Sunday, May 17, 2020

अभिनेता सलीम खान

स्टार रायटर जोडी सलीम-जावेद यातील एक पार्टनर सलीम खानला जुनी आणि नवी पिढी चांगलीच ओळखते. पण अभिनेता सलीम म्हणून नव्या पिढीला तो अजिबात परिचित नाही. खूपच कमी लोकांना माहीत असेल की, सलीमने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ऍक्टर म्हणून केली आहे. जुन्या काळातील जानेमाने चित्रपटकर्ते के.अमरनाथ यांनी सलीमचा फोटोजेनिक फेस आणि लुक पाहून खूप प्रभावित झाले होते. त्यांनी चारशे रुपये महिना मेहनताना ठरवून सलीम याला आपल्या चित्रपटाशी साइन केले. त्यांनी त्यांच्या पहिल्या 'काबुली खान' मध्ये पहिला ब्रेक दिला. याच्या टायटल रोलमध्ये अजीत होता आणि त्याची हिरोईन होती हेलन. 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलीमने अजितच्या भावाची भूमिका केली होती. 

परंतु नंतर साइन केलेले सलीमने दोन चित्रपट अगोदर प्रदर्शित झाले. सलीमचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता, 'रामुदादा'. 1963 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात सलीम नायक होता तर नायिका होती जयमाला.निर्माता,दिग्दर्शक असलेल्या आदर्श यांच्या या चित्रपटाच्या पडद्यावर त्याचे नाव 'प्रिन्स सलीम' लिहिले होते.  'रामुदादा' नंतर आलेल्या 'प्रोफेसर' (1962)  चित्रपटात सलीम परवीन चौधरीच्या अपोजीट सेकंड लीड रोलमध्ये दिसला. अशा प्रकारे त्याचा ऍक्टर म्हणून प्रवास सुरू झाला.  'बचपन' (1963) मध्ये त्याची नायिका होती. मेनका इरानी. या चित्रपटात महमंद रफी यांनी गायिलेले 'मुझे तुम से मोहब्बत है मगर मैं कह नहीं सकता..' हे यादगार गीत  त्याच्यावरच चित्रित करण्यात आले होते.
इथे वाचकांना सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की, 'सरहदी लुटेरा' या स्टंट चित्रपट सलीमच हिरो होता. डॉयलॉग रायटर होते, जावेद अख्तर. या चित्रपटाच्या दरम्यानच या दोघांची दोस्ती झाली. नंतर आलेल्या विजय आनंद दिग्दर्शित 'तिसरी मंजिल' (1966) आणि राज कपूर- सायरा बानू स्टारर 'दिवाना' (1967) सारख्या हिट चित्रपटांमध्ये सलीम महत्त्वाच्या भूमिकेत होता. ऍक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, पण स्टार मात्र बनू शकला नाही. पण नंतर आपल्या 'कलम' ची कमाल दाखवत त्यांनी यशाचे उतुंग शिखर गाठले. एकेकाळी त्यांनी कलाकारांपेक्षा अधिक मेहनताना घेतला आहे.

1 comment:

  1. सलीम अब्दुल रशीद खान एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहे. पटकथा लेखक म्हणून त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या पटकथा, कथा आणि पटकथा लिहिल्या. खान हा जावेद अख्तर सोबत सलीम-जावेद या विपुल पटकथालेखन जोडीचा अर्धा भाग आहे.
    जन्म: 24 नोव्हेंबर 1935 (वय 86 वर्षे), इंदूर
    पालक: अब्दुल रशीद खान
    जोडीदार: हेलन (m. 1981), सुशीला चरक (m. 1964)
    मुले: सलमान खान, अलविरा खान अग्निहोत्री, अर्पिता खान, सोहेल खान, अरबाज खान
    नातवंडे: अलिझेह अग्निहोत्री, अयान अग्निहोत्री, योहान खान, अहिल शर्मा, आयत शर्मा, अधिक

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...