एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यावर तिला या विषयाची इतकी गोडी लागली की तिने याच क्षेत्रात झोकून द्यायचं पक्कं केलं. काही फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला. 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझायनर झाली. या क्षेत्रात वावरत असताना अचानक तिला अरबाज खान भेटला. त्यांना 'दबंग'साठी नायिका हवी होती. आणि सोनाक्षी सिन्हा मध्ये त्याला अपेक्षित नायिका सापडली. मात्र याच सोनाक्षी सिन्हाला चित्रपटात यायसाठी तब्बल तीस किलो वजन कमी करावं लागलं. पण ते सिन्हा नं केलं. चित्रपट हिट झाला आणि सोनाक्षीचं नाणं चाललं.
सोनाक्षी लहानपणी फार मस्तीखोर होती. बंदुकीसारखी तेजतर्रार होती. स्विमिंग, व्हॉलीबॉल, टेनिस, फुटबॉल अशा बऱ्याच खेळात तिचा वावर होता. लव-कुश या आपल्या जुळ्या दोन भावांसोबत तिची खूप मस्ती चाले. मारामारी चालायची. शाळा- कॉलेजमध्ये तिच्या नादाला कोणी लागायचे नाही. अगदी टॉमबॉईश होती. त्यामुळे तिची आई- पूनम सिन्हा नेहमी म्हणायची,' हिच्यात मुलीचा एकही गुण शोधूनही सापडत नाही. सुरुवातीला सोनाक्षीला खेळाडू व्हायचं होतं. पण नंतर डिझायनिंग आवडायला लागलं आणि आता अभिनय.
पण तिचे चित्रपट गाजले असले तरी तिच्या अभिनयाची झलक मात्र अजून कुठल्या चित्रपटात दिसली नाही. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या कारकिर्दीत 'दबंग' ची तुलना अन्य कुठल्याही तिच्या चित्रपटाशी होऊ शकली नाही. या चित्रपटातील ' थप्पड से डर नहीं लगता साब,प्यार से लगता है' या तिच्या डॉयलॉगने अक्षरशः धुमाकूळ घातला. तरीही या चित्रपटात तिच्या वाट्याला फारच कमी दृश्य आली. 'दबंग' हा पूर्णतः सलमान मय होता. 'दबंग 2' मध्ये तर तिचे अस्तित्वच नव्हते. काहीजण म्हणतात की, 'दबंग' मुळे हिंदी चित्रपट सृष्टीला देशी ठसक्याची नायिका मिळाली. ग्लॅम-डॉलसच्या गोतावळ्यात साडी आणि सलवार कमीजमधली सोनाक्षी 70-80 च्या दशकातल्या नायिकांची आठवण ताजी करत एक नवा ट्रेंड सुरू करू पाहत होती. त्यात तिला बऱ्यापैकी यश मिळालं सुद्धा. 'दबंग' 1 आणि 2 बरोबरच 'राउडी राठोड' ,'सन ऑफ सरदार', 'आर राजकुमार' यासारख्या चित्रपटात आधुनिकता आणि रेट्रो लुक यांचं अफलातून मिश्रण सोनाक्षीने सादर केलं. हे चित्रपट सुपरहिट ठरले. मात्र यात ती फक्त शोभेची बाहुली म्हणूनच वापरली. अभिनय तिच्या वाट्याला आलाच नाही. म्हणजे या चित्रपटांमध्ये तो नव्हताच. निव्वळ मनोरंजन हाच या चित्रपटांचा उद्देश. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहिद कपूर, सलमान खान यांच्या प्रभावशाली देमार चित्रपटांमध्ये सोनाक्षीचा सहभाग नायकाची प्रियेसी आणि नाचण्या -गाण्यापुरताच होता. मात्र चित्रपटांनी करोडोंची कमाई केल्याने 'लकी चार्म' ठरवत तिचं ' मिस 100 करोड' असं नामाकरण झालं होतं.
