Sunday, May 14, 2023

यंदा नऊ भारतीय चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये


गेल्या काही वर्षांपासून भारतीय सिनेसृष्टीतील स्मॉल बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नेत्रदीपक यश मिळवले आहे. 'द कश्मीर फाइल्स' आणि 'कांतारा' पाठोपाठ स्मॉल बजेट 'द केरल स्टोरी' हा चित्रपटही 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. यंदा एकूण नऊ भारतीय चित्रपट 100 कोटींचे मनसबदार बनले आहेत. 

15 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या "द कश्मीर फार्डल्स' ने 340 कोटी आणि 16 कोटी रुपये बजेट असलेल्या 'कांतारा' ने 450 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 5 मे 2023 रोजी रिलीज झालेल्या वादग्रस्त 'द केरल स्टोरी' वर 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने 10 दिवसांमध्ये 112 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय आजही हा चित्रपट सर्वत्र गर्दी खेचत असल्याने आणखी काही दिवस बॉक्स ऑफिसवरील 'द केरळ स्टोरी' चे वादळ शमणार नसल्याचे चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

या जोडीला आणखी आठ विंग बजेट चित्रपट यंदा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. यात 'वॉल्टेयर वीरँंया' (236), 'थुनिवू (200)', 'वारिसू' (300), 'पोन्नियित सेल्चन २' (325) या दाक्षिणात्य, तर 'पठाण' (1050), 'तू झुठी मैं मक्‍कार' (200), "किसी का भार्ई की जान' (179), भोला' (125) या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी "किसी का भाई किसी की जान' व 'भोला' हे चित्रपट साऊथचे रिमेक असल्याने भारतीय चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. 

1 comment:

  1. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने 100 कोटींचा आकडा गाठला नाही

    'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. 'गली बॉय'नंतर या जोडीने दुसऱ्यांदाही आपली जादू चालवण्यात यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्ट्सवर काम करणाऱ्या साइटनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली आहे. त्याआधी सहाव्या दिवशी या चित्रपटाने ६.९ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 73.62 कोटींची कमाई केली आहे. तथापि, भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा क्लब गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. हा चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून या चित्रपटाने जगभरात 130 कोटींची कमाई केली आहे.

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...