1.अदि नारायणराव यांनी कोणकोणत्या हिंदी चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलेय?
उत्तर- सुवर्णसुंदरी व फुलों की सेज या दोनच हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिलेय.
2. आज या नावापासून सुरू होणारे किती चित्रपट आतापर्यंत पडद्यावर आलेत?
उत्तर- आज और कल, आज का दादा, आज का दौर, आज का फरहाद, आज का हिंदुस्तानी, आज का महात्मा, आज का एम. एल. ए., आजकल, आज का यह घर, आज की आवाज, आज की बात, आजकी धारा, आज की दुनिया, आज की रात, आज की ताजा खबर, आजके शोले, आज का गुंडाराज.
3. मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता?
उत्तर- उपकार.
4. दादा कोंडके व अंजना यांनी कोणत्या चित्रपटात सर्वात प्रथम एकत्र भूमिका केली?
उत्तर- आंधळा मारतो डोळा
5. दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट कोणता?
उत्तर- अभिनेता म्हणून तांबडी माती, निर्माता म्हणून सोंगाड्या आणि दिग्दर्शक म्हणून पांडू हवालदार
6. अशोक सराफ चा पहिला मराठी आणि हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर- मराठी चित्रपट- दोन्ही घरचा पाहुणा आणि हिंदी चित्रपट- दामाद
7. सचिनचा पहिला मराठी व हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर- हा माझा मार्ग एकला हा बालकलाकार म्हणून सचिनचा पहिला चित्रपट. जिबो का बेटा हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. गीत गाता चल या हिंदी चित्रपटात तो सर्वात प्रथम नायक बनला. पारध हा मराठीतला नायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट. मायबाप या चित्रपटाद्वारा तो मराठीत सर्वात प्रथम दिग्दर्शक बनला. प्रेमदिवाने हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट.
8. दारा सिंगचा पहिला चित्रपट कोणता? त्याने कोणकोणत्या नायिकांच्याबरोबर भूमिका केल्या?
उत्तर- किंग काँग हा दारा सिंगचा पहिला चित्रपट. कुमकुम, निशी, मुमताज, अमिता, जयश्री गडकर, हेलन, परवीन चौधरी, तनुजा, अनिता या चित्रतारकांच्या बरोबर तो नायकाच्या भूमिकेत चमकला.
9. लीना चंदावरकरचा पहिला चित्रपट कोणता? संजीवकुमारबरोबर ती कोणकोणत्या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत चमकली?
उत्तर- मन का मीत हा लीना चंदावरकरचा पहिला चित्रपट. अनहोनी, मनचली, इमान, अपने रंग हजार या चित्रपटात ती संजीवकुमारबरोबर चमकली.
10. कमाल अमरोही यांचा पहिला चित्रपट कोणता? त्यानी कोणकोणते चित्रपट दिग्दर्शित केले?
उत्तर- जेलर हा लेखक म्हणून कमाल अमरोहींचा पहिला चित्रपट. महल हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर दायरा, पाकीजा, रझिया सुलतान हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
11. अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीचे नाव काय? तिने कोणकोणत्या चित्रपटात काम केले? जॅकी श्रॉफ नायक बनण्यापूर्वी काय करायचा?
उत्तर- जॅकी श्रॉफच्या पत्नीचे नाव आयेशा दत्त. तिने तेरी बाहो में या एकाच चित्रपटात नायिकेची भूमिका केली. जॅकी नायक बनण्यापूर्की मॉडेलिंग करायचा.
12. दिग्दर्शक कल्पतरू यांचे खरे नाव काय?
उत्तर- के परवेज
13. शबाना आझमी, अनंत नाग व अमोल पालेकर यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले?
उत्तर- कनेश्वर रामा
14. पडोसन हा चित्रपट सुनील दत्तची निर्मिती होती की किशोर कुमारची?
उत्तर- पडोसन हा मेहमूद चा चित्रपट होता आणि दिग्दर्शन ज्योती स्वरूप यांचे होते. सुनील दत्त, किशोर कुमार यांच्या फक्त भूमिका होत्या.
No comments:
Post a Comment