Monday, May 11, 2020

माहिती हवीय?

प्रश्न-दादा कोंडके यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट कोणता?
उत्तर- दादा कोंडके निर्मित आणि अभिनित 'सोंगाड्या'  हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटातही उषा चव्हाण च त्यांची नायिका होती.

प्रश्न- 'तीन बहुरानीयां' या चित्रपटातील  'तीन बहुरानीयां'ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री कोण? हा चित्रपट केव्हा प्रदर्शित झाला होता? अन्य कलाकार कोण होते?
उत्तर- 'तीन बहुरानीयां' हा चित्रपट 1968 साली प्रदर्शित झाला होता. जानकी, कंचन आणि जयंती यांनी या चित्रपटात  'तीन बहुरानीयां' ची भूमिका केली होती. पृथ्वीराज कपूर, शशिकला, आगा, राजेंद्रनाथ, रमेश देव, धुमाळ, कन्हैय्यालाल ,ललिता पवार, निरंजन शर्मा, वैशाली ,जगदीप, फरीदा हे या चित्रपटातील अन्य कलाकार होते.

प्रश्न-'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटात प्राणच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव काय?
उत्तर- वहिदा रेहमानने ही भूमिका केली होती.

प्रश्न-'टॅक्सी ड्रायव्हर' हा चित्रपट कोणत्या साली पडद्यावर आला? या चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण? तसेच या चित्रपटाचे संगीतकार कोण? व या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- -'टॅक्सी ड्रायव्हर'  या नावाचे तीन चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. पहिला चित्रपट 1944 साली प्रदर्शित झाला होता. दिलावर, सुलोचना चटर्जी, बाबूराव, आगा, रेखा पवार, शोभा हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार होते. संगीत दिग्दर्शक होते खान मस्ताना. 1954 साली दुसरा -'टॅक्सी ड्रायव्हर' निर्माण झाला होता. देव आनंद, कल्पना कार्तिक, शीला रामानी, जॉनी वाकर, रशीद खान, परवीन पॉल, हमीद सयानी, कृष्ण धवन हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार होते. संगीतकार होते एस.डी.बर्मन. तिसरा -'टॅक्सी ड्रायव्हर' 1973 साली निर्माण झाला. दुसऱ्या -'टॅक्सी ड्रायव्हर'चा नायक देव आनंद चा भाचा विशाल आनंद याने या चित्रपट अनुपमाबरोबर नायकाची भूमिका केली होती. अशोक कुमार, निरुपा रॉय, हेलन, असीत सेन या चित्रपटातील अन्य कलाकार होते.

प्रश्न- शशी कपूर यांना कोणकोणत्या चित्रपटासाठी अवार्ड मिळाले?
उत्तर- शशी कपूर यांना 'दीवार' ( 1975), या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. 'जुनून' (1979) व कलयुग (1981) या चित्रपटांसाठी त्याला सर्वश्रेष्ठ चित्रपटाचे फिल्म फेअर पारितोषिक मिळाले होते. '36 चौरंगी लेन' (1982) या चित्रपटासाठी त्याला मनीला फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते.

प्रश्न- धर्मेंद्र आणि देव आनंद यांनी आतापर्यंत कोणकोणत्या चित्रपटात एकत्र काम केले?
उत्तर- या दोघांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही.

प्रश्न- संगीतकार जी.एस. कोहली यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट कोणते?
उत्तर- लंबे हाथ, मिस्टर इंडिया, या सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच चित्रपटांना जी एस कोहली यांनी संगीत दिले आहे.

प्रश्न- महमंद रफी आणि किशोर कुमार यांनी कोणकोणत्या चित्रपटात एकत्र गाणी गायली?
उत्तर- मालकीन, भागमभाग, फिप्टी फिप्टी, नया अंदाज, पैसा ही पैसा , करोडपती, अकलमंद, हमजोली, खोज, परवाना, जंगल में मंगल, यादों की बारात, चुपके चुपके, चक्कर से चक्कर, चोर सिपाही, इमान धरम, हिरालाल पन्नालाल, मुकद्दर, दुनिया मेरी जेब में, मुकाबला, आप के दिवाने, आप तो ऐसे न थे, दोस्ताना, राम बलराम, स्वयंवर, वक्त की दीवार, एक और एक ग्यारह, दीदार ए यार

प्रश्न- अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी कोणकोणत्या मराठी चित्रपटात गाणं गायलंय?
उत्तर- गंमत जमत
प्रश्न- ये दिल तुम बीन कही लगता नहीं... हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे आणि कोणी गायले आहे?
उत्तर- इज्जत या चित्रपटात या चित्रपटात रफी व लता यांनी गायलं होतं.

प्रश्न- एक फूल दो माली या चित्रपटातील बाल कलाकार कोण?
उत्तर- बॉबी

No comments:

Post a Comment

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...