Sunday, May 10, 2020

नानाभाई भट्ट, महेश भट्ट आणि आलिया भट्ट...

पृथ्वीराज कपूर यांचे कुटुंब मोठे होते. त्यांच्या मुलांनी म्हणजे राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी स्वत: च्या वेगळ्या फिल्म कंपन्या बनवल्या.  चेतन आनंदची फिल्म कंपनी असूनही देव आनंदने स्वत: चे बॅनर तयार केले.  यश चोप्रा हे बीआर चोप्रा यांचे बंधू. यश याने बीआर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले, पण  आपली स्वतःची कंपनी सुरू केली.  परंतु चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नानाभाई भट्ट यांच्या महेश भट्ट आणि मुकेश भट्ट या दोघांनीही स्पेशल फिल्म्स हीच कंपनी स्थापन केली  आणि ती पुढे चालवली. या बॅनरखाली  अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली.  आजही खास ,वेगळ्या धाटणीचे  चित्रपट बनवले जातात आहेत.  विशेष म्हणजे महेश आणि मुकेश हे दुसऱ्या पत्नीची मुले, पण त्यांनी नानाभाई यांची कंपनी यशस्वीपणे चालवली. नानाभाई भट्ट यांना त्यांच्या हयातीत दोन्ही कुटुंबांना एकत्र आणता आले नाही, मात्र हे काम त्यांच्या नंतरच्या पिढीने केले.

 नानाभाई भट्ट 1940 च्या दशकात ध्वनी रेकॉर्डिस्टपासून पुढे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक बनले. त्यांनी शंभरहून अधिक स्टंट आणि धार्मिक चित्रपटांची निर्मिती केली आणि बरेच नाव कमावले.  नानाभाई भट्ट यांचे दोन विवाह झाले.  पहिली पत्नी हेमलता होती, त्यांचा मुलगा रॉबिन भट्ट चित्रपट लेखक आहे.  नानाभाई भट्ट यांची दुसरी पत्नी (लग्न न करता)शेरेन मोहम्मद अली, जी त्यांच्या चित्रपटांची नायिका  होती.  शीरीन-नानाभाईं यांच्या लग्नाला पहिली पत्नी हेमलता यांच्या कुटुंबीयांची मान्यता नव्हती. त्यामुळे नानाभाई भट्ट यांची दोन कुटुंबे, दोन घरे झाली. महेश भट्ट आणि मुकेश ही शेरीन-नानाभाई यांची मुले. महेश भट्टच्या आई शीरीन यांच्यासोबत नानाभाईंचे  अधिकृतपणे लग्न झाले नसल्यामुळे महेशने स्वत: चे 'अनौरस मूल' (बास्टर्ड) म्हणून वर्णन केले आहे.  कौटुंबिक संघर्षामुळे नानाभाईंना शीरीन आणि त्यांच्या मुलांसाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे महेश भट्ट यांना इतर  सामान्य लोकांच्या मुलांसारखे वडिलांचे प्रेम मिळाले नाही. महेश आणि मुकेश यांना कधी वडिलांच्या मांडीवर  बसून खेळता आले नाही. याबद्दल त्यांना खूप वाईट वाटते.  त्याहीपेक्षा अधिक वाईट त्यांना  आईला सामाजिक मान्यता मिळाले नाही,याचे वाटते.  मात्र महेश भट्ट यांनी नेहमीच वडील नानाभाई-शीरीन यांच्या प्रेमाचा आदर केला.  म्हणूनच जेव्हा महेश-मुकेश यांनी 1987 मध्ये 'विशेष फिल्म्स' (मुकेशच्या मुलाच्या विशेषच्या नावावरून) स्थापना केली आणि या बॅनरखाली 'कब्जा'(1988) नावाचा पहिला चित्रपट बनविला. या चित्रपटाचे निर्माते म्हणून नानाभाई भट्ट यांचे नाव देण्यात आले होते.

 नानाभाईंचे कुटुंब एकत्र आले नसले तरी नंतरच्या पिढ्यांनी  मात्र नेहमी एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला.  नानाभाईंच्या पहिल्या पत्नीचा मुलगा रॉबिन भट्ट यांना  ' विशेष फिल्म्स' च्या माध्यमातून नेहमी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला.  महेश भट्ट यांनी रॉबिन भट्ट यांच्याकडून 'साथ', 'सडक', 'जूनून' आदी चित्रपटांचे लेखन करून घेतले.  त्यांनी रॉबिन भट्ट यांना बाहेरील निर्मात्यांकडूनही 'आशिकी', 'दिशाभूल', 'अंगारे', 'कारतूस'  आदी चित्रपटांचे लेखन करण्याची संधीही दिली.  रॉबिन भट्ट यांनी जेव्हा 'चाहत' चित्रपटाची निर्मिती केली, तेव्हा त्याचे दिग्दर्शनही महेश भट्ट यांनी केले.
नाती चांगली राहावीत म्हणून  महेश भट्ट यांनी बहिण हिना सुरी यांच्या मुलाला म्हणजे मोहित सुरी याला 'जहर' (2005) दिग्दर्शन करण्याची संधी दिली.  महेश भट्टची आई शेेरिन यांची बहीण मेहरबानो हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीची एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.  पूर्णिमा या नावाने तिने चित्रपटात काम केले.  पौर्णिमा इमरान हाश्मीची आजी होती.  महेश भट्ट यांनी इम्रान हाश्मीचा यालाही पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्याला पाठबळ दिले.
वडील नानाभाईंप्रमाणेच महेश भट्ट यांनीही दोन विवाह केले.  पहिली पत्नी ब्रिटीश वंशाची लोरेन ब्राइट म्हणजे किरण आणि दुसरी पत्नी सोनी रझदान.  किरणला पूजा आणि राहुल ही दोन मुलं झाली.  महेशने पूजाला 'डॅडी'मध्ये संधी दिली.  सोनी रजदान-महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिच्यासाठी महेश भट्ट यांनी 'सडक 2' घोषणा केली आहे.  नानाभाई आपल्या दोन कुटुंबांना एकत्र करू शकले नाहीत, मात्र त्यांच्या नंतरच्या पिढीने हे काम केले.  हाच खरा नातेसंबंधांचा  'अर्थ' आणि 'सारांश' आहे.

1 comment:

  1. नानाभाई भट्ट हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते, ज्यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांची निर्मिती केली. मिस्टर एक्स, झिम्बो कम्स टू टाऊन, लाल किला याशिवाय निरुपा रॉय आणि अशोक कुमार अभिनीत ब्लॉकबस्टर 'कंगन' यासह शंभरहून अधिक काल्पनिक आणि पौराणिक चित्रपट बनवले. त्यांचा जन्म:१२ जून १९१५ रोजी पोरबंदर येथे झाला तर मृत्यू २४ एप्रिल १९९९ रोजी मुंबईत झाला.

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...