बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याचवेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी, बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी दोन गोष्टींसाठी खास करुन ओळखले जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याचे गाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सोन्यावरील प्रेम. बप्पीदांना सोने किती आवडते हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. मात्र, ते एवढे दागिने का घालतात हे फार कमी जणांना ठाऊक आहे. २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेल्या बप्पीदांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली. मात्र, १९७६ साली आलेल्या 'चलते-चलते' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र वप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढे सोने घालण्यामागचे कारण सांगितले. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की, सोने माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोने घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असे बप्पीदांनी सांगितले. दरम्यान, बप्पीदांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षादेखील अधिक सोने असल्याचे सांगण्यात येते. बप्पीदा यांनी आजवर 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरू', 'घायल', 'रंगबाज' या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे.
Sunday, November 29, 2020
बप्पीदा एवढं सोनं गळ्यात का घालतात?
बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याचवेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी, बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी दोन गोष्टींसाठी खास करुन ओळखले जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याचे गाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सोन्यावरील प्रेम. बप्पीदांना सोने किती आवडते हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. मात्र, ते एवढे दागिने का घालतात हे फार कमी जणांना ठाऊक आहे. २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेल्या बप्पीदांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली. मात्र, १९७६ साली आलेल्या 'चलते-चलते' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र वप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढे सोने घालण्यामागचे कारण सांगितले. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की, सोने माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोने घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असे बप्पीदांनी सांगितले. दरम्यान, बप्पीदांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षादेखील अधिक सोने असल्याचे सांगण्यात येते. बप्पीदा यांनी आजवर 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरू', 'घायल', 'रंगबाज' या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे.
Friday, November 13, 2020
वीणा-जिच्या सौंदर्याचे निर्मातेही दिवाने
चित्रपटसृष्टी हे एक ग्लॅमरचं जग आहे, ज्यामध्ये सौंदर्याला स्वतःचं एक महत्त्व आहे. चित्रपटसृष्टी अजूनही मधुबालाची आठवण काढते, कारण ती चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जात होती. मुंबई चित्रपट जगतात अनेक सौंदर्यवती अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्यावर अनेक चित्रपट निर्माते अक्षरशः लट्टू झाले. अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती वीणा. म्हणजेच ताजौर सुलताना, जिने शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची 14 नोव्हेंबर रोजी 16 वी पुण्यतिथी आहे.
विणा ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वीणा म्हणजेच तजौर सुल्ताना. ही घटना 1941 ची आहे. लाहोरमधील एका फिल्म कंपनीची जाहिरात वाचल्यानंतर अमृतसरमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीने म्हणजेच ताजौर सुलतानाने होऊ घातलेल्या 'गवंडी' नावाच्या पंजाबी चित्रपट निर्मात्याकडे आपले फोटो गुपचूपपणे पाठवून दिले. तिला तिच्या निवडीची खात्री होती, कारण तिला वाटत होते की तिच्यासारखी सुंदर दुसरी मुलगी अगदी दूर दूरपर्यंत नाही. तिचे पालक चित्रपटाविरोधात होते. असे असले तरी, सुलतानाचा भाऊ शहजादा इफ्तिखारदेखील 'गवंडी' ची जाहिरात देणाऱ्या फिल्म कंपनीत कॅमेरामॅनचा सहाय्यक होता.
या चित्रपटासाठी सुलतानाची निवड झाली. 'गवंडी'चे निर्माते सेठ किशोरी लाल यांनी सुलतानाचे नाव वीणा ठेवले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा घरात मोठा आगडोंब उसळला. ही गोष्ट महाविद्यालयात कळल्यावर तर महाविद्यालयाने सुलतानाचे नाव काढून टाकले. इकडे सुलतानाच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली. चित्रपट निर्माते प्रस्ताव घेऊन घरी येऊ लागले तेव्हा घरातले लोक गडबडून गेले. त्यांनी सुलतानाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं, तेव्हा शहजादा आपल्या बहिणीला घेऊन मुंबईला आला.
