1. मराठी अभिनेता भाऊसाहेब शिंदे याने कोणकोणत्या मराठी चित्रपटात काम केले आहे?
उत्तर- राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा, बबन आणि रौन्दळ.
2. मराठी अभिनेता सौरभ गोखले याने कोणकोणत्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे?
उत्तर- सौरभ गोखलेचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. शिक्षणानंतर काही काळ ‘टाटा मोटर्स’मध्ये नोकरीही केली. परंतु, महाविद्यालयीन स्तरावर पुरुषोत्तम करंडकसारख्या दर्जेदार स्पर्धांमधून भाग घेतला असल्यामुळे त्याचा कल कला क्षेत्राकडे होता. ‘श्रीमंत बाजीराव पेशवा मस्तानी’ या मालिकेद्वारे त्याला पहिल्यांदा कला क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. परंतु, ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘मांडला दोन घडींचा डाव’, ‘उंच माझा झोका’, ‘अरुंधती’, ‘एक मोहर आभाळ’ या त्याच्या इतर लोकप्रिय मालिका. २०१५ मधील ‘योद्धा’ चित्रपटाद्वारे त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘शिनमा’, ‘परतु’, ‘भो भो’, ‘तलाव’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हे त्याचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट.२०२२ मध्ये 'सर्कस', ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटामधील गौरव रानडेची त्याने साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंदीस उतरली.
3. बालपणापासून चित्रपट क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय?
उत्तर- डॅम इट आणि बरंच काही. कोठारे यांनी 'डॅम इट' या संवादाला जन्म दिला आहे, त्यामुळे 'धुमधडाका'मध्ये तो शब्द संवादात आपोआप आला. 'धुमधडाका'च्या नंतर आलेल्या 'दे दणादण'मध्येही हा शब्द बऱ्याचदा आला; परंतु, तो 'थरथराट'मधून' खूप लोकप्रिय झाला आणि तो कोठारे यांचा ओळख बनला. याशिवाय टकलू हैवान, कवठ्या महांकाळ, . तात्या विंचू हे सारे चित्रविचित्र, शब्द कोठारेंच्या पात्रांची विशेषत: खलनायकांची ओळख बनली.
4. पार्श्वगायिका साधना सरगम यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर- ७ मार्च १९७४ रोजी जन्मलेल्या साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म दाभोळ येथे झाला. बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. साधना सरगम यांनी १९७८ मध्ये आलेल्या फिल्म ‘तृष्णा’साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते ‘पम परम पम बोले जीवन की सरगम’. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२ मध्ये आलेल्या ‘विधाता’ या चित्रपटातील ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना सरगम यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती. दाक्षिणात्य गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन गायिका आहेत. उदित नारायण यांच्यासोबत ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धी झोतात आल्या. आजवर 34 विविध भाषांत त्या गायल्या आहेत. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’, ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. साधना सरगम यांनी अंदाजे १५०० चित्रपटात २०००च्या वर हिंदीत गाणी गायली आहेत. ५०० हून अधिक तामिळ चित्रपटात १००० च्या वर तामिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ याकाळात साधना सरगम यांनी २५०० हून अधिक बंगाली गीत गायली आहेत. त्यांनी मराठी, तेलुगु , कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाली आणि अनेक प्रादेशिक भाषेत गाणी गायली आहेत. मध्यप्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. साधना यांना साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डसोबतच पाचवेळा महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. ‘सारेच सज्जन’, ‘माहेरची सावली’, ‘जोडीदार’, ‘आधार’, ‘सरीवर सरी’, ‘एक होती वादी’, ‘एवढंसं आभाळ’, ‘आईशप्पथ’ आदी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
5. प्रश्न- 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात कोणकोणत्या अभिनेत्री काम करीत आहेत?
उत्तर- 'बाईपण भारी देवा' 30 जूनला प्रदर्शित होणार आहे. सहा बहिणींची गोष्ट आहे. ज्यात प्रेम, माया, तडजोड, जिद्द, ध्येय, दुःख, स्वार्थ अशा अनेक भावनांचा खजिना आहे. स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करतात. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, मार्धुरी भोसलेनिर्मित आणि केदार शिंदेद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांसारखे दर्जेदार कलाकार आहेत.
No comments:
Post a Comment