1.देवेन वर्माने कोणकोणत्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या?
उत्तर- फरारी, हा खेळ सावल्यांचा, दोस्त असावा तर असा.
2.कॉमेडियन कपिल शर्माच्या 'झ्विगाटो' या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?
उत्तर- कॉमेडियन कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. यात कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयची भूमिका केली आहे. या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका शहाना गोस्वामी साकारली आहे.
3.अजय देवगण आणि काजोल यांनी कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे?
उत्तर- अजय आणि काजोल हे दोघे 'गुंडाराज', 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'यू मी और हम' आणि 'राजू चाचा' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. काजोल आणि अजय देवगण शेवटचे 'तानाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटात एकत्र दिसले होते.
4.मनोज वाजपेयी यांच्या 'गुलमोहर' ( मार्च 2023)च्या या चित्रपटामध्ये कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीने काम केले आहे?
उत्तर- बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर. याशिवाय सिमरन आणि अभिनेता सूरज शर्मा यांनी काम केले आहे.
5.शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने कोणता विक्रम केला आहे?
उत्तर- शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने ऐतिहासिकरित्या ब्लॉकबस्टर करामत दाखवत वर्ल्डवाइड १०१२ कोटींच्या कलेक्शनसह आजपर्यंत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.
6. ट्विंकल खन्ना हिने कोणकोणती बेस्ट सेलर पुस्तके लिहिली आहेत? आणि कोणत्या पुस्तकावर पॅडमॅन चित्रपट निघाला?
उत्तर-ट्विंकल खन्ना हिने लिहिलेले 'मिसेस फनीबोन्स' हे पुस्तक 2015 मध्ये देशातील सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले आहे. 'द लिजन्ड ऑफ लक्ष्मीप्रसाद नंतर अलीकडेच तिने 'पैजामाज आर फर्गीव्हिंग' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 'द लिजन्ड ऑफ लक्ष्मीप्रसाद ' या पुस्तकात ट्विंकलनं छोट्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली एक कथा अरुणाचलम मुरूगनाथम यांच्यावर आधारित होती. याच कथेच्या आधारावर अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट आला.
7. मधुबालाची जयन्ती व पुण्यतिथी कोणत्या तारखेला येते?
उत्तर- १४ फेब्रुवारी १९३३ हा मधुबालेचा जन्मदिन २३ फेब्रुवारी १९६९ हा तिचा मृत्युदिन.
8. इन्साफ या नावाने सुरू होणारे किती चित्रपट आतापर्यंत पडद्यावर आले आहेत?
उत्तर- इन्साफ, इन्साफ का मंदिर, इन्साफ का तराजू, इन्साफ कौन करेगा, इन्साफ की तोफ, इंसाफ की आवाज, इन्साफ मैं करुंगा, इन्साफ की पुकार.
9.ज्योती या चित्रपटातील “चांद फीर नीकल आया या गाण्यात संजीवकुमार बरोबर असलेली अभिनेत्री कोण?
उत्तर- निवेदिता. धरती कहे पुकार के या चित्रपटातदेखील ती संजीवकुमारच्या नायिकेच्या भूमिकेत चमकली होती.
10. अभिनेत्री सुलोचना महाराष्ट्रीयन आहेत का?
उत्तर- त्या शंभर टक्के महाराष्ट्रीयन आहेत. मराठी चित्रपटातूनच चित्रपट व्यवसायात त्यांचा उदय झाला आहे आणि प्रपंच, संत गोरा कुंभार या चित्रपटातील भूमिकांच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारचं सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचं पारितोषिक पटकावलं आहे.
11. 'पहली तारीख' हा चित्रपट केव्हा पडद्यावर आला होता? या चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण होते?
उत्तर- पहली तारीख १९५४ साली पडद्यावर आला होता. निरुपा रॉय, राजा नेने, आगा, वसंतराव पहेलवान, रमेश कपूर, सुधा आपटे, यशोधरा काटजु, मारुती यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.
No comments:
Post a Comment