Wednesday, July 1, 2020

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा च्या चित्रपट कारकिर्दीला आज 18 वर्षे झाली. आता तिच्या कारकिर्दीला उतरंड लागली आहे. मात्र तिने या कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस नायिका एवढीच आपली ओळख मर्यादित राहू न देता, तिने काही प्रमाणात आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. शिवाय काही काळ ती हॉलिवूडमध्ये सक्रिय होती. तिथले चित्रपट, मालिका आणि चॅट शोमध्ये तिने कामं केली आहेत.  अलीकडच्या काही वर्षांत तिने मर्यादित चित्रपट स्वीकारले, मात्र या कालावधीत ती चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाची तिने निर्मिती केली आहे.

तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत 18 वर्षांचा काळ आघाडीची नायिका म्हणून मिरवणे तसे कठीण काम आहे, कारण एकाद्या अभिनेत्रीची कारकीर्द ही दहा वर्षांची असते. त्यात नायिकेला ग्लॅमरस जगताची कौटुंबिक पार्श्वभूमी नसेल तर संघर्ष मोठा असतो. चित्रपट मिळवण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र प्रियांका या आजच्या आघाडीच्या अभिनेत्रीला सुदैवाने असे काही करावे लागले नाही. वास्तविक प्रियांकाला अभियांत्रिकी क्षेत्राकडे जायचं होतं. परंतु तिचे सौंदर्य पाहून तिच्या आईने आणि भावाने तिच्याबाबतीत वेगळाच विचार केला. या दोघांनी तिच्या न कळत तिचा फोटो 'मिस इंडिया' स्पर्धेसाठी पाठवून दिला. मग काय 'मिस इंडिया'बरोबरच तिने 'मिस वर्ल्ड' देखील पटकावला. यानंतर रूढार्थाने ती चित्रपट क्षेत्राकडे वळली. या आधीच्या सौंदर्यवतींनी हाच कित्ता गिरवला होता. त्यामुळे तिला चित्रपट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही.
अभिनयाची कसलीच पार्श्वभूमी नसल्यामुळे सुरुवातीला तिच्याकडून कसलीच म्हणजे चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली नव्हती. मात्र उपजत सौंदर्य आणि पडदयावर सहज वावर यामुळे ती सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात यशस्वी झाली.2003 ते 2007 या चार वर्षांत तिचे 'अंदाज', 'ऐतराज', 'क्रिश',' डॉन' आदी चित्रपट यशस्वी ठरले. वास्तविक या चित्रपटतील वावर लक्षवेधी होता असं म्हणता येत नाही. परंतु चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी होणं महत्त्वाचं असतं, आणि नेमकं तेच तिच्या चित्रपटांच्याबाबतीत घडलं. 'फॅशन' चित्रपटाने मात्र तिला चांगलं यश दिलं. या वास्तववादी चित्रपटास लोकांनी डोक्यावर घेतलं. 'फॅशन' चित्रपटानंतर प्रियांकाने 'कमीने', 'सात खून माफ', 'अग्निपथ, 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कोम' आदी चित्रपट केले. यात विशेष बाब म्हणजे तिने आपल्या अठरा वर्षांच्या कारकिर्दीत फक्त 40 च्या आसपासच चित्रपट केले. 

2 comments:

  1. प्रियांकाचा नवा व्यवसाय

    प्रियांका चोप्रा सातासमुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा फडकावत आहे. अभिनेत्रीबरोबरच प्रियांका एक यशस्वी उद्योजिकाही आहे. 2021 मध्ये प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये 'सोना' नावाचे रेस्टोरंट सुरू करत हॉटेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनतर आता 'सोना होम' नावाने नवा व्यवसाय तिने सुरू केला आहे.
    'सोना होम'चे एकापेक्षा एक व्हायब्रंट डिझाईन माझा सुंदर भारत प्रतिबिंबित करतात,असं ती एका ठिकाणी म्हणते. वास्तविक प्रियांकाने डिनर सेट आणि क्रॉकरीसारख्या वस्तू अर्थातच 'व्हेंचर होमवेअर लाईन' सुरू केले आहे. विशेष बाब म्हणजे परदेशात राहूनही भारतीयांना आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी म्हणून तिने प्रत्येक वस्तूवर पारंपरिक डिझाईनची निवड केली आहे.

    ReplyDelete
  2. ग्लोबल आयकॉन असलेली भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा २०२० नंतर एकाही हिंदी चित्रपटात दिसलेली नाही. मध्यंतरीच्या काळात इंग्रजी चित्रपटांमध्ये रमलेल्या प्रियंकानं 'हॅपीनेस कंटीन्यूज' या डॉक्युमेंट्रीसह 'वी कॅन बी हिरोज', 'द व्हाईट टायगर','द मेट्रिक्स रेस्करेक्शन' या होलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी चित्रपटांपासून दूर गेलेली प्रियंका आता आणखी एका हॉलिवूडपटाद्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'लव्ह अगेन' हा प्रियंकाचा चित्रपट भारतीय सिनेमागृहांमध्ये मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात तिच्या जोडीला सॅम ह्यूघन आणि सेलिन डायन हे कलाकार आहेत.

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...