महत्त्वाचं म्हणजे तिची लक्षात राहावी, अशी भूमिकाच नाही. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मध्ये बऱ्यापैकी महत्त्वाची भूमिका मिळूनही तिला स्वतःचा प्रभाव पाडता आला नाही. ज्या रेट्रो लुक मुळे तिच्याकडे कौतुकाच्या नजरा वळल्या, त्या लुकचा तिच्याच चाहत्यांना कंटाळा येत चालला. अशा वळणावर सर्वसाधारपणे शरीरप्रदर्शन ,बोल्ड दृश्यं, चुंबन दृश्यं याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र या गोष्टीला सोनाक्षी बळी पडली नाही. त्यामुळे तिच्या कारकिर्दीला नायकाचाच भक्कम टेकू लागतो, हे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे तिला नायकही तसेच भेटले.
स्वतःच्या बळावर चित्रपट चालवा, असा तिचा प्रयत्न झाला,पण तो अयशस्वी झाला. 'लुटेरा' काही चालला नाही. मात्र तिच्या पाखी या बंगाली मुलीच्या भूमिकेचे कौतुक झालं. 'इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल जरा संवार लू...' अशी सुरेल साद घालत एकीकडे आजारपण आणि अपयशी प्रेम याच्याशी झुंजत हेलकावे खाणारी सोनाक्षीचा पाखी हावभाव, दिसणं, वावरणं, संवादफेक सर्वच बाबतीत उजवी होती. खरे तर अभिनयासाठी नावाजले जाणं कलाकारांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं असतं. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट आदींसाठी खास संहिता लिहून घेतली जाते, चित्रपटांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्यासाठी या नायिका सज्ज असतात. याचं गांभीर्य सोनाक्षीच्या कारकिर्दीत अभावानेच बघायला मिळालं.
'अकिरा', 'नूर', 'हॅप्पी फिर भाग जायेगी' आणि 'खानदानी शफखाना' हे तिन्ही चित्रपट सोनाक्षीच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत होते. पण समीक्षा आणि तिकीटबारी दोन्हीपैकी एकवरही हे चित्रपट चमकली नाहीत. ऍक्शन आणि कॉमेडी या तिच्या आवडत्या शैलीतील चित्रपट असूनही त्यात प्रेक्षकांना वेगळेपण आढळलं नाही.
'बुलेटराजा', 'तेवर', 'ऍक्शन जेक्शन', 'वेल कम टू न्यू यॉर्क' ,'फोर्स 2', 'इत्तेफाक' अशा चित्रपटातून सोनाक्षीचा फायदा तर झाला नाहीच,पण उलट अपयश पदरी पडून ती मागे खेचली गेली. करण जोहरचा 'कलंक' सुद्धा तिला फायद्याचा ठरला नाही. 'मिशन मंगल'ला यश मिळालं असलं तरी या चित्रपटाचे श्रेय कुणा एकाला जात नाही. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन हे कलाकार होते.

सोनाक्षी सिन्हा मागील काही काळापासून झहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. झहीर अन् सोनाक्षीने अलिकडेच स्वत:च्या या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. सोनाक्षी आणि झहीर काही दिवसांपूर्वी एका विवाहसोहळ्यात एकत्र दिसून आले होते. झहीर हा एका ज्वेलर्सच्या कुटुंबाशी संबंधित असून सलमान खानचा तो चांगला मित्र आहे. झहीरने स्वत:चे बॉलिवूड पदार्पण सलमान खानचा चित्रपट 'द नोटबुक'द्वारे केले होते. झहीर आणि सोनाक्षी आता 'डबल एक्स एल' या चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. संतराम रमानी यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात हुमा कुरेशी. देखील महत्वाच्या भुमिकेत भूमिकेत दिसून येणार आहे. सोनक्षी बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरलेली नसली तरीही तिच्या नावावर काही हिट चित्रपट आहेत. परंतु अलिकडच्या काळात ती बिगबजेट चित्रपटांमध्ये दिसून आलेली नाही.
ReplyDelete"सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘निकिता रॉय एंड द बुक ऑफ डार्कनेस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तिचा भाऊ कुश सिन्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत परेश रावल, सुहेल नय्यर हे देखील दिसणार आहे.अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी सिन्हा शेवटची सलमान खान सोबत ‘दबंग 3’ चित्रपटात दिसली होती. जरी ती OTT वर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ (2021) चित्रपटात दिसली असली तरी ती पूर्ण तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतत आहे.
ReplyDelete