चित्रपट इंडस्ट्रीच्या तुलनेत नक्कीच बॉलिवूड इंडस्ट्री ही भारतात सर्वात मोठी मानली जाते. शिवाय प्रादेशिक सिनेमांपेक्षा बॉलिवूड चित्रपटांचे महत्त्व नक्कीच जास्त आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून हे समीकरण बदलताना दिसत आहे. हिंदी सिनेमांना साऊथ सिनेमे तोडीस तोड टक्कर देत आहेत. कधीकधी जाणवते की, साऊथ इंडस्ट्री बॉलिवूडच्या पुढे आहे. याच साऊथ इंडस्ट्रीतल्या कलाकारांना जगभर ओळख मिळाली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपती हा देखील सध्याच्या घडीचा मोठा आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या आणि दमदार ऍक्शनच्या जोरावर मोठी प्रसिद्धी आणि लोकांचे प्रेम मिळवले आहे. साऊथ सुपरस्टार विजयने त्याच्या अनेक सिनेमांमधून न प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन आहे. विजयचे सिनेमे म्हणजे भरपूर अक्शन, ड्रामा आणि रोमान्स असलेले असतात. थलपती विजयने कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. बॉलिवूडची 'देसी गर्ल' ओळख मिळवणाऱ्या प्रियांका चौप्राने तिच्या अभिनयाची सुरुवात विजयसोबतच केली . या दोघांनी तमिळ सिनेमा 'थमियाँ' सोबत केला होता. १९९६ मध्ये विजयचा poove unakkaga हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने त्याला लोकप्रियता तर दिलीच, सोबतच तमिळ लोकांचे प्रेमही मिळवून दिले. आजच्या घडीला विजय सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या आगामी 'थलपथी ६५' या चित्रपटासाठी तब्बल शंभर कोटींचे मानधन घेतले आहे. मानधनात त्याने रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. कारण रजनीकांत यांनी त्यांच्या “दरबार” चित्रपटासाठी नव्वद कोटी घेतले होते. 'सेंढूरपांडी', “विष्णू, “वसंत वासल', 'लव १! “, 'प्रियमुदन”, 'काधालुक्कु मरियाधई”, 'तीरुपाची”, “तीरुमय्या”, “भगवती”, 'सुकरन' आदी ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment