ये देश है वीर जवानों का
अलबेलोंका मस्तानों का ,
इस देश का यारो क्या कहना,
ये देश है दुनिया का गहना
1957 साली प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' चित्रपटातील हे जोशपूर्ण गाणं आहे. बी. आर.चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्या अभिनयाबरोबरच साहिर लुधियानवी आणि ओ.पी.नय्यर यांच्या गीत-संगीतामुळे संस्मरणीय ठरलेला हा चित्रपट. प्रभावी शब्दकळा, ढंगदार संगीत आणि पडद्यावरचं जोशपूर्ण नृत्य यामुळे आज 63 वर्षे उलटली तरी या गीतावर काळाच्या चुण्या पडलेल्या नाहीत. 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी हमखास हे गाणं सर्वत्र वाजतं.
यहां चौडी छाती वीरों की
यहां भोली शक्ले हिरों की,
यहां गाते हैं राझें मस्ती में
मस्तीमे झुमे बस्ती में
या शब्दातला जोश वीररसाची निर्मिती करतो आणि गीताला निर्णायक उंचीवर नेऊन ठेवतो. या शब्दसुरांना पंजाबच्या उमद्या आणि रांगड्या मातीचा सुगंध आहे. या चित्रपटाचे संगीतकार नय्यर आणि गीतकार लुधियानवी यांच्या आयुष्यातील तरुण उमेदीची वर्षे लाहोरमध्ये गेली होती. गायक महंमद रफी यांचेही बालपण लाहोरमध्ये गेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः बी. आर.चोप्रा फाळणीपूर्वी लाहोरामध्येच पत्रकार म्हणून कार्यरत होते. फाळणीनंतर ही सगळी मंडळी मुंबईत आली आणि स्थिरावली. पण पंजाबी गीत-संगीत मात्र त्यांच्या रक्तात होतं. 'नया दौर'मधील 'उडे जब जब जुल्फे तेरी', 'रेशमी कुर्ता जाली का' ही तिन्ही गाणी अस्सल पंजाबी रंगाची आणि ढंगाची आहेत. या चित्रपटासाठी गायक महंमद रफी, संगीतकार ओ. पी.नय्यर आणि अभिनेता दिलीपकुमार या तिघांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.'नया दौर' 2007 साली रंगीत होऊन पुन्हा पडद्यावर आला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment