Sunday, May 10, 2020

रविना टंडन आगामी चित्रपटात दिसणार संजय दत्तसोबत!

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आयुष्यातील खासगी गोष्टी नेहमी शेअर करत असते. पण सोशल मीडियावर किंवा इतर कार्यक्रमांमध्ये रवीना आपल्या पतीसोबत फारच कमी वेळा दिसते. रवीनचा लग्नापर्यंतचा प्रवास तसंच तिच्या पतीबद्दल आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत.

रवीनाने सलमान खानसोबत १९९१ मध्ये 'पथ्थर के फूल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट सुपरहिट झाला आणि रवीनाही स्टार झाली. यानंतर रवीनाने अक्षय कुमारसोबत १९९४ मध्ये आलेल्या मोहरा चित्रपटात काम केलं. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. सोबतच अक्षय कुमार आणि तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. यानंतर रवीना आणि अक्षय कुमार एकमेकांना डेट करु लागले होते. त्यांनी सर्वांपासून लपवून साखरपुडाही केला होता. पण ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. रवीनाने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. नंतर दोघांचाही ब्रेक अप झाला. यानंतर रवीना आपल्या दत्तक मुलींचा सांभाळ करण्यात व्यस्त झाली. रवीनाने नंतर चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात केली. यावेळी तिची भेट चित्रपट वितरक असणार्‍या अनिल थडानीसोबत झाली. दोघांनीही आपले संबंध प्रोफेशनल ठेवले होते. अनिल थडानीचं लग्न झालं होतं आणि त्याच्या आयुष्यातही अनेक समस्या होत्या. तर दुसरीकडे रवीनाचाही खडतर प्रवास सुरु होता. अखेर २00३ रोजी रवीनाच्या वाढदिवशी अनिल थडानीने रवीनाला प्रपोज केला. रवीनानेही लगेच होकार दिला. २00३ मध्येच त्यांनी छोटा कार्यक्रम करत साखरपुडा केला.
रवीनाला अत्यंत थाटामाटात लग्न करण्याची इच्छा होती. २२ फेब्रुवारी २00४ रोजी उदयपूर पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
रवीनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. १९९0 मध्ये रवीनाने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं. २00५ मध्ये रवीनाच्या मुलीचा जन्म झाला. तर २00८ मध्ये मुलाचं आगमन झालं.
नुकतेच रवीनाने आपल्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठणींना उजाळा दिला.
रवीनाने फोटो शेअर करताना जुन्या आठवणी असल्याचा उल्लेखही केला आहे. रवीनाने फोटो शेअर करताच एका चाहत्याने कमेंट करत पुढच्या जन्मात माझ्याशी लग्न करशील का? अशी विचारणाही केली.सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणार्‍या रवीनानेही आपल्या चाहत्याला लगेचच उत्तर देत , माफ कर.सात जन्मासाठी मी आधीच बूक आहे म्हटंल. रवीना टंडनचं हे उत्तर नेटकर्‍यांना प्रचंड आवडलं. रवीना टंडन लवकरच संजय दत्तसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. प्रेक्षकांनाही चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...