आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांचं नाणं फिल्मी जगतात खणखणीत चाललं आहे. कंपन्या आपल्या थैल्या उघडून उभ्या आहेत. एक-दोन नव्हे तर अर्धा डझन चित्रपटांची घोषणा करा. पैशांची अजिबात कमतरता नाही. आम्हाला पैशांची गुंतवणूक करायची आहे. आम्हाला चित्रपट कसे बनवायचे हे माहित नाही, आम्हाला गुंतवणूक करायची आहे. म्हणून आम्ही पैसे गुंतवतो. तुम्ही अर्धे निर्माता व्हा, आम्ही अर्धे निर्माते. तुम्हीही मोठे व्हा आणि आम्हीही.तुमचाही विकास होईल आणि आमचाही, अशी परिस्थिती सध्या आहे ज्यावेळेला निर्माता-दिग्दर्शक एक ग्लास दुधाची मागणी करतात तेव्हा कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या दारात म्हशी बांधण्यासाठी येतात. फक्त हुकूम करा. पैसा रोलिंग होत राहिला पाहिजे. कथेचं काय घेऊन बसलात, फक्त 'हिरो'ची तारीख घेऊन या.
मागे ऋत्विक रोशन आणि दीपिका पादुकोण हे मधू मन्तेनाच्या रामायणवर आधारित थ्रीडी चित्रपटात काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मन्तेना महाभारतावर एक चित्रपट बनवणार असून यात दीपिका पादुकोण बहुधा द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. रामायणवर तयार होत असलेल्या चित्रपटाला भव्यपणा देण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
घोषणा ऐकून त्यांच्या चाहऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या चाहत्यांनी आपापल्या परीने चिल्लर गोळा करायला सुरुवात केली. कारण ऋत्विकसारखा चिकना राम आणि दीपिकासारखी सुंदर अभिनेत्री सीतेच्या पहेरवात पाहण्याचे भाग्य मिळेल. दोघांना राम-सीता म्हणून पहाण्याची प्रेक्षकांनीही कल्पना सुरू केली होती. पण मन्तेना म्हणाले की ऋत्विक रावण होईल. मग या चाहत्यांची मोठी निराशा झाली. फक्त कल्पना करा. सिक्स पॅक्ससह दिसणारा 'छोरा' नऊ डोकी डोक्यावर घेऊन कसा दिसेल? कसे वाटेल. पाणीपुरीमध्ये आईस्क्रीम घालून कोणी पाणी खाईल का?
बहुतेक वाटतं की, ऋत्विकला राम बनण्यासाठी आपल्याला आणि त्याला अजून वाट पाहावी लागेल.यापूर्वी पहिल्यांदा राम बनवण्याचा प्रयत्न त्याचे सासरे म्हणजेच संजय खानने केला होता. खान यांनी 2013 मध्ये ‘द लीजेंड आॅफ राम’ बनवण्याची घोषणा केली होती.दीडशे कोटीच्या आसपास यासाठी लावणार होते. सगळी तयारी झाली होती. शूटिंग लंका म्हणजेच श्रीलंका ममध्ये होणार होती. जायद खान लक्ष्मण आणि अमिताभ बच्चन रामाचे पिता दशरथ बनणार होते. पण मांजर आडवं गेलं आणि ‘द लीजेंड आॅफ राम’ चित्रपट बनू शकला नाही.
मर्यादा पुरुषोत्तम राम कोणाला व्हायचं नाही. सलमान खानसुद्धा राम बनणार होता. त्याचा भाऊ सोहेल खानने खूप वर्षांपूर्वी त्याला राम बनवण्याची घोषणा केली होती. रामाने सोन्याचे हरीण मारले होते तर सलमानवर काळे हरीण मारण्याचा आरोप झाला. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत मोठा धुमाकूळ झाला. सगळीकडूनच सलमानची निंदा झाली. आणि या निंदेत आणि कोर्ट कचेरीच्या भानगडीत सोहेलचा राम हरवून गेला.
आता असं वाटतं की, या फिल्म इंडस्ट्रीला रामाअगोदर रावणाची गरज आहे. त्यामुळे पहिल्यादा रावणाचा शोध सुरू झाला आहे. आता टी सिरीजवाल्यांनी सैफ अली खान याला रावण बनवले आहे. "आदिपुरुष' या चित्रपटात तो रावण बनणार आहे. यांनीदेखील 'बाहुबली'फेम प्रभाषच्या रूपाने रामाच्या भूमिकेसाठी नंतर निवड केली.पहिल्यांदा साडेपाच फूट असणाऱ्या सैफ अली खानला आठ फुटाचा रावण बनवला. नकली नऊ डोकी लावून आणि 'मैं लंकेश' म्हणत गडगडाट करत सैफ असेल तेव्हा तैमुर म्हणेल ,'पापा पागल हो गये हैं' करीना कपूर खान तोंड दाबून हसत सुटेल आणि विचार करेल की, या दसऱ्याला तैमुरला रामलीला दाखवण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment