Sunday, June 14, 2020

चोखंदळ अभिनेत्री:राधिका आपटे

राधिका आपटे ही एक बिनधास्त आणि सडेतोड स्वभावाची आहे. तिचे विचार बोल्ड आहेत,पण तितकीच सशक्त अभिनेत्री आहे. 'हंटर' आणि 'बदलापूर...' च्या यशानंतर ती मेनस्ट्रीम मधली नायिका म्हणून ओळखली जाऊ लागली.  'पॅडमॅन'सारख्या चित्रपटात राधिकानं जे काम केलं आहे,त्यामुळे तिची स्वतःची स्वतंत्र ओळख प्रस्थापित झाली आहे. मात्र तिच्या अभिनयापेक्षा तिच्या अन्य गोष्टींमुळेच अधिक ती चर्चेत राहिली आहे.

राधिकाचा जन्म तामिळनाडू राज्यातील वेल्लोरमध्ये झाला असला तरी ती लहानाची मोठी झाली ती पुण्यात. 'आनंद घन' ही तिची शाळा. येथूनच तिच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला. शाळेत असतानाच तिने हा चॉईस निवडला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ती नाटकाकडे वळली. यात तिचं कौतुक व्हायला लागलं. ती कथ्थक शिकली आहे. 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात तिने छोटीशी भूमिका केली. नंतर तिने 'अंतहीन' हा बंगाली चित्रपट केला. या चित्रपटात ती राहुल बोस आणि शर्मिला टागोर यांच्याबरोबर मुख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. खऱ्या अर्थानं या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. 2009 मध्ये तिने अमोल पालेकर यांचा 'समांतर' आणि सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा 'घो मला असला हवा' हे दोन चित्रपट केले.
या चित्रपटांना यश मिळालं नसलं तरी हळूहळू तिचं नाव होऊ लागलं होतं. याच काळात तिला दक्षिणेकडून ऑफर येत होत्या. नंतर ती इतकी बिझी झाली,पण सर्वच भाषा क्षेत्रात ती लीलया संचार करत होती. 'हिंदीत 'शोर इन द सिटी', मराठीत 'तुकाराम', बंगालीमध्ये 'रुपकथा न्योय' ,तेलगूमध्ये 'धोनी', तामिळमध्ये 'वेत्री सेलवन' अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. भाषा आत्मसात करणं हे अवघड कामदेखील तिनं केलं. कच्छ व्यक्तिरेखा असो किंवा 'कबाली'मध्ये सुपरस्टार रजनीकांतच्या बायकोची भूमिका असो कोणत्याही प्रांतात फिट बसू शकतो असा तिचा चेहरा आहे.
तिला सर्वच प्रकारच्या भूमिका करायच्या आहेतच शिवाय ' आयटम सॉंग'चीसुद्धा तिला आवड आहे. पण तरीही ती चित्रपट स्वीकारताना अनेक गोष्टी तपासून पाहते. तिला शोभेची बाहुली बनायचं नाही. तिच्या योगायोगाने तिला धाडसी,कलात्मक भूमिका करण्याची संधी मिळत आहे. यआ चित्रपट सृष्टीत येऊन तिला एक तप होऊन गेलं आहे, मात्र अजूनही तिला तिच्या मनासारख्या भूमिका करायच्या आहेत.

1 comment:

  1. राधिका आपटे जन्मदिवस 7 सप्टेंबर 1985

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...