सर्वांचे आवडते अशोक मामा उर्फ प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ म्हणजे पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे, प्रेक्षकांना खळखळून हसवणारे नायक. पण अशोक सराफ खर्या आयुष्यात अतिशय शांत स्वभावाचे आहेत, हे वाचून आश्यर्च वाटेल. ४ जून १९४७ रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा जन्म झाला. अभिनेत्री निवेदिता जोशी या अशोक सराफ यांच्या पत्नी. प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. अशोक सराफ व निवेदिता यांच्याबाबतीत असेच म्हणता येईल. कारण अशोक सराफ हे पत्नी निवेदिता यांच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत.
अशोक सराफ यांचा ह्यदोन्ही घरचा पाहुणा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे, पुढे निवेदिता यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एकत्र काम करता करता दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अशोक सराफ व निवेदिता यांची पहिली भेट 'डार्लिंग डार्लिंग' या नाटकाच्या वेळी झाली होती. ही माझी छोटीशी मुलगी, असे म्हणत निवेदिताच्या बाबांनी तिची अशोक सराफ यांच्याशी ओळख करून दिली होती. 'नवरी मिळे नवर्याला' या सिनेमाच्या सेटवर निवेदिता व अशोक यांच्यात प्रेम फुलले. 'धुमधडाका'च्या सेटवर हे प्रेम आणखीच बहरले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण प्रत्येक प्रेमकहाणीत एक ट्विस्ट असतोच. तो यांच्याही प्रेमकहाणीत होता. निवेदिताने चित्रपटसृष्टीतील व्यक्तिशी लग्न करू नये, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता ठाम होत्या. लग्न करणार तर अशोक सराफ यांच्याशीच, असे म्हणून त्या अडून बसल्या. अखेर घरच्यांना त्यांचा हा निर्णय मान्य करावा लागला. अशोक सराफ यांच्या घरून मात्र या लग्नाला लगेच परवानगी मिळाली होती.
अखेर निवेदिता व अशोक सराफ यांचे लग्न ठरले.. लग्न झाले गोव्यात. होय, यामागचे एक खास कारण होते.गोव्याच्या मंगेशीच्या मंदिरात दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. याच मंदिरात लग्न का, तर मंगेशी हे अशोक सराफ यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे या ठिकाणी लग्न करण्याचा अशोक सराफ यांनी निर्णय घेतला होता.
अशोक सराफ यांच्यासोबत लग्न झाले तेव्हा निवेदिता यांचे मराठी सिनेसृष्टीतील करिअर जोरात होते. पण लग्नानंतर निवेदिता यांनी कामातून ब्रेक घेतला. एक दोन वर्षे नाही तर तब्बल १३ वर्षांचा ब्रेक.मुलाच्या जन्मानंतर निवेदिता यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचे ठरवले. पण अशोक सराफ यांचे करिअर मात्र अखंड सुरु राहिले. अशोक सराफ यांना याची जाण आहे. मी केवळ निवेदितामुळेच पुढे जाऊ शकलो. आज मी जे काही आहे, ते तिच्याचमुळे अशी कबुली ते आजही देतात, ते याचमुळे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
No comments:
Post a Comment