Monday, February 15, 2021

बॉलिवूड कलाकार आणि त्यांची लग्ने


बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कोण कोणाशी लग्न करणार आणि वय उलटत गेलं तरी ही बया किंवा बाबा का अजून करत नाहीत, अशा सारख्या चर्चा मागे सातत्याने वाचायला, बघायला मिळायच्या. काहीजणांनी तर आपलं करिअर बरबाद होऊ नये म्हणून लग्न करायचं टाळलं तर काही जणांनी आपलं लग्न माध्यम आणि आपल्या चाहत्यांपासून लपवले. गोविंदाने कित्येक वर्षे आपल्या करिअरला धोका पोहचेल म्हणून आपलं लग्न झाल्याचं सांगितलं नाही. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. लोकंही कलाकारांची लग्ने आणि त्यांनाही आयुष्य आहे हे स्वीकारायला लागले आहेत. राणी मुखर्जीने लग्न झाल्यावरही चित्रपटात काम केलं. ऐश्वर्या रॉय-बच्चन, दीपिका पादुकोन हेही  काम करत आहेत. हा कालानुरूप बदल आपण स्वीकारालाच पाहिजे. कोरोना काळाने तर सगळ्यांनाच मोठा धडा दिला आहे. यामुळे अनेक माणसं आपल्या लोकांच्या सानिध्यात राहिली. काहींना आपली माणसं कळली, समजून घेता आली. यात बॉलिवूड कलाकारदेखील मागे नाहीत. याच कोरोना लॉकडाऊन काळात अनेक कलाकारांनी आपली लग्ने उरकली तर काही कलाकार 

2021 मध्ये लग्नाच्या बेढीत अडकायला आतुर आहेत. यात सगळ्यात सुरुवातीला नाव येतं ते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं. रणबीर कपूर यापूर्वी नेहमीच 'लव्हर बॉय'च्या छबीत कैद असल्याचं आपण पाहिलं आहे. आणि त्याने  कित्येक सुंदर अभिनेत्रींचे हृदयदेखील तोडून टाकली आहे. मग कॅटरिना कैफ असो किंवा दीपिका पादुकोन. रणबीर कपूर सुरुवातीपासूनच प्रेम आणि ब्रेकअपच्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. पण आता रणबीर कपूर तिच्या पेक्षा दहा वर्षे लहान असणाऱ्या आलिया भट्टच्या प्रेमात आहे. 

रणबीर-अलिया प्रेमाच्याबाबतीत इतके गंभीर आहेत की रणबीर कपूर आणि  तिने यापूर्वी आधीच आपल्या लग्नाची योजना आखली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पडलेले लॉकडाऊन  रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले. पण आता माध्यमातून येणाऱ्या बातम्यांनुसा ‘ब्रह्रमास्त्र’ च्या रिलीजनंतर लग्न करण्याचे त्यांचे पक्के झाले आहे.

सुष्मिता सेन ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार जगली आहे. मधे ती आजारी पडली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात आला तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेला रोहमन. रोहमन आणि सुष्मिता यांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. यानंतर ते बराच काळ 'लिव इन रिलेशन' मध्ये राहिले. बातम्यांनुसार यावर्षी त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. यावर्षी सोनाक्षी सिन्हा देखील लग्नाच्या बोहल्यावर चढू शकते. बंटी सचदेव याच्याशी सोनाक्षीचं नातं जुळलं आहे. फिल्म आणि टीव्ही कलाकार एजाज खानचं आणि मॉडेल अभिनेत्री असलेल्या पवित्रा पुण्या यांच्यात नाजूक नाते संबंध जुळल्याची वार्ता आहे. 41 वर्षाच्या एजाज खाननेदेखील यावर्षीचा लग्नाचा मुहूर्त शोधला आहे. कॅटरिना कैफच्याही नावाची चर्चा सुरू आहे.  श्रद्धा कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांचेही नाते बहरात आहे. बातम्यांनुसार यावर्षी या दोघांचाही लग्नाचा विचार आहे. एका बातमीनुसार फरहान अख्तर तिच्या पेक्षा निम्या वयाच्या  शिबानी दांडेकरसोबत  लग्न करण्याचा इराद्यात आहे. फरहान अख्तरशिवाय मलाइका अरोड़ा खानदेखील तिच्यापेक्षा कमी वयाच्या अर्जुन कपूरसोबत लवकरच लग्नाच्या बेढीत अडकणार आहे.  दिशा पटनी आणि टाइगर श्रॉफदेखील 2021मध्ये लग्न करू शकतात.

हे अडकले लग्नाच्या बेढीत

2020 सगळ्यांसाठीच अडचणींचा गेला. अशा कठीण काळात देखील काही कलाकार मास्क लावून लग्नाच्या बेढीत अडकले. यात सर्वात अगोदर नाव येत ते  गायिका नेहा कक्करचं. तिने लॉकडाऊन काळ असताना सर्व ती खबरदारी घेत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिचा प्रेमी रोहन प्रीत यांच्या लग्न बंधनात अडकली. याशिवाय  उदित नारायण यांच्या मुलाने म्हणजेच आदित्य नारायणनेदेखील डिसेंबर 2020 मध्ये श्वेतासोबत लग्न केलं. यानंतर मॉडल अभिनेत्री गौहर खाननेदेखील प्रेमी जैद दरबारसोबत 25 डिसेंबरमध्ये विवाह केला.

प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन तिची बालपणापासूनची मैत्रीण आणि प्रेमिका नताशा हिच्यासोबत  24 जानेवारी 2021 मध्ये लग्नाच्या बेढीत अडकला. दक्षिण आणि बॉलीवुड कलाकार काजल अग्रवाल हिनेदेखील ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केलं. डांसर कोरियोग्राफर प्रभुदेवा यांनी मुंबईतील डॉक्टर हिमानी हिच्याशी लॉकडाऊन काळात अगदी साध्या पद्धतीने आणि अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह केला.याशिवाय साउथ आणि बॉलीवुड एक्टर राणा डग्गूबातीनेही  प्रेमिका मिहिकाशी लग्न केलं. मिहिका इंटीरियर डिजाइनर आहे.

कोरोनाने आणलं जवळ

कुणीच असा विचार केला नव्हता की, आपली स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागतील. घराबाहेर पडायला देखील बंदी होती. मात्र कोरोना काळाने सगळ्यांनाच एक नवीन विचार दिला. या काळात जेव्हा संपूर्ण आयुष्यच थांबलं तेव्हा काही कलाकारदेखील एकत्र आले. आपल्या कामात ते एकमेकांना वेळसुद्धा देऊ शकत नव्हतं. याच काळात सलमान खान आणि जैकलीन फर्नाडिस त्याच्या फार्म हाउसमध्ये एकत्र राहिले. आलिया आणि रणबीर कपूरदेखील सोबत राहिले. मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूरसुद्धा एकमेकांसोबत होते. या कालावधीत सतत व्यस्त असणाऱ्या कलाकारांनादेखील जाणवलं की त्यांच्यासाठी त्यांचं प्रेम किती महत्त्वाचं आहे. लग्न आयुष्यभरासाठी कैद असली तरी या बेढीत प्रत्येकालाच राहायला आवडतं.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली


2 comments:

  1. 'लव स्टोरी 2050' द्वारा प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेता हरमन बवेजा याने 21 मार्च 2021 रोजी साशा रामचंदानीशी विवाहबद्ध झाला आहे. दोघांनी डिसेंबर2020 मध्ये साखरपुडा केला होता.

    ReplyDelete
  2. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी ही जास्त चित्रपटांत दिसत नसली, तरी ती नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत असल्याचं जगजाहीर आहे, पण या दोघांनी अजूनही आपल्या नात्याची फारशी उघडपणे कबुली दिली नाही. अथिया के. एल. राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत. तीन वर्षापासून अधिक काळ अथिया के. एल. राहुल एकमेकांना डेट करत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये हे दोघं लग्न करतील. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. शिवाय राहुलच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या आई वडिलांची भेट घेतळी असल्याचीही चर्चा आहे. तसेच मध्यंतरी अथिया-राहुलने वांद्रे येथे नवं घर खरेदी केलं. लग्नानंतर अथिया राहुल याच घरात राहणार आहेत. मुंबईमध्येच अभिनेता सुनील शेट्टीच्या लेकीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. डिसेंबरमध्ये अथिया-राहुल लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सारेच जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...