श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची कन्या. अप्सरेला लाजवेल असं काही तिचं सौंदर्य नाही. शिवाय तिच्याकडे असामान्य अभिनय क्षमता असल्याचा अजून साक्षात्कार झालेला नाही. तिच्या नावावर अजूनही एकसुद्धा 'सोलो हिट' ची नोंद नाही. असं असलं तरी तिच्या मोठ्या बॅनरमध्ये वावर आहे. हीच तिची जमेची बाजू. शिवाय जाहिरातींमध्येही ती सतत झळकत असते. या हिंदी सिनेमा सृष्टीत येऊन तिला दहा वर्षे झाली आहेत.
गोड दिसणारी आणि हसणारी श्रद्धा आपल्याला कुठेच पुढे पुढे आढळून येत नाही. आता कित्येक मुली अभिनयात शून्य असल्या तरी वादविवाद, अफेअर्स गॉसिप, पार्ट्यातल्या भानगडी,त्यांच्या मग्रूरीच्या, हेकेखोरपणाच्या बातम्या किंवा बेताल फॅशन अशा माध्यमातून सतत चर्चेत असतात, मात्र श्रद्धा या सगळ्याला अपवाद आहे. असं वाटतं की, चित्रपट सृष्टीत किंवा प्रेक्षकांच्या मनात टोकाची नकारात्मक प्रतिमा असणाऱ्या वडिलांकडे बघून लहानाची मोठी झालेल्या श्रद्धाने आयुष्यात वाटचाल कशी करायची, हे शिकली असावी. ही श्रद्धा मराठमोळी आहे. तिचे आजोबा म्हणजे सुप्रसिद्ध गायक-वादक पंढरीनाथ कोल्हापुरे. आई शिवांगी कोल्हापुरे. आईने एकाद-दुसऱ्या चित्रपटात काम केलं असलं तरी उठावदार अशी काही तिची कामगिरी नाही. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही तिची मावशी. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची श्रद्धा ही भाचे-नात. साहजिकच तिचे अनेकांशी मराठीतूनच संवाद असतात.
श्रद्धा शास्त्रीय संगीत आणि कथ्थक शिकली आहे. तिला लिहिण्याचा आणि पेंटिंगचा छंद आहे. 'गलियां 'तेरी गलियां' (एक व्हिलन) या गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या संगीत कारकिर्दीचा श्रीगणेशा केला आहे. यानंतर तिने 'दो जहां..'(हैदर), 'बेजुबां फिर से..' (एबीसीडी 2), 'सब तेरा.. (बागी), 'फिर भी तुम को .. (हाफ गर्लफ्रेंड) अशी गाणी तिने गायली आहेत. 'रॉक ऑन2' साठी तिनं जॅझ आणि रॉक संगीताचं प्रशिक्षणही घेतलं.
'तीन पत्ती' हा तिचा पहिला चित्रपट. 'स्त्री', ' बागी', 'हैदर', 'एक व्हिलन' ,'साहो' आणि 'छिछोरे' 'आशिकी 2' ,'रॉक ऑन 2', यात तिने लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. दरम्यान 'ओके जानू', 'हसीना पारकर', बत्ती गुल मीटर चालू' असे फ्लॉप चित्रपटही तिने दिले.
वरुण धवनसोबतचा 'स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट म्हणजे 'एबीसीडी 2' चा सिक्वेल आहे. 'आशिकी 2' हा तिचा सर्वात गाजलेला चित्रपट.

No comments:
Post a Comment