Wednesday, May 17, 2023

( फिल्म कॉर्नर) अर्जुन रामपाल बालकृष्णाच्या नव्या चित्रपटात काम करणार

 ( फिल्म कॉर्नर) अर्जुन रामपाल बालकृष्णाच्या नव्या चित्रपटात काम करणार

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल फिल्म्स अभिनेता आणि निर्माता नंदामुरी बालकृष्णाच्या पुढील चित्रपटात काम करणार आहे.चित्रपटाच्या नोंदणीने ही माहिती दिली. चित्रपट रजिस्ट्रारने सांगितले की, रामपाल आगामी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही.  हा चित्रपट रविपुडी दिग्दर्शित करत आहे आणि साहू गणपती आणि ग्रीनेश पेंडी यांच्या प्रोडक्शन बॅनर शाईन स्क्रीनने याची निर्मिती केली आहे. प्रोडक्शन बॅनरने रामपालला त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटातील तपशील सामायिक केले. त्यांनी लिहिले की, चित्रपटाची संपूर्ण टीम राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता अर्जुन रामपालचे चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी स्वागत करते. ओम शांती ओम आणि रा वन सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रामपालने सांगितले की, तो आगामी चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. त्याने लिहिले की, मला चित्रपटात सामील केल्याबद्दल धन्यवाद.  या चित्रपटात अभिनेत्री काजल अग्रवाल आणि श्रीला देखील आहेत.

 अभिनेत्री जान्हवी कपूर 'उलझ' चित्रपटात दिसणार 

अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच 'उलझ' या देशभक्तीपर चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी बुधवारी याची घोषणा केली. जेव्हा मला 'उलझ'च्या स्क्रिप्टसाठी संपर्क करण्यात आला तेव्हा मला खूप आकर्षित केले कारण एक अभिनेता म्हणून मी माझ्या कम्फर्ट झोनमधून मला बाहेर काढणाऱ्या स्क्रिप्टच्या शोधात असते, असे कपूर हिने एका निवेदनात म्हटले आहे.या चित्रपटात जान्हवी एका तरुण इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.  राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया दिग्दर्शित आणि जंगली पिक्चर्स निर्मित, 'उलझ'मध्ये कपूर, गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, राजेश तैलग, मेयांग चांग, ​​सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत आहेत.चित्रपटाची पटकथा सारिया आणि परवेझ शेख यांनी लिहिली असून संवाद अतिका ​​चौहान यांनी लिहिले आहेत.  'उलझ' चित्रपटाचे शूटिंग मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. 

अक्षय, टायगर श्रॉफचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' 2024 मध्ये ईदला प्रदर्शित होणार

अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा अॅक्शनपट 'बडे मिया छोटे मियाँ' पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची घोषणा केली.  पूजा एंटरटेनमेंट निर्मित चित्रपट कंपनीने निर्मिती केली असून अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माते जॅकी भगनानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा आमचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रकल्प आहे आणि अक्षय, पृथ्वीराज आणि टायगर या त्रिकुटासोबत काम करणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. या चित्रपटात मनोरंजनासोबतच जागतिक दर्जाचे अॅक्शन सीक्वेन्स आणि कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणा-या अभिनयामुळे लोकांच्या संवेदनाही उडतील. 2024 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा भव्य चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. स्कॉटलंड, लंडन, भारत आणि UAE मधील विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 

'द गेम ऑफ गिरगिट' या चित्रपटात अदा शर्मा पोलिसाची भूमिका साकारणार 

अभिनेत्री अदा शर्मा अभिनेता श्रेयस तळपदेच्या आगामी चित्रपट 'द गेम ऑफ गिरगिट'मध्ये दिसणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी ही घोषणा केली.  गंधार फिल्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि विशाल पांड्या दिग्दर्शित, द गेम ऑफ गिरगिट' मध्ये अभिनेत्री पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटात तिच्या मुख्य भूमिकेसाठी चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणाली की, पडद्यावर पोलिसाची भूमिका करणे खूप आनंददायी आहे. अदा शर्माने सांगितले की, याआधीही 'कमांडो' चित्रपटात मी पोलिसाची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटातील भावना रेड्डी यांच्या भूमिकेने मी खूप लोकप्रिय झाले होते. आता यातील गायत्री भार्गगची भूमिका आगामी चित्रपटात एका वेगळ्या प्रकारातील पोलिसाच्या भूमिकेत दिसणार  आहे.चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते, "द गेम ऑफ गिरगिट' हा प्रसिद्ध चित्रपट "ब्लू व्हेल गेम'वर आधारित आहे.'ब्लू व्हेल गेम' हा इंटरनेट-आधारित 'गेम' आहे, ज्याला 'ब्लू व्हेल चॅलेंज' असेही म्हटले जाते, ज्यामध्ये खेळाडूंना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते. चित्रपटात अॅप डेव्हलपरच्या भूमिकेत असलेले तळपदे म्हणाले की, चित्रपटाच्या कथेने तो प्रभावित झाला आहे.  या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहत असल्याचे तो म्हणाला.


