'हीरोपंती 2’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार खलनायकाची भूमिका 'हीरोपंती 2' चे शुटिंग सुरू झाले होते. आता चित्रपटाच्या पुढील शुटिंगच्या शेड्युलची तयारी सुरू झाल्याची बातमी आली आहे. टाइगर श्रॉफ आणि तारा सुथारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. 'हिरोपंती2' एक अशा युवकाची कहाणी आहे,जो रात्रीच्या वेळी लोकांना मदत करत असतो. त्याला एका मिशनवर काम करण्यासाठी रशियाला जावं लागतं. रजत आरोरा लिखित आणि साजिद नादियादवाला निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत.चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.
अमिताभ,प्रभास आणि दीपिका यांचा नवा चित्रपट विषाणूवर आधारित
अश्विन नाग दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोन आणि 'बाहुबली'फेम प्रभास यांचा नवीन चित्रपट जैविक युद्ध आणि मानवाने बनवलेल्या विषाणूवर आधारित आहे. या चित्रपटात कोरोना सदृश महामारीनंतर बनलेल्या परिस्थितीचे चित्रण पाहायला मिळणार आहे. 'महानटी'चे दिग्दर्शक अश्विन नाग यांचा हा चित्रपट 2050 च्या पार्श्वभूमीवर असणार आहे.चित्रपटात प्रभास लार्जर दॅन लाईफ किरदार साकारणार आहे.
‘ओम : द बॅटल विदइन’ ची टीम जाणार तुर्कीला
आदित्य राय कपूर आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘ओम : द बॅटल विदइन’ चित्रपटाचे पुढचे शेड्युल तुर्कीमध्ये सुरू होणार आहे आहे. कोरोना टाळेबंदी हटल्यानंतर चित्रपटाची टीम शूटिंगसाठी तुर्कीला रवाना होणार आहे. चित्रपटात आदित्य राय कपूर ऍक्शन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तुर्कीमध्ये मारधाड दृश्यांचे शुटिंग होईल. अक्षत सलुजा आणि निकेत पांडे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओसोबत मिळून अहमद खान आणि शायरा खान करत आहेत.
सोशल मीडियावर मलिकाच्या घराचे फोटो
बॉलीवुड अभिनेत्री मलिका शेरावत सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. त्यांच्यासाठी आपले फोटो सतत शेअर करत असते.आता तिने तिच्या लॉस एंजिल्समधल्या घराचे फोटो पाठवले आहेत. ते पाहून तिचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. तिने तिच्या घराचा एक व्हिडिओ इन्स्टंग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकाचे घर मोठ्या एरियामध्ये बांधण्यात आल्याचे दिसत आहे. घरासमोर बाग आहे. मालिकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी खूपच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने तिच्या घराला 'जन्नत'पेक्षाही सुंदर म्हटले आहे. मालिकाच्या या व्हिडिओला एक लाखांपेक्षा अधिकवेळा पसंद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment