1.भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. यांनी कोणत्या हिंदी चित्रपटातून बालकलाकर म्हणून सुरुवात केली होती?
उत्तर- 'द बर्निंग ट्रेन' (1980) या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून खुशबू यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
2.अभिनेत्री करिना कपूर खान व करिश्मा कपूर यांचे पालक कोण आहेत?
उत्तर- रणधीर कपूर व बबिता हे अभिनेत्री करिना कपूर खान व करिश्मा कपूर यांचे पालक आहेत. रणधीर आणि बबिता घटस्फोटन घेता मागच्या 35 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. अलीकडेच त्यांच्यातला दुरावा संपला आहे. रणधीर व बबिता यांनी 1971 मध्ये प्रेमविवाह केला होता आणि नंतर 1988 मध्ये ते वेगळे झाले. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. मार्च 2023 मध्ये ते पुन्हा एकत्र राहत आहेत.
3.' विरजण' (2023) या मराठी चित्रपटातील 'देवा' या गाण्याला कोणी आपला सुमधुर स्वरसाज चढवलाय?
उत्तर- तेलुगू गायिका 'सत्यावथी मंगली' हिने 'विरजण' (2023) या मराठी चित्रपटातील 'देवा' या गाण्याला कोणी आपला सुमधुर स्वरसाज चढवलाय. प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे; तर या गाण्याचे बोल विनायक पवार यांचे आहेत. हा चित्रपट जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, तसेच सागर जैन, हृषभ कोठारी आणि राजू तोडसाम निर्मित आहे. कपिल जोंधळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात सोहम चाकणकर आणि शिल्पा ठाकरे मुख्य भूमिकेत आहेत.
4. अभिनेता, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी कोणकोणत्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे?
उत्तर- एक रात्र मंतरलेली’, ‘समांतर’, ‘रिटा’, ‘अनुदिनी’, ‘सॅटर्डे संडे’, ‘पन्हाळा’ हे मकरंदचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. 'दगडी चाळ २', 'आठवा रंग प्रेमाचा' हे मकरंद देशपांडे यांचे २०२२ मधील उल्लेखनीय चित्रपट.
5. अभिनेता मकरंद देशपांडे यांनी कोणकोणत्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
उत्तर- ‘रिस्क’, ‘डरना जरूरी है’, ‘हनन’, ‘एक से बढकर एक’, ‘स्वदेश’, ‘चमेली’, ‘विस्फोट’, ‘मकडी’, ‘लाल सलाम’, ‘रोड’, ‘प्यार दिवाना होता है’, ‘जंगल’, ‘घात’, ‘सरफरोश’, ‘सत्या’, ‘उडान’, ‘नाजायज’, ‘अंत’, ‘तडीपार’, ‘पहला नशा’, ‘सर’ इत्यादी चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
6. 'बुगडी माझी सांडली गं,' 'मला हो म्हणत्यात लवंगी मिरची', 'कसं काय पाटील बरं हाय का?', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला', 'पदरावरती मोर नाचरा हवा' यांसारख्या सुप्रसिद्ध लावण्यांना संगीत देणाऱ्या संगीतकाराचे नाव काय?
उत्तर- संगीतकार वसंत पवार
7. दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी काही सांगा.
उत्तर- दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी द्रमुकमधून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2014 पर्यंत त्या द्रमुकमध्ये राहिल्या. 2014 मध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2020 मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रभावाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
8. निळू फुले यांनी अमिताभ बच्चनसोबत कोणत्या चित्रपटात काम केले आहे?
उत्तर- निळू फुले यांनी 'नथू मामा’ ची भूमिका असलेल्या ‘कुली’ या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम केले आहे.
9. निळू फुले यांनी कोणकोणत्या हिंदी चित्रपटात काम केले आहे?
उत्तर- औरत तेरी यही कहानी, सुत्रधार, हिरासत, सारांश, कुली, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, बिजली, दो लडके दोनो कडके, मशाल, तमाचा, जरासी जिंदगी, नरम गरम, सौ दिन सांस के, कब्जा, मां बेटी, मेरी बिवी की शादी, मोहरे, इन्साफ की आवाज, भयानक, पुर्णसत्य, सर्वसाक्षी, कांच की दिवार, दिशा आदी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
10. 2013 साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने या अभिनेत्रीला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. या अभिनेत्रीचे नाव काय?
उत्तर- सई ताम्हणकर. एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे तसेच ती सांगली येथील प्रसिद्ध चिंतामण महाविदयालयाची विदयार्थीनी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती कॉलेजमधील अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती
No comments:
Post a Comment