सुलताना म्हणजेच वीणा अप्रतिम सुंदर होती, जो कोणी तिला पाही, तो वेडा होऊन जाई. वीणा मुंबईला आली तेव्हा इथले प्रसिद्ध निर्माते तिच्यावर फिदाच झाले. मजहर खान या मोठ्या निर्मात्याने तिला 'याद' या आपल्या नव्या चित्रपटात घेतले. मेहबूब खान तर वीणाच्या सौंदर्याने इतका मोहित झाला की त्याने वीणाबरोबर दहा वर्षांचा करारच करून टाकला. तिला दरमहा दोन हजार रुपये वेतन निश्चित झाले, शिवाय अशोक कुमार 'नजमा' (1943) आणि 'हुमायून' (1945) मध्ये वीणाची वर्णी लावण्यात आली आणि नंतर 'मदर इंडिया'साठीही साइन करण्यात आले. मात्र नंतर ही भूमिका नरगिसने साकारली.
यानंतर, वीणा शीर्ष अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली. 'मुगल-ए-आजम' बनवणाऱ्या आसिफने तिला 'फूल' मध्ये संधी दिली. अशोक कुमार हेही तिच्यावर प्रभावित झाले होते, त्यांनी तिला आपल्या 'चलती का नाम गाडी' चित्रपटात घेतले. गुरुदत्त यांनी तिला'कागज के फूल' मध्ये संधी दिली. नाडियादवाला यांनी तिला 'ताजमहाल'मध्ये नूरजहां बनवले, तर शेख मुख्तार यांनी' नूरजहां 'हा चित्रपट बनवून वीणाला प्रमुख भूमिकेत घेतले. वय वाढत गेलं तसं वीणाने चरित्र भूमिका करायला सुरुवात केली. 'दो रास्ता', 'पाकीजा' ते 'रझिया सुलतान' पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले.
अख्खी मुंबई फिल्मीदुनिया वीणावर भाळली होती, पण वीणा मात्र अल नासिरला हृदय देऊन बसली होती. अगोदरच तीन लग्ने केलेला नासिर भोपाळच्या राजघराण्यातील होता. सुरैया हॉलिवूड स्टार ग्रेगरी पॅकची फॅन होती. जेव्हा ग्रेगरी मुंबईला आला, तेव्हा त्याला मध्यरात्रीत सुरैयाच्या घरी नेऊन तिची भेट घालून देण्याचं काम अल नसीरने केले. त्याकाळी सुरैयाची एक झलक पहाण्यासाठी सकाळपासूनच तिचे चाहते तिच्या घरासमोर गर्दी करायचे. त्यांच्यात एक तिचा प्रियकरही होता जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्या घरासमोर उभे राहून सुरैयाची 'झलक' पाहण्याचा प्रयत्न करायचा. त्याला बाजूला करण्यासाठी फिल्मी जगतातील नामांकित लोकांना खूप प्रयत्न करावे लागले होते. सुरैयाचा तो प्रेमी दुसरा-तिसरा कोणी नाही तर वीणाचा भाऊ शहजादा इफ्तिखार होता.
