एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या कुटुंबांकडून, खास करून मुलीच्या घरच्यांकडून मुलींना या क्षेत्रात यायला कडाडून विरोध होता म्हणजे पाबंदीच होती. असे असतानाही त्याकाळात दुर्गा खोटे, लीला चिटणीस, शोभना समर्थ, वनमाला अशी शांता आपटे सारख्या अनेक अभिनेत्रींनी सगळ्या सामाजिक, कौटुंबिक विरोधाची पर्वा न करता सिनेमामध्येच आपले करिअर शोधले. यात एक नामवंत नलिनी जयवंत हिचाही समावेश आहे.
1941 मध्ये 'राधिका' या चित्रपटापासून आपल्या अभिनय जीवनाला सुरुवात करणाऱ्या नलिनी जयवंत यांचा नायिका म्हणून शेवटचा चित्रपट होता,'बॉम्बे रेसकोर्स'. हा चित्रपट 1965 साली प्रदर्शित झाला होता. यानंतर जवळपास अठरा वर्षांनंतर पुन्हा ती 1983 मध्ये 'नास्तिक' चित्रपटात दिसली. पण चरित्र अभिनयाचा हा काळ तिला काही 'रास' आला नाही. आणि मग त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला.
मुंबईत एका प्रतिष्ठित मराठी कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या नलिनी जयवंत यांचे वडील एक कस्टम अधिकारी होते. लहान असताना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती हिरिरीने सहभाग घ्यायची. शिवाय त्या काळातील प्रसिद्ध नर्तक मोहन कल्याणपूर यांच्याकडे कथक शिकत होती. स्वास्तिक, ड्रीमगर्ल आणि इंपिरियल ही सिनेमाघरे तिच्या घराजवळच होती. त्यामुळे तिच्या मनात चित्रपटांविषयी आकर्षण निर्माण झाले. पण त्या काळातील परिस्थिती पाहता, ती चित्रपटात काम करावं, असा विचारही करू शकत नव्हती. पण तिच्या आत्याची मुलगी शोभना समर्थ हिने तेव्हा चित्रपटांमध्ये चांगलं नाव कमावलं होतं. पण त्यामुळे नलिनीचे वडील तिच्यावर नाराज होते.
एकदा शोभना यांची मुलगी नूतन हिच्या वाढदिवसावेळी नॅशनल स्टुडिओचे मालक चिमनभाई देसाई यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते 'राधिका' चित्रपटाची तयारी करत होते. या चित्रपटाच्या लीड रोलसाठी चिमनभाई देसाईंनी तिला घेण्यासाठी तिच्या वडिलांची परवानगी घेतली. यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. त्यावेळेला तिचं वय फक्त तेरा होतं. वीरेंद्र देसाई दिग्दर्शित या चित्रपटाचे नायक होते हरीश, ज्यांनी पुढे तारा हरीश या नावाने 'लालटेन', काली टोपी लाल रुमाल, दो उस्ताद, आणि बर्मा रोडसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
नलिनीचे चाळीसच्या दशकात राधिका, निर्दोष, बहन, आँखमिचोली, आदाब अर्ज, गुंजन, चकोरी, आणि मुकद्दर सारख्या एकूण 38 चित्रपटांमध्ये गीते गायली. पण पुढे जाऊन तिला आपले लक्ष्य फक्त एकटिंग वर केंद्रित करावे लागले. 'फिल्मीस्तान' कंपनीचा 'समाधी' (1950) हा तिचा सर्वात हिट चित्रपट होता. याचा नायक होता, अशोक कुमार. अशोक कुमार सोबत नलिनीचे नंतर 'संग्राम', 'जलपरी', 'काफिला', 'नौबहार', 'सलोनी', 'लकीरे', 'नाज', 'मिस्टर एक्स' आणि ' शेरू'मध्ये काम केलं. नाज (1954) परदेशात चित्रित करण्यात आलेला पहिला हिंदी चित्रपट होता. मुकेशचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता ,'निर्दोष'(1941). आणि सुनील दत्ताच पहिला चित्रपट होता, 'रेल्वे फ्लॅटफॉर्म' (1955) याचीही नायिका नलिनीच होती. अजीतसोबतही नलिनीची जोडी चांगली जमली. त्याच्यासोबत तिने नास्तिक, आनबान, इंसाफ, भारती, कितना बदल गया इंसान, मिस बॉम्बे, मिलन, माँ के आंसू, गर्ल्स हॉस्टेल, आणि बॉम्बे रेसकोर्ससारख्या चित्रपटात काम केले. देव आनंद सोबत नलिनीचे राही, मुनीमजी आणि कालापानी हे तीनही चित्रपट त्याकाळातले यशस्वी चित्रपट राहिले. जवळपास 23 वर्षाच्या तिच्या सिनेमा करिअर मध्ये तिने 60 चित्रपटांमध्ये नायिका म्हणून काम केले. त्याकाळातील जानेमाने चरित्र अभिनेता राधाकिशनद्वारा 1961 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या ' अमर रहे यह प्यार' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दिग्दर्शक प्रभुदयाल यांच्याशी जवळीक वाढली आणि लवकरच ती विवाह बंधनात अडकली. हा नलिनीचा दुसरा विवाह होता. 'राधिका' चे दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झालेला तिचा पहिला विवाह यशस्वी झाला नव्हता.
चरित्र अभिनेत्री नलिनी हिने 'नास्तिक'(1983) हा एकच चित्रपट केला. या चित्रपटात तिने नायक अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली होती. नलिनी सांगते की, ती भूमिका स्वीकारली ही माझी खूप मोठी चूक होती. चित्रपट रिलीज झाला तेव्हा जाणवलं की, मला जसं सांगण्यात आलं होतं, तसं चित्रपटात काही नव्हतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीला रामराम ठोकणे, हेच मला योग्य वाटलं.
20 डिसेंबर 2010 रोजी मुंबईतील चेंबूर उपनगरात असलेल्या तिच्या राहत्या घरी निधन झालं. जन्म 18 फेब्रुवारी1926 रोजी झाला होता. शेवटच्या काळात त्यांचा चित्रपटाशी संबंध पूर्णपणे तुटला होता.

No comments:
Post a Comment