हिदी रूपेरी पडद्यावर तिचा प्रवेश अचानक झाला.ती आपल्या बहिणींसोबत चित्रपटाचे चित्रिकरण पाहण्यास गेली होती. नूरजहाँ अभिनीत 'जिनत' चित्रपटातील 'आहे न भरी शिकवे न किए कुछ भी न जुबाँ से काम लिया...' या गाजलेल्या कव्वालीचं चित्रिकरण सुरू होते. यात शशिकला, शालिनी व काही मुलींचा सहभाग होता. कव्वालीसाठी तिच्या दोन्ही बहिणींची निवड झाली होती. त्यांच्यासोबत तीहि आली होती. या दरम्यान शौकत हुसेन यांची तिच्यावर नजर पडली आणि या बोलक्या डोळ्यांच्या मुलीला त्यांनी चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. तिनहि आवेवेढे न घेता पटकन् होकार दिला... ती म्हणजे श्यामा!
हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी झाला. श्यामाने नूरजहाँचा अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट सुमारे पंचवीस वेळा पाहिला. त्याकाळी आजच्यासारखी अभिनय प्रशिक्षण केंद्र नव्हती. जे काही शिकल जायचं ते चित्रिकरण अनुकरणान. नूरजहाँची जबरदस्त चाहती असलेली श्यामा, नूरजहाँचा अभिनय सूक्ष्मपणानं पाहात असे. श्यामाचं खरं नाव खुर्शिद! पण त्या काळात याच नावाच्या दोन अभिनेत्री पडद्यावर वावरत होत्या. एक होती, 'तानसेन'मध्ये 'घटा घनघोर घोर...' गाणारी, तर दुसरी मीनाकुमारीची बहीण. विजय भट्ट यांनी तिला 'नई माँ'च्यावेळी श्यामा हे नवं नाव दिल. श्यामाला नंतर फिल्मिस्तानचा चित्रपट मिळाला. त्या काळात फिल्मिस्तानचं नाव मोठं होतं. या संस्थेने आपली निवड केल्याची बातमी श्यामाला कळताच ती आनंदाने अक्षरशः उड्या मारायला लागली. आय. एस. जोहर पहिल्यांदाच दिग्दर्शक बनत होते. त्यांनी श्यामा आणि
प्रदीपकुमार यांची 'स्कीनटेस्ट' घेतल्यानंतर फिल्मिस्तानने श्यामाशी तीन वर्षाचा करार केला. १५ दिवस फिल्मिस्तानचे, तर १५ दिवस बाहेरचे चित्रपट करण्याचे तिला सांगण्यात आले.
या संस्थेचे श्यामाने केलेले 'श्रीमतीजी', 'शत', 'बदनाम' हे तीन चित्रपट व बाहेरचे तराना व सजा उल्लेखनीय आहेत. विमल रॉय यांनी तिला 'माँ' चित्रपटासाठी भारतभूषणसोबत घेतले होते. श्यामाला संगीतकार नौशाद यांनी 'दिल्लगी'मध्ये सुरेय्यासोबत गावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु श्यामाला गाणं काही जमलं नाही. आपला आवाज बेसुर असल्याचं सांगूनही नौशादनी तिला गायला लावले होते. अखेर हे गीत गीता दत्तकडून गाऊन घेण्यात आलं.
काही चित्रपटांमध्ये दाखवलं जातं, की नायिकेचा घोडा उधळतो, नायिका 'बचाव, बचाव' असे ओरडत असते.
नंतर नायक तिच्या मदतीला धावतो वगेरे... असा प्रसंग श्यामाच्याबाबतीत प्रत्यक्षात घडला होता. 'रूपलेखा' चित्रित चित्रपटात तिला घोडेस्वारीचे दृश्य करायचे होते.
दृश्य सुरू झाले. प्रारंभी शांत राहिलेला घोडा उधळला आणि सैरावैरा पळायला लागला. श्यामा ओरडत राहिली. घोडा चित्रिकरण स्थळापासून दूरवर गेला. श्यामानेच हिंमत करून घोड्यावरून उडी घेतली. ती गवतावर पडल्याने विशेष काही झाले नाही, अन्यथा
तिची खैर नव्हती. असाच बाका प्रसंग आणखी एकदा
तिच्यावर आला. 'विलायती पास' या पंजाबी चित्रपटाचे चित्रिकरण चाललं होतं. अन्य कलाकारांसोबत तिच्यावर नृत्य चित्रित केलं जात होतं. यावेळी उपस्थितांमधील जॉनी वॉकर सारखा सारखा तिच्या पायाकडे पाहात होता. श्यामा त्याला म्हणाली, 'काय पाहतोस?' जॉनी म्हणाला, 'तुझे पाय फार सुंदर आहेत!' श्यामा हसून म्हणाली, 'देवाचं देणं आहे।'
जेवणाची वेळ झाली... सर्वांची जेवण गप्पा चालल्या असतानाच अचानक चित्रिकरणासाठी उभारलेला सेट पडला. खांबाच्या माराने तिचा पाय सुजला. या घटनेबद्दल बोलताना श्यामा म्हणते,"जॉनीची नजर लागली!"
