मुकेश यांनी आपल्या करिअरमध्ये प्रत्येक रंगाची,ढंगाची गाणी गायली, पण दर्दभऱ्या गीतांनी त्यांना सामान्य लोकांचा गायक बनविले. 1945 ते 1976 पर्यंतच्या त्यांच्या लोकप्रिय गीतांची इथे आपण चर्चा करणार आहोत.
1940
या काळात दुसऱ्या फिल्मी कलाकारांप्रमाणे मुकेश यांनीदेखील आपल्या करिअरची सुरुवात गायक- नायक रूपाने केली. आपल्या सुरुवातीच्या तीन चित्रपटांमध्ये ते नलिनी जयवंत आणि सितारा देवीसारख्या नायिकांचे नायक बनले. पण 1945 मध्ये आलेल्या 'पहली नजर' चित्रपटातील 'दिल जलता है तो जलने दे'या गाण्याने मुकेश यांना गायक म्हणून पॉप्युलर केले. नंतर 'मेला' (गाए जा गीत मिलन के) , आग (जिंदा हूं इस तरह) , 'अंदाज' (तू कहे अगर झूम झूम के नाचो आज) आणि 'बरसात' (पतली कमर है तिरछी नजर है, छोड गए बालम) सारख्या चित्रपटांमधल्या मुकेश ने गायलेल्या गाण्यांनी धूमधडाका केला. ही गाणी खूपच गाजली.
1950
साल 1951 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'आवारा' चित्रपटाच्या टायटल सॉंग ने म्हणजेच 'आवारा हूं' या गाण्याने जबरदस्त यश मिळवले आणि मुकेश राज कपूरचा आवाज बनले. याच काळात मुकेश यांनी पुन्हा एकदा अभिनयात नशीब आजमावले. 'माशुका' (1953) चित्रपटात सुरैयाचे ते हिरो बनले. त्याच बरोबर 1956 मध्ये उषा किरण सोबत आलेल्या 'अनुराग' ची निर्मितीदेखील त्यांनी केली. पण यश मात्र त्यांना प्ले ब्लॅक सिंगिंगमध्येच मिळाली. 'श्री 420' (मेरा जुता है जपानी..., रमैया वस्तावैया), 'मधुमती' (सुहाना सफर और ये मौसम हसीं), 'रानी रुपमती' (आ लौट के आजा मेरे मीत) आणि 'अनाडी' (किसी की मुस्कुराहटो पे हो निसार) सारख्या चित्रपट/ गाण्यांच्या माध्यमातून मुकेश यांच्या यशाचा सिलसिला बुलंदीवर पोहचला.
1960
या दशकात मुकेशने एका बाजूला मनोज कुमार (मैं तो एक ख्वाब हूं , दिवानों से यह मत पुछो) आणि सुनील दत्त (सावन का महिना) सारख्या नव्या काळातल्या नायकांसाठी गायन सुरू केले. तर दुसऱ्या बाजूला राज कपूरसोबत ' जिस देश में गंगा बहती है' (होठो पे सच्चाई रहती है) आणि 'संगम' (दोस्त दोस्त ना रहा) सारख्या चित्रपटांबरोबर त्यांचा आवाज शिखरावर पोहचला. शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, आणि सलील चौधरीसारख्या संगीतकारांनी मुकेश च्या आवाजाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेतला.
1970
'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे' (पूरब और पश्चिम) आणि 'मैं ना भुलून्गा' (रोटी, कपडा और मकान)सारख्या दिलकश नगमांसोबत सत्तर च्या दशकातदेखील मुकेश च्या आवाजाचा जादू खूप चालला. 'रजनीगंधा' चित्रपटातील 'कई बार युं भी देखा है' या गाण्यांसाठी 1976 मध्ये त्यांना नॅशनल अवार्डने सन्मानीत करण्यात आले. त्याच वर्षी त्यांचे खास दोस्त राज कपूर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटासाठी त्यांचे अखेरचे गीत 'चंचल शीतल निर्मल कोमल' गायले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 'कभी कभी' या चित्रपटातील 'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ' हे गाणे तमाम देशवासीयांच्या हृदयाला स्पर्श करून गेले. मुकेश यांच्या हृदयाची स्फन्दने एका कन्सर्ट दरम्यान याच ओळी गाताना कायमची थांबली.

No comments:
Post a Comment