बॉलिवूड ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मला स्वत: चा प्रतिस्पर्धी मानत आहे, बॉलीवूड उद्या त्याच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कार्यक्रमांची मागणी पूर्ण करेल. देशातील सुमारे 40 ओटीटी वाहिन्यांची मागणी पूर्ण करणे बॉलिवूडला सोपे जाणार नाही, कारण आजही बॉलिवूडमध्ये देशात बनवलेल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटांची मागणी पूर्ण करता येत नाही. सध्याच्या संकटामुळे बॉलिवूडसमोर आलेली संधी कदाचित त्याला समजू शकणार नसेल पण ओटीटी बॉलिवूडसाठी संकट नसल्याचे सिद्ध करेल,मात्र त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.
महाराष्ट्रातील सिनेमाँगृहे बंद आहेत, पण देशातील अनेक राज्यांत सुमारे 40 ओटीटी आणि चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मुंबईत शूटिंग ठप्प आहे पण ते अजूनही अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही सगळे मार्ग बंद झालेले नाहीत. जर खिडकी बंद असेल तर कुठे दरवाजादेखील उघडा असणार आहे. अमिताभ बच्चन यांचा 'गुलाबो सीताबो' किंवा अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' नाईलाजाने का होईना ओटीटीवर रिलीज करण्यात आलाच ना! पण यामुळे निर्मात्यांना तोटा कमी करण्यास मदत झाली.
अजूनही सुमारे 40 ओटीटी प्लॅटफॉर्म चालकांना बॉलिवूड निर्मात्यांनी त्यांच्यासाठी कार्यक्रम तयार करावेत असं वाटतं. प्रत्येकाला कार्यक्रमांची आवश्यकता असते. वेब मालिका, चित्रपट, मालिका या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. पण या मागणीची पूर्तता अद्याप व्हायची आहे. ही मागणी कायम असतानाही चित्रपटगृहे सुरू होतील. म्हणूनच थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्पर्धात्मक आणि एकमेकांना नुकसानकारक समजण्याचा विचार निरर्थक आहे.
अजय देवगनने नेटफ्लिक्ससाठी 'त्रिभंग' तयार केला. तसेच त्याचा 'भुज' हा चित्रपटदेखील ओटीटीवर रिलीज होणार आहे. ओटीटी वाहिन्यांना हळूहळू बॉलिवूड निर्मात्यांकडून कार्यक्रम मिळू लागले आहेत आणि कित्येक निर्मात्यांशी बोलणी सुरू झाली आहे. अलीकडेचेच उदाहरण आहे-शाहिद कपूरला 70-80कोटीमध्ये तीन चित्रपटांचा प्रस्ताव एका ओटीटी चॅनेलकडून मिळाला आहे. शाहिद हे काम पहिल्यांदा निर्माता बनून करणार आहे.
20 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या शाहिदला केवळ ओटीटीमुळेच ही संधी मिळाली. अक्षयकुमारच्या 'बेलबॉटम'साठी ओटीटी चॅनेल्स 150 कोटी रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत. झी प्लेक्ससह अनेक प्लॅटफॉर्मवर सलमान खान 40 देशांच्या चित्रपटगृहात आपला ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. हे सर्व कोरोना साथीच्या दुसर्या लाटेच्या दरम्यान शक्य झाले आहे, ज्याची कालपर्यंत कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. सलमानने आपला छोट्या बजेटचा 'पेपर' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जी 5 वर रिलीज केला आहे.
रिलायन्स, लायका किंवा यशराज फिल्म्स यासारखे बॅनरवाले आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यास तयार नाहीत. रिलायन्सने अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' ला त्यांच्या गोदामात एक वर्ष झाले झाकून ठेवला आहे. चित्रपटाला कितीही वेळ लागला तरी चित्रपटगृहात दाखविला जाईल असा आग्रह त्यांनी धरला आहे. यावर्षी ऐवजी 2022 मध्ये लायका कंपनी आपला पाच भाषांचा चित्रपट 'आरआरआर' रिलीज करणार आहे. लायका किंवा रिलायन्स ' डीप पॉकेट' असलेल्या कंपन्या आहेत. त्यांना नुकसान झाले तरी फार काही फरक पडत नाही. ते जोखीम उठवू शकतात.ते वर्षभर चित्रपट थांबवू शकतात. परंतु बरेच छोटे उत्पादक हे करू शकत नाहीत. चित्रपटगृहे बंद झाल्यावर या निर्मात्यांनी ओटीटीवर त्यांचे चित्रपट प्रदर्शित करून त्यांचे नुकसान कमी केले. म्हणूनच परिस्थिती समजून घेणे अधिक चांगले आहे आणि संकटाला संधी समजून बॉलिवूड निर्मात्यांनी जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पद्धतीचा स्वीकार करून संकटात संधी शोधायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment