आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईत सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या घरी झाला. भट्ट खानदान सिनेमा सृष्टीतलं मोठं प्रस्थ आहे. वडिलांबरोबरच आई सोनी राझदान अभिनेत्री, काका मुकेश भट्ट निर्माता, दुसरा काका रॉबिन भट्ट लेखक, सावत्र बहीण पूजा भट्ट अभिनेत्री,इमरान हाश्मी अभिनेता आणि मोहित सूरी दिग्दर्शक यांसारखे नातेवाईक... सिनेमा सृष्टीच्या कोणत्याही दिशेला जा. कोणी ना कोणी आहेच. अशा फिल्मी वातावरणात अगदी लाडाने वाढलेली आलिया. पण ती फक्त शोभेची बाहुली अजिबात नाही. तिनं आपण अभिनेत्री आहोत,हे दाखवून दिलंय.
शालेय जीवनात सर्वच क्षेत्रात ठीकठाक असलेल्या आलियाने सिनेमा सृष्टी जॉईन करायची हे अगोदरच ठरवलं होतं. यासाठी बारावी झाल्यावर एकटिंग अकॅडमी त झकास प्रशिक्षण घ्यायचं हेही ठरलं होतं. पण त्या अगोदरच करण जोहरनं तिला 'स्टुडंट ऑफ ड इअर' साठी विचारलं. मग काय लॉटरी लागलीच. भट्ट कॅम्प तिच्यासाठी असला तरी तिला या कॅम्पमधून सिनेसृष्टीत प्रवेश करायचा नव्हता. करणच्या चित्रपटासाठी तिला तब्बल 15-16 किलो वजन कमी करावं लागलं. पण तिनं ते केलं. चित्रपट हिट झाला,पण तिच्या अभिनयाचं कौतुक काही कुठं झालं नाही. कारण तिच्याकडे लक्ष जावं असं काही दिसलंच नाही. मात्र इम्तियाज अली यांच्या 'हायवे' चित्रपटात तिच्यातली अभिनेत्री दिसली. महावीरनं (रणदीप हुडा) किडनेप केल्यावर घाबरण्याऐवजी आयुष्यात पहिल्यांदाच गावसलेलं स्वातंत्र्य आणि मनःशांती भरभरून जगू पाहणारी वीरा आलियाने सुक्ष्म बारकाव्यासह उभी केली. आलियाने बोलके डोळे आणि जिवंत हावभाव प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून गेले. 'स्टारडस्ट अवार्ड फॉर सुपरस्टार ऑफ टुमोरो', ' फिल्मफेअर क्रिटिक्स अवार्ड फॉर बेस्ट ऐक्ट्रेस' असे पुरस्कार तिला मिळाले.
सगळेच महेश भट्टच्या या मुलीत दम आहे, असे प्रेक्षकांसह सिनेमातील लोक म्हणू लागले. पुढे करण जोहर निर्मित आणि चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित 'टू स्टेटस' आव्हानात्मक चित्रपट केला. यातील तिची भूमिका एका तामिळ मुलीची होती. यासाठी तिने तामिळ शिकून घेतलं. भारतीय वेशभूषेतील आलिया सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांना क्युट वाटायला लागली. लगेचच करण जोहरनं आलियाला पंजाबी गेटअपमध्ये रंगवून 'हंप्टी शर्मा की दुलहनियां' आणला. 'दिलवाले दुलहनियां ले जाएंगे' च्या आठवणी ताज्या करण्यासाठी वरुण-आलिया ही हमखास यशस्वी जोडी घेऊन हा हलकाफुलका चित्रपट बनवला गेला. या चित्रपटाबरोबरच आलियाने गायलेलं ' मैं तेनु समझावां की...' हे गाणंदेखील हिट झालं. या सगळ्यामुळे बॉलीवूडला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. कारण आलियाच्या प्रतिभेच्या पोतडीतले एकेक गुण बाहेर यायला लागले. 2015 सालच्या यशानंतर 2016 मध्ये तिचा शाहिद कपूरबरोबर 'शानदार' आला,पण तो आपटला. हा तिचा अपयश मिळालेला पहिला चित्रपट. अपयशाला घाबरणाऱ्या आलियाला या चित्रपटाने खूप काही शिकवलं. मग तिने समजूतदारपणानं 'कपूर अँड संस' आणि पंजाबमधील सध्याची ड्रग्सची ज्वलंत समस्या मांडणारा 'उडता पंजाब' स्वीकारले. दोन्हीही चित्रपट हिट ठरले. 'उडता पंजाब'मधील भूमिकेसाठी फिल्मफेअर, आयफा, स्क्रीन या सगळ्यांनीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन टाकला.
आतापर्यंतच्या केलेल्या चित्रपटांमध्ये तिची ठराविक अशी एकच भूमिका नव्हती. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वावर ठराविक छाप पडली नाही. शहरी मॉडर्न मुलीपासून गावच्या गोरीपर्यंत तिला कोणत्याही मुलीच्या भूमिकेत वावरता येत, हे तिने दाखवून दिलं. नंतर तिने 'बद्रीनाथ की दुलहनियां' मध्ये तिने रंगबिरंगी रॉम कॉम साकारली. 'डिअर जिंदगी' तिने शाहरुख खानसोबत केला. या चित्रपट प्रवासात तिने आपण शोभेची बाहुली नाही आणि एखादा चित्रपट यशस्वी करायला कोणत्याही हिरोवर अवलंबून नाही, हे तिनं दाखवून दिलं. 1971 सालाच्या भारत-पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या 'राजी'चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले. हा आलियाचा स्त्रीप्रधान चित्रपट आहे. अपयशाने खचून न जाणारी आणि यशाने शेफारून न जाणारी अशी ही एक गुणी अभिनेत्री आहे.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टने गोड बाळाला जन्म दिल्यानंतर तिने सेटवर पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की ती लवकरच 'रॉकी और राणी की प्रेमकहानी'च्या शुटिंगला सुरुवात करू शकते आणि त्यानंतर ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बैजू बावरा' या चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाची १२ ते १५ गाणी यापूर्वीच रेकॉर्ड झाली आहेत. १९५२ मध्ये 'बैजू बावरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा संगीतमय ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात भारत भूषण आणि मीना कुमारी असे त्या काळातील लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता संजय लीला भन्साळी 'बैजू बावरा' चित्रपट बनवत आहेत. आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी 'बैजू बावरा'सोबत दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याआधी आलियाने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात काम केले होते. आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'जी ले जरा, 'बैजू बावरा' आणि हॉलीवूडचा पहिला चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'सह बॅक-टू-बॅक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत.
ReplyDelete