हिंदी चित्रपटसृष्टी व गुजराती रंगभूमी वरील एक मोठे नाव म्हणजे परेश रावल. आपल्या दमदार अभिनयाने गेल्या तीन दशकांपासून या माणसाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. परेश रावल यांना बॉलिवूड मध्ये म्हणून ओळखले जाते. रावल यांनी चित्रपट, रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे. परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथे गेले. ते दहा -अकरा वर्षाचे असताना कुतूहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले, तेथूनच
त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली. त्या सोबतच परेश रावल यांचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न होते. २२ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधू लागले आणि सिव्हील इंजिनिअरींगमध्ये करीयर करण्यासाठी संघर्ष करु लागले.
त्याच दरम्यान हौस म्हणून त्यांचा रंगभूमीशी संबंध होताच. त्यांचा अभिनय पाहून अनेकांनी त्यांना चित्रपटातून काम करण्याविषयी सुचविले. याच जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्याचे ठरवले. त्यांची सिनेसृष्टीतील वाटचाल सुरु झाली १९८४ साली 'होली' या चित्रपटाने. या चित्रपटात
आमीर खानदेखील होता. या चित्रपटानंतर परेश रावल यांना' हिफाजत', 'दुश्मन का दुश्मन', 'लोरी और भगवानदादा' हे चित्रपट मिळाले, पण त्यांना यश गवसले नव्हते.
१९८६ मध्ये परेश रावल यांना राजेंद्रकुमार यांची निर्मिती असलेल्या 'नाम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. संजय दत्त आणि कुमार गौरव नायक असलेल्या या चित्रपटात परेश रावल खलनायक म्हणून उभे राहिले. बॉक्स ऑफिसवर चित्रपट हिट ठरला आणि खलनायक म्हणून परेश रावल यांच्या करिअरची गाडी यशोशिखरावर पोहचली. नाम चित्रपट गाजल्यानंतर परेश रावल यांना चांगल्या चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या, त्यात 'मरते दम तक', 'सोने पे के खिलाडी', 'राम लखन', 'कब्जा', 'इज्जत' या बिग बजेट चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांच्या यशानंतर परेश रावल यांना सुप्रसिध्द खलनायक म्हणून प्रेक्षक ओळखू लागले. १९९३ हे वर्ष परेश रावल यांच्या चित्रपटसृष्टीतील सोनेरी वर्ष ठरले. यावर्षी त्यांच्या दामिनी, आदमी और मुकाबला हे दोन चित्रपट सुपरहिट झाले. सर या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेअर मिळाले. 'वो छोकरी' या चित्रपटातील अभिनयाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना
सन्मानीत करण्यात आले. १९९४ मध्ये परेश रावल यांच्या चित्रपट करिअरमधील महत्वाचा चित्रपट 'सरदार' त्यांना मिळाला. केतन मेहता दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेला रुपेरी पडद्यावर जिवंत केले. या चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळाली. १९९७ मधील 'तमन्ना' हा चित्रपट परेश रावल यांच्या जीवनातील टर्निंग पॉईट ठरला. या चित्रपटात त्यांनी समाजाच्या विरोधात जावून अनाथ मुलीला सांभाळणा- तृतीयपंथीयाची भूमिका केली. हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला नसला तरी यातील त्यांच्या अभिनयाची एक वेगळी छटा प्रेक्षक व समीक्षकांच्या पसंतीस पडली.
यानंतर २००० मध्ये आलेल्या 'हेराफेरी' या चित्रपटाने खलनायक म्हणून परेश रावल यांची छबीच पुसून टाकली. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात परेश रावल यांनी उभा केलेला बाबूराव गणपतराव आपटे हा घरमालक प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात स्थान मिळवून गेला. यातील परेश रावल, अक्षयकुमार आणि सुनील शेट्टी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना तुफान हसवले.
या चित्रपटाचे यश पाहून त्याचा सिक्वेल २००६ ला 'फिर हेराफेरी' म्हणून आला. या चित्रपटाच्या यशानंर खलनायक ही छबी पुसली जावून हास्य कलाकार म्हणून परेश रावल यांना प्रेक्षक ओळखू लागला. यानंतर आलेल्या बर्याचच चित्रपटात त्यांनी हास्य अभिनेत्याच्याच भूमिका केल्या. यात 'आवारा पागल दिवाना', 'हंगामा', "फंटूश', 'गरम मसाला', 'दिवाने हुये पागल', 'मालामाल विकली', 'भागमभाग', 'वेलकम', 'अतिथी तुम कब जाओगे', 'ओ माय गॉड' हे चित्रपट गाजले. परेश रावल यांना आतापर्यंत तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. १९९३ मध्ये 'सर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक, २००० मध्ये फिर हेराफेरी आणि २००२ मध्ये आवारा पागल दिवाना या चित्रपटाकरिता सर्वश्रेष्ठ हास्य अभिनेता म्हणून हे पुरस्कार मिळाले.
२०१४ साली त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परेश रावल पत्नी म्हणजे जेष्ठ अभिनेत्री स्वरुप संपत होत. स्वरुप संपत मिस इंडिया राहिल्या होत्या. १९७९ मध्ये त्यांनी मिस इंडिया कॉम्पिटीशनमध्ये भाग घेतला आणि हा किताब आपल्या नावे केला. याचवर्षी त्यांनी मिस यूनिवर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. स्वरुप यांनी टीव्ही कॉमेडी शो 'ये जो है जिंदगी' मध्ये काम केले, हा शो खुप हिट ठरला. यासोबतच त्यांनी कुंकू तयार करणाया शृंगार कंपनीसाठी मॉडलिंग केली आहे. सध्या स्वरुप संपत अभिनया बरोबर दिव्यांग मुलांना अभिनयाचे धडे देते. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी स्वरुप संपत यांनी मुलांसाठी होणा-या एज्युकेशन प्रोग्रामचे हेड म्हणून सिलेक्ट केले होते. परेश रावल यांचा मोठा मुलगा अनिरुध्दने बॉलिवूडमध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलेय. चित्रपटातून तीन दशके अनेक भूमिका केल्यानंतर परेश रावल हे भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले. व २०१४ च्या निवडणुकीत अहमदाबाद पूर्व येथून लोकसभेकरिता उमेदवारी मिळाली आणि ते निवडणुकीत खासदार झाले. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत परेश रावल हे उभे राहिले नाहीत.

No comments:
Post a Comment