Thursday, November 12, 2020
कोरोनाचा हिंदी चित्रपटांना मोठा फटका
2020 चा फिल्म इंडस्ट्रीवर खूप मोठा वाईट परिणाम झाला आहे. 2019 मध्ये बक्कळ पैसा कमावणारा फिल्म उद्योग यंदा टाळेबंदीमुळे पूर्ण कोसळला आहे. 2019 मध्ये सुमारे 17 चित्रपट '100 कोटी क्लब'मध्ये सामील झाले होते, तर 2020 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत 40 चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातला फक्त अजय देवगनच्या 'तानाजी' चित्रपटाने तेवढा चांगला व्यवसाय केला. मार्च 2020 मध्ये 'अन्ग्रेजी मिडीयम' च्या प्रदर्शनानंतर कोरोना टाळेबंदी दीर्घ काळ सुरू राहिली. हिंदी चित्रपट ज्या देशांमध्ये प्रदर्शित व्हायचे, त्या जगभरातील बर्याच देशांमध्ये, कोरोना आटोक्यात आल्याने दिलासा मिळाल्यामुळे सामान्य जीवन खूप अगोदर सुरळीत सुरु झाले होते. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि देशात सात महिन्यांची टाळेबंदी मागे घेतल्याने चांगले दिवस येतील असेही संकेत दिसत होते, पण आता वाढत्या थंडीमुळे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांमध्ये पुन्हा टाळेबंदी लादण्यात आली आहे,त्यामुळे पुन्हा हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या पदरी निराशा आली आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर चित्रपटाची निर्मितीही सुरू झाली आहे. महाराष्ट्र हा हिंदी चित्रपटसृष्टीचा कणा आहे. म्हणून निर्मात्यांनी विस्तृत योजना बनवण्यास सुरुवात केली होती आणि परदेशातील मुक्त बाजारपेठाही त्यांना आकर्षित करत होती, परंतु ब्रिटन, अमेरिका, मलेशिया आणि इतर देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट आल्याने सगळा गडबडघोटाळा झाला आहे. ब्रिटनमध्ये पूर्ण एक महिन्यासाठी पूर्णवेळ टाळेबंदी लागू केली गेली आहे आणि त्याचबरोबर आणखी काही युरोपियन देशांमध्ये अशाच प्रकारची टाळेबंदी करण्यात आली आहे. विदेशांमध्ये हिंदी चित्रपटांची चांगली कमाई होत असते . त्यामुळे निर्माते आपल्या देशाबरोबरच विदेशातही एकाच वेळी चित्रपट रिलीज करत असतात. आता परदेशात संधी नाही,त्यामुळे फक्त भारतात चित्रपट प्रदर्शित करून नुकसानच पदरी पडणार आहे. शिवाय देशात आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत आहे, अशा परिस्थितीत लगेच चित्रपटगृहांना गर्दी होणार नाही. साहजिकच देश-परदेशात कमाईवर पाणी सोडावे लागणार असल्याने अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. सर्रास मोठे निर्माते दिवाळी आणि नाताळ यांसारख्या सण-उत्सव काळात आपले चित्रपट प्रदर्शित करत असतात. पण यावर्षी हा मुहूर्त सगळ्यांनी टाळला आहे. बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटाचीही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अशाच प्रकारे रणवीर सिंह अभिनित क्रिकेटवर आधारित असलेल्या '83' या चित्रपटाचे प्रमोशन एमएमआर डी ग्राउंडमध्ये रियल क्रिकेटर्स आणि रील क्रिकेटर्स यांच्या उपस्थित होणार होते, परंतु इंग्लंड आणि मलेशियासह आणखी काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टाळेबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन रद्द करण्यात आले आहे.