Sunday, May 14, 2023

यंदा नऊ भारतीय चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये


गेल्या काही वर्षांपासून भारतीय सिनेसृष्टीतील स्मॉल बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नेत्रदीपक यश मिळवले आहे. 'द कश्मीर फाइल्स' आणि 'कांतारा' पाठोपाठ स्मॉल बजेट 'द केरल स्टोरी' हा चित्रपटही 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. यंदा एकूण नऊ भारतीय चित्रपट 100 कोटींचे मनसबदार बनले आहेत. 

15 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या "द कश्मीर फार्डल्स' ने 340 कोटी आणि 16 कोटी रुपये बजेट असलेल्या 'कांतारा' ने 450 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 5 मे 2023 रोजी रिलीज झालेल्या वादग्रस्त 'द केरल स्टोरी' वर 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने 10 दिवसांमध्ये 112 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय आजही हा चित्रपट सर्वत्र गर्दी खेचत असल्याने आणखी काही दिवस बॉक्स ऑफिसवरील 'द केरळ स्टोरी' चे वादळ शमणार नसल्याचे चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

या जोडीला आणखी आठ विंग बजेट चित्रपट यंदा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. यात 'वॉल्टेयर वीरँंया' (236), 'थुनिवू (200)', 'वारिसू' (300), 'पोन्नियित सेल्चन २' (325) या दाक्षिणात्य, तर 'पठाण' (1050), 'तू झुठी मैं मक्‍कार' (200), "किसी का भार्ई की जान' (179), भोला' (125) या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी "किसी का भाई किसी की जान' व 'भोला' हे चित्रपट साऊथचे रिमेक असल्याने भारतीय चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. 

Saturday, May 13, 2023

'जंजीर' ची पन्नास वर्षे आणि सुरुवातीचे किस्से


'जब तक बैठने को कहा ना जाए शराफत से खड़े रहो' हे वाक्य ऐकलं की आपल्या समोर येतात ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे तर, जगभरातही करोडो चाहते आहेत. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. आपल्या करिअरमध्ये अमिताभ यांनी 'शोले' , 'डॉन', 'सिलसिला', 'शान', 'जंजीर “महान', 'कालिया' अशा एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांचा 'जंजीर' चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लटफार्मवरसुद्धा पाहता येणार आहे. आज अमिताभ बच्चन अजूनही चित्रपटात काम करतात. वेगवेगळी भूमिका करतात. पण एक काळ असा होता की त्यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. एकाच वेळी १२ चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणीही उत्सुक नव्हते. परंतु जेव्हा त्यांना 'जंजीर' चित्रपटासाठी कास्ट केले तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. यामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर 'विजय' हे पात्र साकारले होते, यानंतर चित्रपटसृष्टीत अमिताभ यांना  'एंग्री यंग मॅन' म्हणून ओळखले जाऊ लागले. 

प्रकाश मेहरा प्रोडक्शनची पहिलीच निर्मिती आणि प्रकाश मेहरा  दिग्दर्शित पाचवा चित्रपट ठरलेला ‘जंजीर’  बॉलीवूडमध्ये ॲक्शनपटांची लाट घेऊनच आला आणि याला कारण होतं त्यातून निर्माण झालेलं ‘अँग्री यंग मॅन’ नावाचं वादळ! अमिताभ बच्चन, जया, प्राण, ओम प्रकाश आणि अजित इत्यादी कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवरही यशस्वी ठरला होता. कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीने ‘जंजीर’साठी संगीत दिलं होतं तर गुलशन बावरा यांनी लिहलेल्या गाण्यांना मन्ना डे, आशा भोसले, लता मंगेशकर आणि मोहंमद रफी यांनी आपला आवाज दिला होता.

