बॉलिवूड अभिनेत्री एखाद्या चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये घेत असतात शिवाय जाहिराती, शो इत्यादी कार्यक्रमांमधून पैसेही कमवतात. आपल्याला माहितच आहे की बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्री खूप श्रीमंत आहेत, परंतु या नायिकांपैकी सर्वात श्रीमंत कोणीतरी एकटीच असणार ना? वर्ल्डटॉपस्ट वेबसाइटनुसार बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी आली आहे. त्यावर थोडी नजर टाकू या
सोनाक्षी सिन्हा - माजी मिस इंडिया पूनम सिन्हा आणि नेता, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी जन्माला आलेल्या सोनाक्षी सिन्हाने अनेक चित्रपट केले आहेत आणि गाजलेही आहेत आणि त्याचबरोबर अनेक चित्रपटांसाठी पुरस्कारही तिला मिळाले आहेत. तिची मालमत्ता सुमारे 10 दशलक्ष डॉलर्स आहे.
दीपिका पादुकोण- बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन मिळविणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणकडे पाहिले जाते.तिने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक ब्रँडच्या जाहिरातीतही ती सातत्याने दिसत असते. तीची एकूण संपत्ती 10 दशलक्ष डॉलर्स आहे.
बिपाशा बसु- बिपाशा अद्याप चित्रपटांपासून दूर असली तरीही तिने यापूर्वी अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. आपल्या विशिष्ट व्यक्तिरेखेसाठी परिचित असलेल्या बिपाशाची संपत्ती 15 दशलक्ष डॉलर्स आहे.
विद्या बालन - अभिनयाचा अस्सल गुण असलेल्या या अभिनेत्रीने अनेक सुंदर चित्रपट दिले आहेत. आज ती श्रीमंत घरची सून असली तरी तिची स्वतः ची अशी मोठी संपत्ती आहे. चित्रपट तसेच जाहिराती आणि शोमधून तिने संपत्ती मिळवली आहे. तिने पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात 'हम पांच' या हिंदी मालिकेपासून केली आणि नंतर अनेक सुपरहिट चित्रपट केले. तिची एकूण मालमत्ता 10 दशलक्ष डॉलर्स आहे.
सोनम कपूर- सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे आपला वेगळा ठसा उमटविला आहे आणि ती देखील एक श्रीमंत कुटुंबातील आहे. 'सांवरिया' या चित्रपटापासून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर तिने अनेक चित्रपट केले आहेत. तिची एकूण मालमत्ता 15 दशलक्ष डॉलर्स आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...
No comments:
Post a Comment