हेमामालिनी यांच्याबाबतीत बऱ्याच लोकांना असं वाटतं की, शोमन राजकपूरने 'सपनों का सौदागर' या चित्रपटातून हेमामालिनीला हिंदी सिनेमात ब्रेक दिला. पण सत्य मात्र वेगळंच आहे. राज कपूरने तिला ब्रेक दिला नव्हता, कारण तो एक फक्त हिरो होता. या चित्रपटाचे निर्माता होते अनंत स्वामी, ज्यांनी एका साऊथच्या मुलीला म्हणजे हेमामालिनीला चित्रपटात घेऊन धोका पत्करला होता. ही गोष्ट स्वतः हेमामालिनीने एकदा बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
ज्या काळी तिने हा चित्रपट केला होता, त्यावेळी तिचं वय अवघे 16 होते. या चित्रपटात ती काय म्हणाली हे तिच्याच पहा...."तेव्हा मला माहीतही नव्हतं की, इतक्या मोठ्या मानासासोबत काम केल्याने काय परिणाम होतात. आज ज्यावेळेला मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की, मी काय केलं? मी तर राज कपूर यांचे आभारच मानेन, कारण त्यांनी एक अशा मुलीसोबत काम करण्यास तयार झाले, जिला त्यावेळेला कशाचाच गंध नव्हता. माझ्यासोबत काम करायला त्यांनी होकार द्यावा, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
हेमामालिनी मुलाखतीत पुढे म्हणते की, राज कपूर आपल्या चित्रपटात अभिनेत्रींना खूपच सुंदररित्या इन्ट्रोड्युस करत. पण माझ्या सोबत असे काही नव्हते. कारण ' 'सपनों का सौदागर' मध्ये ते माझे फक्त को-स्टार होते. पण त्यांचे वागणे माझ्याशी खूप छान होतं आणि मला सतत प्रोत्साहन द्यायचे. राज कपूर ही अशी पहिली व्यक्ती आहे, ज्यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली. टेस्ट झाल्यावर ते म्हणाले की, या मुलीमध्ये स्टार मटिरियल आहे. त्यांच्या मुळेच मी आज तुमच्यासमोर उभी आहे. कारण त्यामुळेच अनंत स्वामी यांनी मला चित्रपटात घेण्याचे धाडस केले. नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कौल यांना बोलावण्यात आले. आणि अशा प्रकारे ' 'सपनों का सौदागर' का बनली आणि ड्रीम गर्लचा जन्म झाला.
ज्यावेळेला हेमामालिनी राज कपूरसोबत काम करत होती, तेव्हा तिला त्याच्याविषयी स्पेशल असं काही जाणवत नव्हतं. तिने एक सामान्य कलाकार या नात्यानच राज कपूर यांना समजलं. खरे तर त्यावेळी राज कपूर यांचे 'स्टारडम' चमकत होते. हेमा सांगते, मला हे सगळं कळत नव्हतं, कारण मी खूप लहान होते. माझी आई म्हणाली की राज कपूर हा खूप मोठा हिरो आहे. मी त्यांच्याबाबतीत एवढंच जाणून होते. मला त्यांच्यासोबत काम करताना कसली भीती वाटली नाही. कारण मला याच्या परिणामाबाबत काही माहीतच नव्हते. जितकं डायरेक्टर सांगायचा, तेवढं मी करत होते. कदाचित नंतर त्यांच्यासोबत काम केलं असतं तर मात्र मला भीती वाटली असती. पुढे या चित्रपटानंतर हेमामालिनी 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली.

No comments:
Post a Comment