जंजीरची स्क्रिप्ट धर्मेंद्रने लेखक सलीम-जावेद यांच्याकडून आधीच विकत घेऊन ठेवली होती, पण नंतर ‘समाधी’च्या स्क्रिप्टच्या बदल्यात ती त्याने राकेश मेहरांना देऊ केली. त्याचवेळी मेहरांनी त्याच्याकडून विजयच्या रोलसाठी तारखाही मागितल्या होत्या वर स्वतः धर्मेंद्रनेच सहनिर्माता बनावे, अशी इच्छाही व्यक्त केली होती, जी धर्मेंद्रने मान्य केली. यानंतर नायिकेच्या भूमिकेसाठी मुमताजच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण कालांतराने धर्मेंद्र ही फिल्म करायचं टाळू लागल्यावर मेहरांनी त्याच्याशी बोलून हा करार मागे घेतला आणि देव आनंदला विजयची भूमिका देऊ केली. मात्र चित्रपटात आपल्यासाठीही गाणी हवीत हा देव आनंदचा हट्ट त्यांना पटला नाही, त्यामुळे ते त्यांची ऑफर घेऊन राजकुमारकडे गेले. राजकुमार तेव्हा मुमताजसोबतच मद्रासमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी मेहरांना मद्रासमध्येच हा चित्रपट शूट करायला सांगितलं पण मेहरांचा मुंबईमध्येच जंजीर बनवण्याचा निर्णय असल्याने, त्यांनी या फिल्ममधून माघार घेतली. त्यानंतर राजेश खन्ना यांनीही गाणी नसल्याने आणि दिलीपकुमार यांनीही भूमिकेत दम नसल्याचे सांगत काम करण्यास नकार दिला.

मोठमोठ्या स्टार्सने या फिल्मकडे पाठ फिरवल्यावर मेहरा अडचणीत सापडले होते पण यावेळी लेखक सलीम-जावेद व अभिनेते प्राण  त्यांच्या मदतीला धावून आले. तिघांच्या सांगण्यावरून त्यांनी मेहमूदने दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे टू गोवा’ पाहिला आणि त्यांना अमिताभची भूमिका प्रचंड आवडली. क्लबमध्ये शत्रुघ्न आणि त्याच्या साथीदारांची बेदरकारपणे धुलाई करणाऱ्या अमिताभच्या नजरेत त्यांना विजयच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेले भाव दिसले आणि अमिताभच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं.

‘जंजीर’ येईपर्यंत ‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ वगळता अमिताभचा  एकही चित्रपट हिट झाला नव्हता. नावाजलेल्या स्टार्सला नकार देऊन तब्बल बारा फ्लॉप चित्रपटांचा हिरो प्रकाश मेहरांनी आपल्या फिल्ममध्ये घेतल्याने त्यांचं दिवाळं निघणार, अशी उलटसुलट चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागली. त्यात मुमताजनेही ऐनवेळी आपल्या लग्नाचं कारण पुढे करत चित्रपटातून माघार घेतल्याने मेहरा खचून गेले.  त्यावेळी अभिनेत्री जया भादुरी हिला मेहरा आणि अमिताभकडून नायिकेच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं आणि तिने लगेच आपला होकार कळवला. सुरुवातीला आपल्या खलनायकी भूमिकांसाठी नावाजले गेलेले आणि ‘जंजीर’ येण्यापूर्वी चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत स्थिरावू पाहणारे प्राण यांनी ‘आन बान’ (१९७२) नंतर पुन्हा एकदा ‘जंजीर’च्या निमित्ताने प्रकाश मेहरांशी हात मिळवणी केली. 

‘जंजीर’ रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर झपाट्याने गल्ला जमवायला सुरुवात केली.  रिलीजच्या दुसऱ्याच आठवड्यात पाच रुपयांचं तिकीट ब्लॅकमध्ये १०० रुपयांना विकलं जाऊ लागलं. त्याच सुमारास, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडीयाचा ‘बॉबी’ही प्रदर्शनाच्या वाटेवर होता. कल्याणजी-आनंदजींनी संगीत दिलेल्या ‘जंजीर’च्या गाण्यांचा ‘बॉबी’च्या गाण्यांवर परिणाम होऊ नये, म्हणून संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘जंजीर’च्या सर्वच कॅसेट्स आधीच विकत घेतल्या होत्या, असं प्रकाश मेहरा सांगतात. -अनिकेत ऐनापुरे, पुणे