"बरसात की रात' मधील 'मुझे मिल गया बहाना 'तेरी प्रीत का...' हे लता मंगेशकर यांनी म्हटलेलं लोकप्रिय गीत सुरुवातीला मधुबालावर चित्रित करण्यात येणार होतं, पण तिच्या आजारपणामुळे ते गाणं श्यामावर चित्रित करण्यात आलं. आपल्या सहकालाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारी श्यामा मधुबाळाच्या नावाने मात्र खडे फोडत राहिली. तिच्याबाबतीत ती म्हणते," शी वॉज श्रुड (चलाख), शी वॉज नॉन को ऑपरेटिव्ह'.
'बरसात की रात' दरम्यान श्यामाला मधुबालाने बराच त्रास दिला असल्याचे ती सांगते. गंभीर दृश्यावेळी श्यामाच्या संवादावेळी मधुबाला कुत्सितपणे हसत असे. श्यामा त्यामुळे निराश होई आणि संवाद विसरले जात. अखेर दिग्दर्शकाकडून मधुबालाला समज देण्यास भाग पाडले. यापूर्वी गीते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चित्रित केलं जातं नसे. परंतु 'भाई भाई' मधील 'ए दिल मुझे बता दे...' हे गीत श्यामावर प्रथमच तुकड्या-तुकड्यानी चित्रित करण्यात आलं. हे गीत पडद्यावर आकर्षक झालं. गीता दत्तने गायलेले हे गीत लोकप्रिय झालं. श्यामाच्या चाहत्यांनी तिच्यावर पत्रांची बरसात केली.
त्या काळात श्यामाने दिलीपकुमार, राज कपूर, देवआनंद, बलराज सहानी, शम्मी कपूर, प्रदीपकुमार, भारतभूषण, चंद्रशेखर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले आहे. प्रारंभी ती सहनायिकेच्या रूपातहि तितकीच लोकप्रिय झाली.
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक विमल रॉय, गुरुदत्त, विजय भट्ट, पी. एल. संतोषी आणि एल. व्ही. प्रसाद यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची तिला संधि मिळाली. मीनाकुमारी ही तिची आवडती नायिका होती. या दोघींनी 'शारदा' चित्रपटात एकत्र भूमिका केल्या होत्या. 'शारदा'साठी तिला फिल्मफेअर पुरस्कारहि मिळाला होता. 'भाभी', 'छोटी बहन', 'स्वर्ण-सुंदरी', 'मेहरबान', 'गुमराह' हे श्यामाचे अन्य पुरस्कारप्राप्त चित्रपट. 'सजा' चित्रपटाच्या निर्मिति काळात फली मिस्त्रीसोबत तिचे मैत्रीचे संबंध आले. नंतर त्यांनी विवाह केला. आरोग्य आणि सौंदर्य टिकविण्यासाठी उकडलेल्या भाज्या आणि ग्लुकोजचे पाणी पिणारी श्यामा विवाहानंतर मात्र या दिनचर्येला कंटाळली. नंतर तिने सर्व पथ्ये तिने सोडून दिली. पुढे ती नणंद, भावजयी, आई, सावत्र आई अशा प्रकारच्या चरित्र भूमिका करत राहिली.
मुंबई येथील अंजुमन विद्यालयात शिकलेली श्यामा १९४५ मध्ये या चंदेरी दुनियेत आली. तिने जवळजवळ १९९ चित्रपटांत काम केले. आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीनंतर ती चंदेरी दुनियेतून निवृत्त झाली. जे. पी. दता यांचा 'हथियार' हा तिचा शेवटचा चित्रपट होय.

श्यामा ही एक भारतीय अभिनेत्री होती जी हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. 1945-1989 दरम्यान त्या सक्रिय होत्या. ती आर पार आणि बरसात की रात मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.
ReplyDeleteजन्म: ७ जून १९३५, लाहोर, पाकिस्तान
मृत्यू: 14 नोव्हेंबर 2017, मुंबई
पूर्ण नाव: खुर्शीद अख्तर
पुरस्कार: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार (1958)
मुले: शिरीन मिस्त्री, रोहीन मिस्त्री, फारूख मिस्त्री