फिक्कीच्या एका अहवालानुसार 2019 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला 191 अब्ज रुपयांची कमाई झाली होती, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारातून 21 अब्ज रुपये मिळाले होते. मलेशिया, चीन, ब्रिटन आणि यूएसएमध्ये हिंदी चित्रपट बर्यापैकी लोकप्रिय आहेत आणि येथे चित्रपट रिलीज केल्याने चित्रपट निर्मात्यांची मोठी कमाईदेखील होते. मलेशिया तर हिंदी आणि तमिळ चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठच आहे. सध्या तेथे सर्व थिएटर बंद आहेत, त्यामुळे चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
चीन गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडसह भारतीय चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट 70 देशांमधील 1300 थिएटरांमध्ये रिलीज झाला होता. आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाने देशात 387 कोटींचा व्यवसाय केला होता, तर केवळ चीनमध्ये याच चित्रपटाने तब्बल 1200 कोटींची कमाई केली होती. त्यामुळेच 2021 च्या पहिल्या तीन महिन्यांपर्यंत कोणताही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. एका चित्रपट व्यवसाय अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार परदेशी बाजाराशिवाय बडे चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट रिलीज करण्याचा धोका पत्करणार नाहीत. साहजिकच ते योग्य वेळेची वाट पाहणे पसंद करतील. असो, कोरोनामुळे या उद्योगाला आतापर्यंत 1500 ते 2000 कोटींचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना आपले चित्रपट यूके, अमेरिका आणि मलेशियामध्ये घाईगडबडीत प्रदर्शित करणं आणखी आर्थिक नुकसानीचं ठरणार आहे. त्यातच हॉलिवूड चित्रपट देखील रिलीज होणार नाहीत. हॉलीवूड आणि भारतीय चित्रपट यांच्याबाबतची परिस्थिती वेगवेगळी आहे. हॉलीवूड निर्माते वेळ आणि पैशांचे गणित लावले तर त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन वर्षभरदेखील पुढे ढकलू शकतात. पण भारतीय चित्रपटांचे तसे नाही. भारतीय निर्माते पैसे जास्त काळ गुंतवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे विदेश बाजार खुला होण्याची वाट पाहण्याबरोबरच देशांतर्गत व्यवहारांवर सुरळीत होण्याची वाट पाहताना त्यांना आणखी चार महिने तरी आपले चित्रपट दडपून ठेवावे लागणार आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Friday, November 6, 2020
चित्रपट निर्मात्यांना आता 2021 ची प्रतीक्षा
महाराष्ट्र सरकारने 6 नोव्हेंबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लगेच प्रेक्षक सिनेमागृहांकडे फिरकणे शक्य नाही. साहजिकच दिवाळीनंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती आणि काही राज्यांनी सुरूही केली, पण नवीन चित्रपट नसल्याने त्याला मरगळ आली आहे. महाराष्ट्रात बॉलीवूड चित्रपटांना अधिक पसंदी दिली जाते,परंतु राज्य सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. सिनेमागृहे लवकर सुरु करण्यास परवानगी दिली असती तर दिवाळीत तरी चित्रपट प्रदर्शित झाले असते आणि इंडस्ट्रीला दिवाळी उत्सवाचा फायदा झाला असता, पण आता त्यामुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान झाले, असे बोलले जात आहे. शेवटी कोरोनाचा संसर्गाचा प्रसार वाढू नये, यासाठी राज्य सरकारची भूमीकादेखील महत्त्वाचीच आहे. कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात 50 टक्के आणि अन्य राज्ये मिळून 50 टक्के, असे भयानक चित्र असताना महाराष्ट्र सरकारला काळजी घेणं भाग होतं. महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी नाही, तिथे सिनेमागृहांचे काय! पण आता मंदिरेदेखील उघडली जातील, अशी चिन्हे आहेत. सगळे काही व्यवस्थित चालले तर लवकरच मंदिरे उघडली जातील. त्याची नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
गेल्या सात-आठ महिन्यापासून राज्यात सिनेमागृहे आणि नाटक- थिएटर बंद होते. या कालावधीत नाटकांचे आर्थिक कंबरडे मोडले. पण सांगतो कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला. या कालावधीत ओटीटी माध्यमातून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला. पण ओटीटी हा सिनेमागृहांना पर्याय नाही, हे मात्र पुढे आले.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून बिग बजेट चित्रपट ओटीटी(ओवर द टॉप) प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा जवळपास सगळ्याच नामवंत कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करायला नकार दिला होता. यात ईदला प्रदर्शित होणारा सलमान खानचा 'राधे',अजय देवगणचा 'मैदान' आणि अमीर खानचा 'लालसिंह चड्डा' , विकी कौशलचा 'सरदार उधमसिंह', अक्षय कुमारचा 'बेलबॉटम', रणवीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र',रणवीर सिंहचा '83' आदी चित्रपटांचे निर्माते गोंधळात होते. ही सगळी निर्माता मंडळी प्रतीक्षा करायला तयार होते. या निर्मात्यांना वाटत होते की, ओटीटी प्लेटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे घाटयाचा सौदा आहे.