Tuesday, May 2, 2023

शर्मन जोशीचा 'म्युझिक स्कूल' 12 मेला प्रदर्शित होणार


शर्मन जोशीने 1999 मध्ये 'गॉड मदर'मधून पदार्पण केले.लीड अॅक्टर म्हणून त्याने 2001 च्या 'स्टाईल'मधून आपल्या इनिंगला सुरुवात केली. त्याच्या खात्यात '3 इडियट्स', '1920 लंडन', 'हेट स्टोरी 3' आणि  स्टाइल' (2001), 'एक्सक्यूज मी' (2003), 'शादी नंबर वन' (2005), 'रंग दे बसंती' (2006), 'गोलमाल' (2007), फरारी की सवारी' (2012) सारखे यशस्वी चित्रपट आहेत. पार्श्वगायक म्हणून त्यांनी '3 इडियट्स' चित्रपटात 'गिव मी सम सन साइन...' हे गाणे गायले.  या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरस्कारही मिळाला होता. आता तो संगीतकार इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि पापा राव बियाला यांनी दिग्दर्शित केलेल्या 'म्युझिक स्कूल' चित्रपटात श्रिया सरनसोबत दिसणार आहे. १२ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात शर्मन एका ड्रामा टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे. शर्मन जोशी एके ठिकाणी म्हणाला आहे की, 'हा चित्रपट खरं तर एक संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणी कथेशी जोडलेली आहेत. चित्रपटात 11 गाणी आहेत, जी ठराविक अशा लोकप्रिय गाण्याच्या श्रेणीत येत नाहीत. संवाददेखील संगीतमय स्वरुपात आहेत. 

हा चित्रपट मुलांच्या शिक्षणाविषयी आणि पालकांकडून त्यांच्यावर टाकलेल्या दबावाविषयी आवाज उठवतो. मुलांवरील हे दडपण संगीत कलेच्या माध्यमातून कसे कमी करता येईल, अशी या चित्रपटाची मूळ कल्पना  मांडण्यात आली आहे. या चित्रपटात 7 मुले आहेत, ज्यांची 500 हून अधिक मुलांच्या ऑडिशननंतर निवड करण्यात आली आहे.  सर्व मुले खूप हुशार आहेत. 

 मी चित्रपटातील एक नाट्यशिक्षक आहे ज्याला दरवर्षी नाटक सादर करावे लागते.अडचण अशी आहे की,  वर्गात एकच असा विद्यार्थी आहे ,जो  नाटकाला फारसे गांभीर्याने घेत नाही. या समस्येला चित्रपटात लक्ष्य करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात बरेच काम केले गेले आहे, परंतु कोविड आणि इतर अपरिहार्य कारणांमुळे अनेक चित्रपट वेळेवर रिलीज होऊ शकले नाहीत. इंडस्ट्रीने मला खूप काही दिले आहे, आता माझी कोणतीही तक्रार नाही. मी आतापर्यंत जे काही मिळवले आहे आणि मी जिथे कुठे आहे याबद्दल मी समाधानी आहे. माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे आणि जेवढी माझी क्षमता आहे, ते मला मिळेल, असा माझा विश्वास आहे. मला अशा चित्रपटसृष्टीचा एक भाग बनवल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, जे येणाऱ्या पिढ्या नक्कीच  स्मरणात ठेवतील.

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी ४२ वर्षांचा झाला आहे.  त्यांचा जन्म 17 मार्च 1979 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला.  तो मराठी कुटुंबातील आहेत, पण त्यांचे वडील अरविंद जोशी हे गुजराती रंगभूमीचे ज्येष्ठ कलाकार होते, त्यांचे अलीकडेच निधन झाले आहे.  याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही रंगभूमीशी निगडीत आहेत.  शर्मन याला स्वत: ला रंगभूमीबद्दल प्रचंड आत्मीयता आहे.

कॉलेजमध्ये शिकत असताना शर्मन जोशीची लव्ह लाईफ सुरू झाली.  येथे त्याची भेट एका मुलीशी झाली जिच्या पहिल्या भेटीतच शर्मन प्रेमात पडला होता.  त्या मुलीचे नाव प्रेरणा चोप्रा, ती प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे. प्रेरणालाही पहिल्या भेटीनंतर शर्मन आवडला.  मात्र दोघांनीही एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत.  यानंतर भेटीगाठी सुरूच राहिल्या आणि त्यांची घट्ट मैत्री झाली.  शर्मनला प्रेरणाचे गांभीर्य आणि वागणूक आवडली.  जरी दोघांनी एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही.  पण जिव्हाळ्याच्या भेटींचा कालावधी जवळपास वर्षभर चालला.  1999 मध्ये सुरू झालेली डेटिंग 2000 मध्ये संपली. 15 जून 2000 रोजी दोघांनी गुजराती रितीरिवाजानुसार लग्न केले.  शर्मन जोशीने त्याच वर्षी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती, त्याच वर्षी दोघांनी लग्न केले.  तर प्रेरणा ही बिझनेस वुमन आहे.  दोघेही तीन मुलांचे पालक आहेत (मुलगी खयाना, मुले वरायण आणि विहान).  शर्मन हा टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता रोहित रॉयचा मेहुणाही आहे.  त्याची बहीण मानसी जोशी ही रोहितची पत्नी आहे. 

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...