Saturday, May 9, 2020

नूरजहाँ आणि तलत एकत्र गायलेच नाहीत

हा एक योगायोग आहे कि मलिका-ए-तरन्नुम नूरजहां आणि  रेशमी,तरल आवाजाचे गायक तलत महमूद  या दोघांनी एकत्र कधी कुठल्या चित्रपटात गायलं नाही. दोघांना एकत्र गायनाची संधी मिळाली पण, तरीही ते एकत्र येऊ शकले नाहीत. शेवटी हा नशिबाचा भाग म्हटला पाहिजे. मात्र संगीताचे चाहते या दोन गायकांना एकत्र गाताना पाहू शकले नाहीत आणि ऐकूही शकले नाहीत.

हा तो काळ होता, जेव्हा तलत ‘हमसे आया न गया…’, ‘जाएं तो जाएं कहां…’, ‘शाम-ए-गम की कसम…’, ‘ऐ मेरे दिल कहीं और चल…’, ‘जलते हैं जिसके लिए…’ ही गाणी गाऊन प्रसिद्ध गायक बनले होते. आणि नूरजहां ‘जवां है मोहब्बत हसीं है जमाना…’ और ‘आवाज दे कहां है…’ सारखी गाणी गाऊन पाकिस्तानात निघून गेली होती. 1961 मध्ये तलत पाकिस्तानमधील कराची येथे एक शो करण्यासाठी गेले होते. तलतला ऐकणाऱ्या लोकांनी इतकी गर्दी केली होती की शोची तिकिटे हातोहात विकली गेली. जवळ पास 58 हजार चाहते त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले होते.  पाकिस्तानमध्ये तलतची प्रसिद्धी मलिका-ए-तरन्नुम नूरजहांपर्यंत पोहचली. याच दिवसांत ती लाहोरमध्ये स्टेज शो करत होती. तिला वाटलं की, तलत महमूद यांनी आपल्यासोबत  स्टेज शो केल्यास 'सोने पे सुहागा' होऊन जाईल. शिवाय दोघांच एकत्र येणं दोघांच्या चाहत्यांसाठी एक 'नजराणा'च असेल. शिवाय दोघांना एकत्र गाण्याची संधी मिळणार होती.
तलत आणि नूरजहां दोघांनी एकत्र कधीच गाऊ शकले नव्हते.  नऊ वर्षाच्या नूरजहांने बाल कलाकार  म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होई. 1935 ते 1939 पर्यंत कोलकाता मध्ये  राहून काम केले. तिने ‘पिंड दी कुड़ी’, ‘मिसर का सितारा’, ‘हीर सयाल’, ‘गुलबकावली’ सारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती लाहोरला परत निघून गेली होती. यानंतर दोन वर्षांनी एचएमवीच्या बोलावण्यावरून  तलत 1941 मध्ये कोलकाताला पोहचले होते. तिकडे लाहोरहून 1943 मध्ये नूरजहां मुंबईला आली. ‘बड़ी मां’, ‘जीनत’, ‘गांव की गोरी’, ‘अनमोल घड़ी’ तथा ‘जुगनू’ सारखे चित्रपट केले आणि  1947 मध्ये तिचे पती शौकत हुसैन रिजवीसोबत कायमची पाकिस्तानला निघून गेली. ती पाकिस्तानला गेल्यानंतर दोन वर्षांनी तलत, 1949 मध्ये मुंबईला आले. त्यामुळे दोघांची भेट झाली नाहीच.
1961 मध्ये तलत पाकिस्तानला गेल्यानंतर दोघांना एकत्र गाण्याची संधी मिळाली होती. म्हणजे नूरजहाँने तसा प्रस्ताव तलत यांना दिला होता. दोघांनी एकत्र स्टेज अहो करण्याचा प्रस्ताव होता तो! पण तलत यांनी मुंबईला आपला स्टेज शो निश्चित असल्याचे सांगून तिचा प्रस्ताव नाकारला होता. नूरजहाँ ला वाटलं की,   'मेहनताना'  मिळणार नाही, म्हणून  कदाचित तलत ने आपला प्रस्ताव नाकारला असेल. पुन्हा तिने  प्रस्ताव पाठवला आणि सोबत एक ब्लॅक चेक पाठवला. सोबत एक संदेश पाठवला की, या चेक वर तुम्हाला पाहिजे ती किंमत लिहावी आणि आपल्या स्टेज शो चा प्रस्ताव स्वीकारावा. पण तलत यांनी आपली मजबुरी सांगत या प्रस्तावाचाही इनकार केला. अशा प्रकारे तलत आणि नूरजहां इच्छा असूनही भेटू शकले नाहीत. आणि  संगीतप्रेमींना 'तरन्नुम की मलिका' आणि रेशमी आवाजाचा  बादशहा यांना एकत्र ऐकण्याची संधीही मिळू शकली नाही.
जगातल्या ज्या ज्या देशांमध्ये भारतीय वसले आहेत, त्या त्या ठिकाणी तलत लोकप्रिय होते. लोक त्यांच्या दर्द भऱ्या आवाजचे दीवाने होते. तलत यांनी 1961 ते  1991 पर्यंत अनेक देशांमध्ये स्टेज शो केले, तिथे त्यांच्या शोची तिकिटे हातोहात खापायची. एक तर किस्सा प्रसिद्धच आहे. 1956 मध्ये ईस्ट अफ्रीकामध्ये तलत यांच्या सहा स्टेज शोचे आयोजन होते,पण त्यांना ऐकणाऱ्यची गर्दी  आणि फरमाइश इतकी अधिक होती की तलत यांनी सहाच्या जागी तब्बल 25 स्टेज शो करावे लागले होते.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...