1945 मध्ये 'किस्मत' आला होता. या चित्रपटातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिन्दुस्तान हमारा है' हे गीत प्रचंड गाजले होते. त्यावेळी आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो. 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाने मोठा भाव खाल्ला.या चित्रपटातील गाणी विशेषतः 'संदेसे आते हैं...' हे गाणे आजही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वाजवले जाते. 2003 मध्ये आलेला 'एलओसी कारगिल' या चित्रपटानेही लोकप्रियता मिळवली. भगतसिंग ही चित्रसृष्टीची आवडती व्यक्तिरेखा. त्यांच्यावर 2002 मध्ये अजय देवगणचा 'द लिजेंड ऑफ भगतसिंग', बॉबी देओल आणि सनी देओल यांचा '23 मार्च 1931 शहीद' हे दोन चित्रपट आले. मात्र अजय देवगणच्या चित्रपटाने बाजी मारली. 1965 साली एस.राम शर्मा यांनी भगतसिंग यांच्या आयुष्यावर 'शहीद' चित्रपट बनवला. 1962 साली चेतन आनंद यांचा 'हकीकत'आला. धमेन्द्र आणि संजय खान यांनी या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. मदर इंडिया, सात हिंदुस्थानी, नया दौर, दीवार, लेट्स ब्रिन्ग अवर हिरोज बॅक,1971 अशा चित्रपटांमधूनही चित्रपट निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्रकारे देशभक्ती पडद्यावर आणली.
2001 साली सनी देओलचा 'गदर एक प्रेमकथा', अमीर खानचा 'लगान' प्रदर्शित झाला. 'गदर'मध्ये प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानात जाऊन तिथले सरकार हलवणारा सनी आणि 'लगान' मध्ये आपली जमीन मिळवण्यासाठी इंग्रजांबरोबर आपल्या साथीदारांसह क्रिकेट खेळणारा अमीर लोकांना भावला. दोन्ही चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. नंतरच्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि देशभक्तीचा वेगळा दृष्टिकोन ठेवून निर्माता दिग्दर्शकांनी वेगवेगळे चित्रपट बनवले. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'रंग दे बसंती' आणला. आजच्या पिढीतील सहा युवक कशा पद्धतीने भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देतात ही शौर्यगाथा दाखवली आहे. ही कथा फुलवताना दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्या पात्रांचा उपयोग केला आहे. अशाच प्रकारच्या कमल हसन यांचा 'हिंदुस्थानी' (1996) नेही वाहवा मिळवली. गांधी (1982), नेताजी सुभाष चंद्र बोस द फरगॉटन हिरो (2004), सरदार (1993), झाशी की राणी (1953) स्वदेश (2004), तिरंगा, प्रहार, क्रांतीवीर, कोहराम (नाना पाटेकर), जमीन (अजय देवगन) मंगल पांडे (अमीर खान),परमाणू, रोमिओ अकबर वॉल्टर (जॉन अब्राहम) हे देशभक्तीपर चित्रपट गाजले.'अ वेन्स्डे' या मध्ये सामान्य माणूस जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थाच हादरवून टाकण्याची क्षमता ठेवतो हे दाखवून दिलं आहे. 'रोजा', '1942 अ लव्हस्टोरी', 'पुकार', 'लक्ष्य', यांतील शौर्यगाथा रसिकांना आवडल्या. खिलाडी अक्षयकुमार हा अलीकडचा 'भारतकुमार' म्हटला पाहिजे. त्याच्या हॉलिडे, बेबी, नाम शबाना, गब्बर, एअरलिफ़्ट, केसरी, मिशन मंगल, टॉयलेट एक प्रेमकथा आदी चित्रपटांमधून देशभक्ती डोकावते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012
Sunday, August 2, 2020
पडद्यावरचं देशप्रेम
हिंदी चित्रपटसृष्टीचा देशभक्ती' हा विषय आवडता आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आजपर्यंत देशभक्ती सांगणारे असंख्य चित्रपट आले. प्रेक्षकांनीही त्याला पसंदी दिली,हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मनोजकुमार यांचे अनेक देशभक्तीवरचे चित्रपट आले. 'शाहिद', 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'देशवासी' यासारखे अनेक देशभक्तीपर चित्रपट गाजले. त्यामुळे त्यांना मनोज नाहीतर 'भारतकुमार' म्हटले जाऊ लागले. आज काळ बदलला तशी देशभक्तीची व्याख्याही बदलली. पण रसिकांनी हा बदलही स्वीकारला. शौर्यगाथा मात्र त्यांना अधिक भावल्या. देशभक्ती म्हणजे बॉर्डरवरील ऐतिहासिक युद्धपट किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा संघर्ष नव्हे. सध्याच्या काळात विविध घटकांवर होणारा अन्याय-अत्याचार, भ्रष्ट कारभार मोडून काढणे हीसुद्धा एक देश सेवाच मानली जाते. त्यामुळे सलमान खान यांचे 'जय हो' सारखे चित्रपटही याच पठडीत येतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
No comments:
Post a Comment