बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने एकेकाळी सर्वांना घायाळ करणार्या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरातमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांनी १९५९ पासून ते १९७३ पयर्ंतच्या काळात बॉलिवूडवर जादूच केली होती. १९५९ ते १९७३ सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेखने दिल देके देखो, जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंझील इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटासाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
नुकतेच एका रिअँलिटी शोमध्ये आशा पारेख यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा धर्मेन्द्र यांनी आशा पारेख यांच्याविषयीचा मजेदार किस्सा सांगितला. एरवी बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे मदिरापान फारच सामान्य बाब मानली जाते. पण, आशा पारेख या बाबतीत अपवाद होत्या. त्या स्वत: मदिरापान करीत नव्हत्या आणि इतर कोणी कामाच्या वेळी असे आलेलेही त्यांना आवडत नसायचे. दारूचा साधा वासही आला तरी त्या रागवायच्या. 'आये दिन बहार के' या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी धर्मेन्द्र रात्री उशीरापर्यंत दारूच्या पार्टीत असायचे आणि सकाळीही त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत असते. आशा पारेख यांना हा प्रकार आवडला नाही. म्हणून यावर उपाय म्हणून धर्मेन्द्र यांनी सकाळी शुटिंगला येताना कांदा खाऊन येण्याचा प्रकार सुरू केला. आशा पारेख यांनी त्यांची तक्रार करीत आपल्याला कांद्याचाही वास आवडत नसल्याचे सांगितले. तेव्हा धर्मेन्द्र यांनी कांदा खाण्याचे खरे कारण स्पष्ट केले. नंतर हे दोन्ही कलाकार चांगले मित्र बनले. पण, त्या काळातील किस्से आजही त्यांना भावूक करून जातात.
१९९२ साली तिच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने पारेखचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. त्यावेळी आशा पारेख यांचे सर्वजण दिवाने होते. मात्र स्वत: आशा देखील कोणाच्या तरी प्रेमात होत्या.
एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या नशीबात लग्न हे लिहिलेच नव्हेत आणि त्या सिंगल खूप आनंदी आहेत असे म्हटले आहे. त्यावेळी आशा या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणल्या जात होता. त्यांचे हे यश पाहून कोणीही त्यांच्याशी लग्न केले असते. पण दिग्गज अभिनेत्रीला भेटणे, तिच्यासोबत फिरणे हे कादाचित सोपे नाही असे मानून त्यांना कोणी लग्नाची मागणी घातली नसावी असे म्हटले जात आहे. आशा यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एण्ट्री झाली होती. मात्र ही व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची व्यक्ती होती. दुर्दैवाने त्यांचे त्या व्यक्तीशी लग्न होऊ शकले नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता आमीर खानचे काका आणि दिग्गज दिग्दर्शक- निर्माते नासिर हुसैन होते. आशा यांचे नासिर यांच्यावर प्रेम होते. परंतु नासिर त्यावेळी विवाहित होते. नासिर यांनी त्यांचा संसार सोडून आपल्याशी लग्न करावे हे आशा यांना कदापी मान्य नव्हते. म्हणून आशा यांनी नासिर यांच्याशी लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये आशा यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नासिर हे माझ्या आयुष्यात येणार पहिले आणि शेवटचे व्यक्ती होते. माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते. पण मला त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलापासून विभक्त करायचे नव्हते. माझे लग्न व्हावे अशी माझ्या आईची इच्छा होती आणि तिने ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचे ही माझी अट असल्यामुळे माझे लग्न होऊ शकले नाही, असे आशा म्हणाल्या.
बॉलिवूडमधील प्रभावशाली अभिनेत्री आशा पारेख
ReplyDeleteबॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने एकेकाळी सर्वांना घायाळ करणार्या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. अशा या गुणी अभिनेत्रीला भारतीय चित्रपट क्षेत्रातील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 2020 साठी जाहीर झाला असून आशा पारेख यांच्या अजरामर सिनेमांचं गारुड आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर आहे.
आशा पारेख यांनी निर्माती दिग्दर्शक म्हणूनही ओळख मिळवली. पारेख यांनी 1990 साली आलेल्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'कोरा कागज'चं दिग्दर्शन केलं होतं. आशा पारेख यांचे लोकप्रिय आणि अजरामर सिनेमे 'जब प्यार किसी से होता है' (1961), 'फिर वही दिल लाया हूं' (1963), 'तीसरी मंजिल' (1966), 'बहारों के सपने' (1967), 'प्यार का मौसम' ' (1969), 'कटी पतंग' (1970) आणि कारवां (1971) आहेत.
त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांनी 1959 पासून ते 1973 पर्यंतच्या काळात बॉलिवूडवर जादूच केली होती. 1959 ते 1973 सालांदरम्यान आशा पारेख बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक होती. राजेश खन्नासोबत प्रसिद्ध जोडी असलेल्या पारेखने 'दिल देके देखो', 'जब प्यार किसीसे होता है', 'तिसरी मंझील' इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 1971 साली प्रदर्शित झालेल्या 'कटी पतंग' या चित्रपटासाठी आशा पारेखला फिल्मफेअर हा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. सुमारे 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रुपेरी पडद्यावर बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरुवात करणाऱ्या आशा पारेख या कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत. सध्या त्या बॉलिवूड पासून दूर असल्या तरी नृत्य अकॅडमी चालवतात. 1998 ते 2001 या काळात केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.