Sunday, May 10, 2020

सत्यजित रे

सत्यजित रे बहुमुखी प्रतिभेचे धनी होते.  ते एक चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, गीतकार, संगीतकार, ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक होते. ते उत्तम चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानला जात.त्यांना या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेच,पण भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरव केला.
 शिक्षण आणि करिअरची सुरुवात
 कलकत्ता येथे जन्मलेले सत्यजित रे यांच्या वडिलांचे- सुकुमार रे यांचे निधन झाले तेव्हा ते अवघ्या तीन वर्षांचे होते.  आई सुप्रभा रे यांनी त्यांना मोठ्या अडचणींतून उभे केले.  त्यांचे आजोबा उपेंद्र किशोर रे हे प्रख्यात लेखक, चित्रकार, व्हायोलिन वादक आणि संगीतकार होते.  कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील अभ्यासांसाठी ते शांती निकेतनमध्ये गेले आणि पुढील पाच वर्षे तिथेच राहिले.  यानंतर 1933 मध्ये ते पुन्हा कोलकाता येथे आले. आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काम करायला सुरवात केली.  यावेळी त्यांनी जिम कॉर्बेटचे  ‘मैन-ईटर्स आॅफ कुमाऊं’ आणि जवाहरलाल नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकांसह अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे तयार केली.

1928 मध्ये प्रकाशित झालेल्या 'अम अंतिर भेपू’ नावाच्या विभूतीभूषण बंधोपाध्याय यांच्या प्रसिद्ध कादंबरीची 'पथेर पांचाली' ही बाल आवृत्ती तयार करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.  रे या पुस्तकाने खूप प्रभावित झाले होते.  या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करण्याबरोबरच त्यांनी पुस्तकातील आतील पानांतील रेखाचित्रेही तयार केली. यापैकी बरीच चित्रे त्यांच्या पहिल्या  'पथेर पांचाली' चित्रपटाची सुंदर आणि प्रसिद्ध शॉट्स बनली.  सत्यजित रे यांनी आठ वर्ष प्रेमसंबंधानंतर 20 ऑक्टोबर 1949 रोजी विजया रायशी लग्न केले.

 भारतीय सिनेमाची ओळख
 सत्यजित रे केवळ एक सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीची 'ओळख' म्हणून परिचित आहेत.  सिनेमाच्या मानवतावादी दृष्टिकोनाबद्दल त्यांना  ओळखले जाते.  त्यांनी बांगला भाषेत चित्रपटांची निर्मिती केली. लंडनमधील फ्रेंच चित्रपटाचे दिग्दर्शक जीन रेणुआ आणि इटालियन चित्रपट लादरी दि बिकलिसिटे (सायकल चोर) यांच्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. 1955 मध्ये त्यांनी ‘पथेर पांचाली’ हा पहिला चित्रपट बनविला.  या चित्रपटाने समीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

 या चित्रपटाने अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले.  'पाथेर पांचाली' या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट 'क्लासिक' चित्रपट म्हटले जाते.  त्याशिवाय त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपट बनविले, त्यापैकी चारुलता, 'अपराजितो', 'अपूर संसार' आणि 'शतरंज के खिलाड़ी' प्रमुख आहेत.  त्यांनी एकूण 37 चित्रपट दिग्दर्शित  केले. वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, माहितीपट, अनेक कादंबऱ्याआणि लघुकथा देखील त्यांनी लिहिल्या.

 सन्मान आणि पुरस्कार
 सिनेसृष्टीत महत्त्वाच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1992 मध्ये सत्यजीत रे यांना 'आॅनरेरी अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचीवमेंट’' साठी ऑस्कर पुरस्काराची घोषणा करण्यात आली.  त्यावेळी ते आजारी होते.  त्यांना समारंभाला जाता येणे शक्य नव्हते. मात्र हा पुरस्कार त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा निर्णय ऑस्करच्या अधिकाऱ्यांनी  घेतला आणि त्यानंतर ऑस्कर अधिकाऱ्यांची टीम कोलकाता येथे सत्यजित रे यांच्या घरी आली आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

 1992 मध्ये भारत सरकारने त्यांचा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' हा पुरस्कार देऊन गौरव केला.  याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके यांच्यासह 32 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. फक्त एवढेच  नव्हे तर संपूर्ण जगाने त्यांची प्रतिभा जाणली आणि त्यांचा गौरव केला. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली.  23 एप्रिल 1992 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...