ओटीटी प्लेटफॉर्म हा नवीन पर्याय असला तरी तो सिनेमागृहांची बरोबरी कदापि करू शकत नाही. या प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांना घरातून बसून नवीन चित्रपट पाहायला मिळत असला तरी निर्मात्यांना या माध्यमातून व्यवसाय करायला अधिक फायदा दिसत नव्हता. जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' असेल किंवा विद्या बालनचा 'शकुंतला देवी' असेल अथवा अमिताभ बच्चन चा 'गुलाबो सीताबो', या चित्रपट निर्मात्यांना ओटीटी प्लेटफॉर्ममधून कसलाच मोठा फायदा नाही झाला. त्यामुळे अन्य बाकी निर्माता आपले चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करायला पुढे आले नाहीत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे चित्रपट निर्माते मंडळींचे 2020 मध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्माता आता 2021 मध्येच आपले चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.
2020 मध्ये काही चित्रपट प्रदर्शित होणार होते,परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सिनेमागृहे बंद राहिली, साहजिकच या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले. आता हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होतील. शिवाय 2021 मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपटदेखील याच वर्षात प्रेक्षकांपुढे येणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. 2021 साल चित्रपटसृष्टीसाठी फारच महत्त्वाचे असणार आहे. 2021 मध्ये अक्षयकुमारचा 'सूर्यवंशी', 'रक्षाबंधन', आणि 'बेलबॉटम', अजय देवगणचा 'मैदान', 'कभी ईद कभी दिवाली', सलमान खानचा 'राधे', अमीर खानचा 'लालसिंह चड्डा', जान्हवी कपूरचा 'तख्त', 'आदित्य राय कपूरचा 'एक विलेन2', वरुण धवनचा 'मिस्टर लेले' असे काही महत्त्वाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
असं मानलं जातं आहे की, 2021 साल चित्रपटसृष्टीला मालामाल करून सोडेल. कारण या खजान्यात काही मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. सिनेमागृहांचे मालकदेखील मोठ्या चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. कारण त्यांनी 2020 मध्ये मोठं नुकसान झेललं आहे. आता परीक्षा सिनेमागृहांची आहे. त्यांना सरकारने जाहीर केलेल्या नियम-कायद्याच्या चौकटीत चित्रपट प्रदर्शित करावयाचे आहेत. प्रत्येक शोनंतर सिनेमागृहांना जंतू मुक्त करावयाचं आहे. प्रेक्षकांना मास्क लावल्याशिवाय चित्रपट गृहांमध्ये प्रवेश मिळणार नाही.सॅनिटायझर, सामाजिक अंतर यांचे नियम इत्यादी पाळावे लागणार आहेत.
2020 मध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वच लोकांचे मोठे हाल झाले. त्यामुळे आशा आहे की, 2021 साल चित्रपट आणि त्यांच्या निर्मात्यांना मालामाल करून सोडेल. चित्रपट कर्त्यांना तर आता आशेची किरणे 2021 मध्येच दिसून येत आहेत. पूर्ण वर्षभर प्रतिबंध घालण्यात आल्याने सिनेमागृहांची रयाच गेली होती. भारतात सिनेमा आणि क्रिकेट यांचं वेड असणाऱ्या लोकांची संख्या भरमसाठ आहे. 2020 मध्ये जवळपास वर्षभर चित्रपट प्रेमी सिनेमागृहांपासून दूर राहिले आहेत. आता सिनेमागृहे नियम-अटींसह सुरू होत आहेत. हळूहळू नियम-अटी शिथिल होतील आणि प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतील, परंतु यासाठी 2021 सालाची वाट पाहावी लागणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई
कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...
-
मोहम्मद रफी या गायकाचा जन्म अमृतसर (पंजाब) जवळील कोटला सुलतानसिंह या छोट्याशा गावी 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. वडील नाभिक काम करत.त्यांच...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
एक काळ असा होता की, त्यावेळेला सिनेमाशी जोडल्या गेलेल्या लोकांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नसे. यामुळेच त्या काळातील संभ्रमित झालेल्या ...