित्रपट मानावा की नाही ,यावर वाद होऊ शकतो. हा वाद अनेक कारणांनी आहे. पण वास्तव हे की, पुंडलिक हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाच्या आधी एक वर्ष प्रदर्शित झाला होता. पुंडलिक हा चित्रपट 18 में 1912 रोजी प्रदर्शित झाला होता तर 'राजा हरिश्चंद्र' 3 में 1913 ला प्रदर्शित झाला होता.
'पुंडलिक' आणि दादासाहेब तोरणे यांची कथा अशा प्रकारे आहे- दादासाहेब ग्रीव्हज कॉटन इलेक्ट्रॉनिकल कंपनीमध्ये लिपिक म्हणून काम करत होते. पण त्यांच्या कलात्मक रुचिमुळे ते फिल्मकार बनले. तोरणे यांचे एक मित्र होते, नाटककार रामराव बाळकृष्ण कीर्तिकर. यांनीच लिहिलेलं नाटक होतं,'पुंडलिक'. ज्यावेळेला तोरणे यांनी 'पुंडलिक' नाटक पाहिले तेव्हा या नाटकाचे रूपांतर चित्रपटात करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. तोरणे यांनी ही आयडिया आपल्या मित्रांसमोर बोलून दाखवली. पण नानाभाई गोविंद चित्रे , जे 'एडवोटेक ऑफ इंडिया' या सायं दैनिकाशी जुडले गेलेले होते. तसेच पुरुषोत्तम राजाराम टिपणीस, जे थिएटरचे मॅनेंजर होते. यांनाच ही आयडिया आवडली. पण यांच्याजवळ जी कमतरता होती ती पैशांची आणि सिनेमा माध्यमाच्या तंत्रज्ञानाच्या माहितीची!
यांना कळलं की, बोर्न एन्ड शेफर्ड कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये एक चित्रपट कॅमेरा असाच पडून आहे. अनेकदा पत्रव्यवहार आणि बैठका झाल्यानंतर विलीयमसन कॅमेरा एक हजार रुपयांना तोरणे ग्रुपने खरेदी केला. शिवाय त्याचबरोबर चारशे फूट लांबीचा फिल्म रोलदेखील मिळवला.पण तोरणे किंवा त्यांच्या मित्रांपैकी कुणालाच चित्रपट कॅमेरा चालवता येत नव्हता. पण त्या कंपनीचा एक कर्मचारी जॉन्सन याने त्यांना आपण सेवा देऊ असा प्रस्ताव ठेवला. तोरणे आणि त्यांच्या साथीदारांनी 'पुंडलिक' नाटकाच्या शौकीन कलाकारांनाच आपल्या 'पुंडलिक' चित्रपटामध्ये भूमिका दिल्या.नाटककार कीर्तिकर यांनी त्यांचे मित्र नाडकर्णी यांच्या मदतीने 'पुंडलिक' नाटकाला संक्षिप्त रूप दिले. तोरणे यांनी याच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. बहुतांश शूटिंग मुंबईतील लेमिंगटन रोडवरील एका मैदानात केलं. काही शुटिंग त्रिभुवन दास रोड तथा विठ्ठलाभाई पटेल रोड या भागात केलं. चित्रपट तंत्रज्ञान प्रक्रियेसाठी विदेशात पाठवण्यात आला. शेवटी 'पुंडलिक' हा चित्रपट मुंबईच्या गोरेगाव स्थित कोरोनेशन सिनेमागृहात 18 मे 1912 रोजी प्रदर्शित करण्यात आला.
तोरणे भारताचा पहिला बोलका चित्रपट ' आलमआरा' साठीही कशाप्रकारे प्रेरणादायी ठरले, याची कथाही रंजक आहे. 'आलम आरा' चा पहिला बोलका चित्रपट म्हणून श्रेय मिळवणं हा एक योगायोग आहे. त्यावेळी प्रभावशाली आणि स्रोतांनी परिपूर्ण असलेले मदान भारत भारताचा पहिला बोलका चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात होते. परंतु आर्देशिर इराणी यांनी 'आलमआरा' ची सुरुवात केलेली पाहून मदान यांनी माघार घेतली. वास्तविक 'आलमआरा' बनवण्याचे असे खास काही कारण नव्हते. पण त्यांच्या कंपनीचा जनरल मॅनेजर दादासाहेब तोरणे यांनी त्याला यासाठी फिल्म बनवण्यासाठीची जोखीम उचलण्यासाठी उकसवले होते. झालं होतं असं की, तोरणे यांनी काही दिवसांपूर्वीच ' ऑडिओ कमेक्स रिकॉर्डिंग मशीन' च्या विक्रीची एजन्सी घेतली होती. इराणी यांनी तोरणे यांचा सल्ला मानला आणि आलमआरा बनवण्याच्या कामाला लागले.
