Thursday, June 18, 2020

'क्लबची राणी' दीपिका

उंच अभिनेत्रींना हिंदी चित्रपट सृष्टीत यश मिळत नाही,हा समज दीपिका पादुकोन हिने खोटा ठरवला. आपल्या जिवंत अभिनय, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीमुळं तिला यश मिळालं आहे, हे नाकारता येत नाही. आजच्या घडीला ती आघाडीची नायिका आहे. भूमिका कुठलीही असो, आपल्या अभिनय क्षमतेने ती भूमिका ती सहज निभावत असल्याने निर्माता-दिग्दर्शक यांची तिच्या नावाला पहिली पसंदी असते. कमाईमध्येदेखील ती सगळ्यांच्या पुढे आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटानं दीपिका हिंदी चित्रपट सृष्टीतील 'रिअल क्वीन' असल्याचं म्हटलं जातं आहे. तिचे आतापर्यंत सात चित्रपट100 कोटी क्लबमध्ये दाखल झाले आहेत. 'चेन्नई एक्सप्रेस', 'रेस3', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'ये जवानी है, दिवानी', 'हॅपी न्यू इअर', हे चित्रपट100 कोटी क्लबमध्ये याआधीच दाखल झाले आहेत.

रेखीव आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या दीपिकामध्ये जुन्या अभिनेत्री आपलं प्रतिबिंब पाहतात. खुद्द वहिदा रेहमान, हेमामालिनी यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. पण असं असलं तरी तिला या दहा वर्षाच्या अभिनय प्रवासात तिला यश काही सहजासहजी मिळालं नाही. चित्रपटसृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिचे हे यश वाखाण्यासारखे आहे. प्रसिद्ध बॅडमिंटन पटू प्रकाश पादुकोन यांची कन्या असलेल्या दीपिकाला बॅडमिंटन काही रास आले नाही. त्यामुळे ती मॉडेलिंग आणि चित्रपटांकडे वळली. 2006 मध्ये पहिल्यांदा तिने 'ऐश्वर्या' नावाचा कन्नड चित्रपट केला. हिमेश रेशमियासोबत केलेला 'आप का सुरूर' तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. यामुळेच तिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली. शाहरुख खानने तिला 'ओम शांती ओम' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी घेतले. तिने या संधीचं सोनं केलं. मग काय तिने मागे वळून पाहिलेच नाही.
'लव आज कल', 'हाऊसफुल', 'देसी बॉईज', 'कॉकटेल' , 'रेस-2', 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'गोलीयों की रासलीला-रामलीला', 'हॅप्पी न्यू इअर', 'पिकू', 'बाजीराव मस्तानी', असे हिट चित्रपट तिने दिले. 'चांदनी चौक टू चायना', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक', 'लफँगे परिंदे', 'ब्रेक के बाद', 'खेले हम जी जान से', 'फाईंडिंग फ़ैनी', 'तमाशा', 'बचना ऐ हसिनो' आणि 'आरक्षण' हे चित्रपट आपटले तरी तिच्या करिअरवर त्याचा काही फरक पडला नाही. दीपिकाने हॉलिवूडमध्येही चित्रपट केला. 'ट्रिपल एक्स द रिटर्न्स ऑफ झेंडर केज' हा तिचा हॉलिवूड पट. जगातल्या सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये दीपिका ही दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचं 'फोर्ब्ज'नं जाहीर केलं आहे. बॉलिवूडमध्ये सध्या ती आघाडीवर आहे.
आता तिने आताचा आघाडीचा प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूर बरोबर लग्न केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपट करिअर वर मर्यादा येणार आहेतच शिवाय आता तिला काही निवडक चित्रपटांमधून काम करून आपली अभिनय क्षमता असलेली अभिनेत्री म्हणून इमेज आहे, ती सांभाळावी लागणार आहे.

1 comment:

  1. दीपिका पादुकोन हिचा जन्मदिवस 5 जानेवारी 1986

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...