Sunday, February 19, 2023

बाहुबली 2'वर 'बादशाह'ने बाजी मारली, प्रभासच्या चित्रपटाला मागे टाकत 'पठाण'ने केला विक्रम


शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा जास्त रेकॉर्ड तोडण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे.  शाहरुखचा 'पठाण चाहत्यांना खूप आवडला आहे.२५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बादशाहच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की, लोक त्याच्या तिकिटासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होते. त्याचवेळी शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे 'पठाण'ने बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, पठाणने आपल्या उत्कृष्ट कामाईने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे आणि कामाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. 'पठाण'ने कमाईच्या बाबतीत साउथ चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली 2'ला मागे टाकत हा विक्रम केला आहे. पठाणने रिलीजच्या 25 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हिंदीमध्ये 3.25 कोटी आणि इतर भाषांमध्ये 7 लाखांचा गल्ला जमवला आहे. यानंतर, पठाणचे सर्व भाषांमधील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 511.60 कोटी रुपये झाले आहे.

शाहरुख खानच्या पठाणने साऊथ सुपरस्टार प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड मोडला आहे.  रिपोर्ट्सनुसार, बाहुबलीची एकूण कमाई 510.99 कोटी रुपये होती. यासह पठाण हा हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाणने चार दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2' ने ऑस्ट्रेलियात 4.50 दशलक्ष डॉलर (रु. 25.71 कोटी) चे एकूण कलेक्शन केले होते, तर सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' ने 4.51 दशलक्ष डॉलर (रु. 25.77 कोटी) कमावले होते. केवळ बाहुबली 2च नाही तर सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' ने आपल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर दक्षिण चित्रपटातील ब्लॉकबस्टर चित्रपट KGF Chapter 2, RRR, टायगर जिंदा है, दंगल आणि वॉर सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यासह पठाण बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

1 comment:

  1. सुपरस्टार शाहरुख खानचा पठाण चित्रपट एकामागून एक नवनवे टप्पे गाठत आहे. आता हा चित्रपट एक हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने देशात ६२३ कोटींची, तर परदेशी चित्रपटाने ३७७ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे शाहरुखचा हा चित्रपट एक हजार कोटींचा आकडा पार करणारा भारतातील पाचवा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी आमिर खानच्या दंगलने या यादीत नाव नोंदवले होते. दंगल या चित्रपटाने १९६८ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या बाहुबली २चा क्रमांक येतो. राजामौली यांच्या चित्रपटाने त्यावेळी १७४७ कोटींची कमाई केली होती.

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...