या घटनेच्या सहा महिन्यानंतर प्रभात फिल्म कंपनीने पुन्हा तोरणे आणि त्यांच्या ऑडिओ कमेक्स रिकॉर्डिंग माशीनारीची मदत मागितली. यावेळेचे प्रकरण पहिला मराठी चित्रपट बनवण्याचे होते. वास्तविक स्वतः तोरणे यांनी 'श्याम सुंदर' नावाचा पहिला मराठी चित्रपट बनवण्याचा इरादा पक्का केला होता. भालजी पेंढारकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. तोरणे यांनी आणखी काही कंपन्यांना त्यांच्या बोलक्या चित्रपटासाठी मदत केली. या कंपन्यांमध्ये प्रभाताशिवाय रंजीत फिल्म कंपनीसुद्धा होती. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की बोलक्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तोरणे यांचे सहाय्य मोलाचे आहे. महत्त्वाचे आहे. बोलपटाच्या युगात स्वतः तोरणे यांनीही काही रुचकर, रंजक चित्रपट बनवले आहेत.
आणखी एक फिल्मकार आहेत, ज्यांनी दादासाहेब फाळके यांच्या अगोदर भारतीय चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. हे होते श्रीनाथ पाटणकर. यांच्यासोबत दोन प्रकारची बदकिस्मती आपला परिणाम सोडून गेली. पाहिलं म्हणजे दादासाहेब फाळके यांना प्रसिद्धी मिळाली, पण ते भाग्यही पाटणकरांच्या वाट्याला आले नाही. दुसरी बदकिस्मती पाटणकर यांच्या फिल्म निर्माणशी संबंधित आहे.
श्रीनाथ पाटणकर यांचे आणखी दोन साथीदार होते. अनंतराम परशुराम करंदीकर आणि व्ही. पी. दिवेकर. भारतातील पाहिले (लघु) फिल्मकार सावे दादा यांनी 1907 मध्ये ज्यावेळेला आपला कॅमेरा मातीमोल किंमतीला म्हणजेच सातशे रुपयांना विकला होता, तो पाटणकर त्रिकुटाने खरेदी केला होता. सावे दादा यांनी हा कॅमेरा मातीमोल किंमतीला विकला कारण त्यांच्या लहान भावाचे निधन झाल्यानंतर त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी चित्रपट निर्मितीतून आपले अंग काढून घेतले. श्रीनाथ पाटणकर गिरगाव येथील कोरोनेशन सिनेमागृहाचे प्रबंधक होते. करंदीकर तथा दिवेकर यांच्या नव्या चित्रपटाचे प्रदर्शन करताना सिनेमागृह सुसज्ज करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. यामुळे देश-विदेशातील चित्रपटांच्या अधिक जवळ पोहचू शकली. देशी चित्रपटांमध्ये सावे दादा आणि हिरालाल सेन यांच्या चित्रपटांचाही समावेश होता. कॅमेरा मिळवल्यानंतर पहिल्यांदा या त्रिकुटांनी छोटी छोटी फिल्म्स ची निर्मिती केली. या चित्रपटांमध्ये 1911 मध्ये बनवलेल्या 'इंपेरियल दरबार' या चित्रपटाचाही समावेश आहे.
ज्यावेळेला या त्रिकुटाने सिनेमा क्षेत्रातील आपल्या पाच वर्षांच्या अनुभवाचा आत्मविश्वास मिळवला ,त्यावेळेला त्यांनी आपला मूळ उद्देश म्हणजे चित्रपट निर्मिती च्या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. वास्तविक त्यांचा मूळ उद्देश लघुपट बनवण्याचा नव्हताच, त्यांना चित्रपट बनवायचे होते. या दरम्यान या त्रिकुटाने आणखी दोघांना वित्तीय भागीदार म्हणून आपल्यात सामावून घेतले. रानडे आणि भातखंडे अशी त्यांची नावे आहेत. अशा प्रकारे पाटणकर युनियन ची स्थापना झाली.
पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी 'सावित्री' ची पौराणिक कथा निवडली. सावित्रीच्या भूमिकेसाठी अहमदाबादच्या नर्मदा मांडे नावाची मुलगी निश्चित करण्यात आली. स्वतः दिवेकर वैश्य ऋषीची भूमिका साकार करणार होते. तर जयमुनीची भूमिका लोकप्रिय रंगमंच कलाकार के.जी. गोखले करणार होते.
1912 च्या में महिन्यात जवळपास एक हजार फूट लांबीचा चित्रपट शूट करण्यात आला. चित्रपट निर्मितीबरोबरच पाटणकर या चित्रपटाचे दिग्दर्शकही होते. त्यांना शंका आली की चित्रपटात काही तांत्रिक दोष राहिले आहेत. चित्रपट तांत्रिक प्रक्रियेतून निघाल्यानंतरही काही समस्या उभ्या राहिल्याच. परिणाम असा झाला की, पूर्ण चित्रपट कोराच निघाला. शूटिंग वाया गेले. पाटणकरांचे हे दुसरे दुर्दैव. बदकिस्मती यालाच म्हणतात. दादासाहेब तोरणे यांच्या प्रमाणेच पाटणकर देखील पहिल्या भारतीय चित्रपटाचे प्रवर्तक म्हणून अपयशी ठरले. इथे एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे. त्यांच्या सुरुवात करण्याच्या एका आठवड्यानंतर दादासाहेब तोरणे यांचा 'पुंडलिक' प्रदर्शित झाला होता. पण कमीत कमी असे तर झाले असते की दादासाहेब फाळके यांच्यानंतर पाटणकर यांचे तरी नाव घेतलं गेलं असतं. शेवटी फाळकेच भारतीय चित्रपटाचे उदगाते म्हणून पुढे आले. नर्मदा मांडे यांची भारतीय चित्रपटाची पहिली महिला कलाकार म्हणून इतिहासात नोंद झाली असती, पण तेही भाग्य त्यांच्या वाट्याला आले नाही.
पाटणकर यांनी ओळखलं होतं की, आपल्यावर दोन दादासाहेबांनी मात केली आहे. पण त्यांनी हिंमत हरली नाही. त्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपट बनवले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन आणि अभिनेता असे पाटणकर यांनी मौलिक काम केले आहे. त्यांनी पहिला ऐतिहासिक चित्रपट बनवला. खरे तर तो काळ पौराणिक चित्रपटांचा होता. पौराणिक विषय फिल्मकारांना शाश्वती देऊन जात होता, पण पाटणकर यांनी मुद्दाम ऐतिहासिक विषय निवडले. कारण त्यांना वेगळं काही करायचं होतं. दादासाहेब फाळके यांनी पौराणिक विषय निवडले होते.
पाटणकर यांनी आपल्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी मराठा हा विषय निवडला. विषय होता, नारायणराव पेशव्यांची हत्या. पण चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले,'नारायणराव पेशवा की मौत'. हा चित्रपट पुण्यातील आर्य सिनेमागृहात 1915 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट लोकेशनवर चित्रित करण्यात आला होता. पण प्रकाश रिफ्लेकटरचा वापर करण्यात न आल्याने चित्रपट थोडासा अंधुक दिसत होता. पाटणकर यांच्याकडे पहिला धारावाहिक चित्रपट बनवण्याचे श्रेय जाते. चित्रपटाचा विषय होता भगवान राम यांचा वनवास. जवळपास सहा तास चालणारा 20 हजार फूट लांबीचा आणि चार भागात बनलेला 'राम वनवास' हा चित्रपट एक महिन्यापेक्षा अधिक काळ प्रदर्शित केला गेला. पाहण्यासाठी चार तिकिटांचे एक कूपन दिले जायचे.
No comments:
Post a Comment