Monday, May 11, 2020

गायक उदित नारायण

उदित नारायण झा यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी बिहार येथील सहरसामध्ये एका नेपाळी शेतकरी कुटुंबात झाला. बारावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर संगीत शिक्षण मुंबईच्या भारतीय विद्याभवन मधून घेतले. मैथिली, हिंदी, भोजपुरी, बंगाली आणि इंग्रजी या भाषा बोलता येतात तर जवळपास12 ते 14 भाषाअंमध्ये गाणी गायली आहेत. राजेश खन्नाच्या 'उंनिस बीस' चित्रपटात (1979) प्रथमच हिंदीत गायन केले. 'मिल गया मिला गया' हे गाणे महमंद रफी आणि उषा मंगेशकर यांच्यासोबत गायला मिळाले. 1978 मध्ये नेपाळी चित्रपट 'सिंदूर'साठी पार्श्वगायन केले.
'कुसमी रुमाली' या नेपाळी चित्रपटात प्रथमच अभिनय केला होता. उदित यांचे कुटुंब मोठे आहे. त्यांना चार भाऊ आहे. त्यांच्या पत्नीचे नाव दीपा असून त्यांनी एअर होस्टेस म्हणून काम केलं आहे. त्यांचा मुलगा आदित्य हा संगीत क्षेत्रात नाव कमवून आहे. संगीत कार्यक्रमावर आधारित टीव्ही शोचे अंकरिंग तो करत असतो.
परिश्रम आणि निष्ठेवर विश्वास असलेल्या उदित यांनी तंत्र मंत्र ,भूत प्रेत आणि ज्योतिषावर कधी विश्वास ठेवला नाही. अमिताभ बच्चन यांचा आवडता कलाकार असून बॅडमिंटन हा खेळ त्यांना आवडतो. धूम्रपान, मद्यपान यांपासून लांब असलेल्या उदित यांना भारतीय संगीत फार आवडते. 

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...