'युं ही कोई मिल गया था...'
कमाल अमरोही यांच्या'पाकिजा' या क्लासिक चित्रपटाचा काही निवडक म्युझिकल चित्रपटांमध्ये समावेश होतो. या चित्रपटात सुरांची कमाल दाखवली होती संगीतकार गुलाम मुहम्मद यांनी! पण दुर्दैव असे की त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात यशस्वी आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या या चित्रपटाचे यश पाहण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. गुलाम मुहम्मद यांनी 'पाकिजा' चित्रपटातील प्रत्येक गाण्यांसाठी मोठी मेहनत घेतली होती. आठवा- 'युं ही कोई मिल गया था सरे राह चलते चलते...' मीनाकुमारीचे गुलाबी पाय, राजकुमार यांचे दमदार संवाद, लताचा दिलकश आवाज आणि कैफ भोपाली यांचे जादुई 'अल्फाज' याने सगळे वेडे होऊन जातात.
इंजिनच्या शिट्टीबरोबर गाणे ज्यावेळेला संपते ,तेव्हा गुलाम मुहम्मद यांचा आठवणीतील तर्जाचा 'तिलीसम' तुटतो. 'मौसम है आशियाना...' च्या इंटरल्युडमध्ये घुंगरांची 'खणक' असेल, किंवा 'इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा...' मध्ये धूनकणारा तबला किंवा मग 'आज हम अपनी दुआओ का असर देखेंगे...' मध्ये सारंगीची कमाल...गुलाम मुहम्मद यांनी प्रत्येक गाण्यांमध्ये अनेक 'तजुरबात' ची जमवलेली पुंजी डावावर लावली होती. 'पाकिजा' मधील प्रत्येक 'बंदिश' त्यामुळेच मैलाचा दगड सिद्ध झाली.
बिकानेर मध्ये जन्मलेल्या गुलाम मुहम्मद यांना तबल्याचा 'हुनर' त्यांच्या वडिलांकडून (नबीबक्ष) वारशाने मिळाला होता. त्यांनी ढोलकी आणि पखवाज यांचीही तालीम केली. ते काही वर्षे लाहोरच्या अलबर्ट थिएटरमध्ये 'तबलानवाज' राहिले. आर्थिक तंगीमुळे थिएटर बंद झाले आणि कामाच्या शोधात गुलाम मुहम्मद मुंबईला आले. बऱ्याच'जद्दोजहद' नंतर 'राजा भर्तृहरी' (1932) मध्ये तबला वाजवण्याचे काम मिळाले. काही वर्षांनंतर संगीतकार श्यामसुंदर यांनी त्यांना आपल्या टीममध्ये सामील करून घेतले. गुलाम मुहम्मद यांनी वरिष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांच्यासोबतही काम केले.
'संजोग' (1943) पासून गुलाम मुहम्मद संगीतकार नौशाद यांचे सहाय्यक बनले. 'आन'(1952) पर्यंत ही सोबत राहिली. श्यामसुंदर सोबत असताना गुलाम मुहम्मद यांनी 'मडक्या'चा सुंदर वापर करण्याची कला अवगत केली होती. हा वापर त्यांनी नौशाद यांच्या संगीतातही सराईतपणे वापर केला. त्यांचा तबला नौशादच्या 'मौसिकी की जान' होता. 'दर्द', 'उडन खटोला', 'बाबुल', 'अंदाज', 'मेला', 'शबाब', आणि 'दुलारी' सारख्या चित्रपटांमध्ये नौशाद यांचे संगीत यादगार बनले, याचे बहुतांश श्रेय गुलाम मुहम्मद यांना जाते.
'मेरा ख्वाब'(1943) पासून गुलाम मुहम्मद यांनी संगीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी राजस्थानच्या लोकगीतांचा आधार घेऊन धुने तयार केली. 'पाकिजा' शिवाय गुलाम मुहम्मद यांच्या खात्यात मोठ्या बजेटचा 'दिल-ए-नादान' (कारदार प्रॉडक्शन) आणि 'मिर्जा गालिब' (मिनर्वा मुव्हीटोन) सारखे एक दोन चित्रपटातच त्यांना आपला 'हुनर' आजमावण्यास संधी मिळाली. गुलाम मुहम्मद यांनी शायरी आणि चांगल्या गायक कलाकारांचा पुरेपुर वापर करून घेतला. तलत महमूद, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांचा चांगला उपयोग करून घेतला.
गाणे कसेही असो, गुलाम मुहम्मद आपल्या गोड चालीने त्यात जिवंत पणा आणायचे. 'दिल नादान तुझे हुआ क्या है'(मिर्जा गालिब- तलत,सुरेय्या/शकील) याची गोडी कालासुद्धा कमी करू शकला नाही. या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'चल दिया कारवां' (लैला मजनू, तलत/शकील) च्या माध्यमातून त्यांनी वाळवंटात तडफडणाऱ्या मजनू चा दर्द 'बयान' केलं आहे. 'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' (शमा/सुरैया/कैफी आजमी), 'आज भी हमारी धडकने बढा देता है', 'जिंदगी देने वाले सुन' (दिल ए नादान/तलत/ शकील), 'तो ऊपर वाले की सत्ता को चुनौती है', 'चलो दिलदार चलो'(पाकिजा/कैफ भूपाली) मध्ये राफीच्या वाट्याला मुखड्यांच्या ओळी आल्या, पण अंताऱ्यात गुलाम मुहम्मद ने त्यांच्याकडून असा काही आलाप गाऊन घेतला की रफी हा 'नगमा' लुटून नेतात. 'लादे मोहे बालमा आसमानी चुडियां' (रेल का डिब्बा/शकील)मध्ये शमशादसोबत रफीच्या स्वराने असा काही 'रफ्तार' पकडला आहे की शंकर महादेवनदेखील चकित होऊन जातील.
'पाकिजा' पासून गुलाम मुहम्मद यांना खूप अपेक्षा होत्या. पण आर्थिक तंगी, मोठ्या कलाकारांच्या तारखांची झंझट, 'अग्निकांड' मुळे नुकसान आणि मीना कुमारी -कमाल अमरोही यांच्या भांडणांमुळे हा भव्य चित्रपट आठ वर्षे प्रदर्शित होण्यासाठी लटकला. 'पाकिजा' च्या उतुंग यशाची चव चाखण्याअगोदरच गुलाम मुहम्मद यांनी 17 मार्च 1968 रोजी या जगाचा निरोप घेतला. तीस वर्षांपासून संगीताची सेवा करणाऱ्या या महान कलाकाराला खांदा द्यायला या चित्रपट सृष्टीतील कोणी नामवंतसुद्धा गेला नाही. वर्तमान पत्रातदेखील त्यांच्या निधनाची बातमी तीन ओळीतच संपली. बऱ्याच अंतरानंतर पाकिजा प्रदर्शित झाला, त्यात संगीतकार नौशाद यांचे नावही जोडण्यात आले. या चित्रपटात नौशाद यांनी एक गीत आणि थोडे बॅक ग्राऊंड म्युझिक दिले होते. सगळी मेहनत मात्र गुलाम मुहम्मद यांची होती.

मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा:प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे निधन, उद्या प्रदर्शित होतोय त्यांचा शेवटचा चित्रपट मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे आज (4 मे) सकाळी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेले काही महिने स्वप्नील मयेकर आजारी होते. त्यांचा 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 'मराठी पाऊल पडते पुढे' हा स्वप्नील मयेकर यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता.
ReplyDelete