2023 चा पहिल्या सहामाहीचा काळ संपला आहे. शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट पहिल्या सहा महिन्यांतला भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. 540 कोटींहून अधिक कमाईचा विक्रम 'आदिशुरुष' मोडेल, असे मानले जात होते, मात्र आतापर्यंत केवळ 450 कोटींचाच आकडा 'आदिपुरुष'ला गाठता आला आहे.आता येत्या ६ महिन्यात असे अनेक चित्रपट येणार आहेत ज्यात 'पठाण'च्या रेकॉर्डला आव्हान देण्याची पूर्ण ताकद आहे. हे सिनेमे आता रिलीज व्हायला सज्ज झाले आहेत
येत्या सहा महिन्यांच्या कालावधीची अपेक्षा...
चित्रपट जगतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वर्षाच्या उत्तरार्धात चित्रपटांची लाइनअप खूपच मजबूत आहे. अशा परिस्थितीत पुढील सहामाहीत बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या सहामाहीपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा आहे. 2023 च्या शेवटच्या सहा महिन्यांत, थिएटरमध्ये 'अॅनिमल', 'गदर 2', 'जवान, टायगर 3', 'ओएमजी-2' आणि 'डंकी'सह 10 हून अधिक बहुप्रतिक्षित चित्रपट आहेत.त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपट आणि हॉलिवूडचेही अनेक चित्रपट येणार आहेत. त्यामुळेच येत्या सहा महिन्यांत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे दमदार पुनरागमन होणार असल्याचे बोलले जात आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अमीषा पटेल आणि सनी देओल अभिनीत गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि यामी गौतम स्टारर चित्रपट 'ओह माय गॉड 2' 11 वर्षांनंतर 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 'पठाण'नंतर आता किंग खानचा मोस्ट अवेटेड 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा 'सालार'ही 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'फुक्रे 3' यावर्षी 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
दोन हजार कोटींची कमाई!
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रभास, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांसारख्या आघाडीच्या कलाकारांनी अभिनय केलेल्या चित्रपटांनी फारच सुमार कामगिरी केली. त्याचवेळी शाहरुखच्या 'पठाण' आणि 'द केरला स्टोरी'च्या सरप्राईज हिट्समुळे पहिल्या सहामाहीची कमाई 2 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 'वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतील चित्रपटांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्यातले सुमारे तीन महिने चांगले म्हणता येतील. तर उर्वरित तीन महिने ठीकठाक गेले आहेत. उदाहरणार्थ, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यामुळे फेब्रुवारी महिना कमाईच्या बाबतीत चांगला गेला. तर 'किसी का भाई किसी की जान' एप्रिलमध्ये कमकुवत होता. पण 'द केरल स्टोरी'ने मे महिन्यात चांगली कमाई केली. जूनमध्ये 'जरा हट के जरा बच के' आणि प्रभासच्या 'आदिपुरुष'नेही ठीकठाक कामगिरी केली.
सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' 15 डिसेंबरला रिलीज होणार
सिद्धार्थ मल्होत्रा बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. गेल्या वर्षी त्याचा 'थँक गॉड' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.आता सिद्धार्थ मल्होत्राचा पुढचा रिलीज अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्म 'योद्धा' आहे. योद्धा आधी या महिन्यात ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने परवाच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर योद्धाचे अपडेट शेअर केले.धर्मा प्रॉडक्शनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'इंधन भरले आहे आणि उडण्यासाठी तयार आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या नवोदित दिग्दर्शक जोडीने दिग्दर्शित केलेला, योद्धा, सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा' फ्रँचायझीमधील पहिला अॅक्शन चित्रपट, 15 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिशा पटनी आणि राशी खन्ना यांच्याही मुख्य भूमिका आहेत. स्पाय एजंट हा चित्रपट करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्राचा समावेश आहे. योद्धा हा त्याचा दुसरा चित्रपट. यापूर्वी हा अभिनेता 'मिशन मजनू'मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत होता.
No comments:
Post a Comment