बॉलिवूडच्या कलाकारांना हॉलिवूडचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. विशेष म्हणजे काही बॉलिवूडच्या अभिनेता-अभिनेत्रींनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे जलवे ' दाखवलेही आहेत. विषय आणि आवश्यकतेनुसार बॉलिवूडदेखील हॉलिवूडच्या कलाकारांना 'गांधी' सारख्या चित्रपटांमध्ये संधी देत आला आहे. आजतागायत हे सांस्कृतिक आदान-प्रदान चालूच आहे. सध्या बॉलिवूडचे काही कलाकार हॉलिवूड चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. या सक्रीयतेवर एक दृष्टिक्षेप...
भारतीय चित्रपटांमध्ये आपले स्थान पटकवल्यानंतरआणि देशभर प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्येक कलाकाराची आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले 'हुनर' दाखवण्याची,त्याचा प्रसार करण्याची इच्छा असते. आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये हॉलिवूडची आपली एक प्रतिष्ठा आहे. बॉलिवूडच्या जुन्या कलाकारांचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की, शशी कपूर, ओमपुरीपासून इरफान खानपर्यंत अनेकांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले एक स्वतःचे स्थान निर्माण केले होते. या स्पर्धेत आपल्या अभिनेत्रीदेखील मागे नाहीत. ऐश्वर्या रॉय, मल्लिका शेरावत, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोन यांनी देखील हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपला 'हुनर' दाखवला आहे.
नवीन पिढी सक्रिय
हॉलिवूड चित्रपटांमध्ये सध्या ज्या अभिनेत्री सक्रिय आहेत, त्यात डिंपल कापडियांचे यांचे नाव पुढे आहे. डिंपल यांनी हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या 'टेनेट' चित्रपटामध्ये काम केले आहे. हा चित्रपट 2020 मध्ये ब्रिटन आणि अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. रणदीप हुडडा याने 'मान्सून वेडिंग' मध्ये काम केले होते. याशिवाय त्याने 2020 प्रदर्शित झालेल्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्येदेखील काम केले आहे. यात क्रिस हॅम्सवर्थने प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट सध्या नेटफलिक्सवर पसंद केला जात आहे. पंकज त्रिपाठी यांनीदेखील या चित्रपटात काम केले आहे. सुनील शेट्टीसुद्धा जॅफरी चीन यांच्या 'कॉल सेंटर' चित्रपटात सरदार पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करत आहे. अली फजल 'डेथ ऑन द नील' चित्रपटात काम करत आहे. प्रियांका चोप्रा हिचे 'मॅटरिक्स’, ‘टैक्स्ट फॉर यू’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
खूप प्रसिद्धी मिळवली
इरफान खान यांना हॉलिवूडमध्ये चांगल्या संधी मिळत होत्या. मात्र गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. 'जुरासिक वर्ल्ड’, ‘लाइफ आॅफ पई’, ‘आइ लव यू’, ‘द नेमसेक’, ‘न्यूयार्क’ ,‘द अमेजिंग स्पाइडरमैन' सारख्या चित्रपटांमध्ये इरफान खान यांनी काम केले आहे. ओम पुरी यांनीदेखील 'सिटी आफ जॉय’, ‘माय सन द फेनेटिक’, ‘ईस्ट इज ईस्ट’सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अमरीश पुरी यांनी स्टीवन स्पीलबर्गच्या 'इंडियाना जोंस एंड द टैम्पल आॅफ डूम' मध्ये जबरदस्त अभिनय केला होता. नसीरुद्दीन शाह यांनी ‘मानसून वेडिंग’, ‘द लीग आॅफ एक्स्ट्राआडनरी जैंटलमेन’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूरनेही हॉलीवुडच्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’, ‘मिशन इंपासिबल’ आणि ‘प्रोटोकोल’मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
हॉलीवुडपासून लांब
अमिताभ बच्चनपासून सलमान खान पर्यंतच्या कलाकारांना हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळत असतात. पण काही कलाकारांना हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वारस्य नसल्याचेही पाहायला मिळते. यात सर्वात पुढे नाव येते ते करिना कपूरचे! करिनाला कित्येकदा हॉलिवूडच्या ऑफर आल्या होत्या,पण तिने त्या साफ नाकारल्या. ती आजोबा राज कपूर यांच्या 'जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां' या गाण्याची आठवण करून देत हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला नकार देते.याशिवाय सलमान खान यालाही काही हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, मात्र त्यानेही त्या धुडकावल्या. मात्र त्याने 2007 मध्ये आलेल्या 'मेरीगोल्ड' या हॉलिवूड चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्याने या चित्रपटांना रामराम ठोकला. अमिताभ बच्चन यांनीदेखील पूर्वी 'द ग्रेट गॅटसबॉय' या एका हॉलिवूड चित्रपटात काम केले होते, मात्र नंतर त्यांनीही हॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे स्वारस्य दाखवले नाही.
अभिनेत्री सक्रिय
बॉलिवूड मधील काही अभिनेत्रींनी 'बॉलिवूड ते हॉलिवूड' असा प्रवास केला आहे. यात ऐश्वर्या रॉय-बच्चन, प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत,दीपिका पादुकोन, नर्गिस फाक्री, तब्बू, फ्रीडा पिंटो, डिंपल कापडिया आदींचा समावेश आहे. ऐश्वर्याने ‘ब्राइड एंड प्रेजुडिस’, ‘प्रोवोक्ड’, ‘मिस्ट्रेस आॅफ स्पाइसेस’, ‘द पिंक पैंथर’मध्ये काम केलं आहे. फ्रीडा पिंटो हिने ‘स्लमडाग मिलियनेअर’ मध्ये खूप लोकप्रियता मिळवली. तब्बूने ‘द नेमसेक’ आणि ‘लाइफ आफ पई’ मध्ये काम केलं आहे. नर्गिस फाक्री ‘स्पाई’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. प्रियांका चोप्रा हिने तर अभिनयाबरोबरच गायिका म्हणून ही धुमाकूळ घातला आहे. तिचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड पट चांगलाच चर्चेत राहिला . याशिवाय बॉलिवूडमधील मोस्ट टांलेंटेड आणि सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते,त्या दीपिका पादुकोननेदेखील 'ट्रिपल एक्स' या हॉलिवूडपटात प्रसिद्ध अभिनेता विन डीजलसोबत काम केले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
'वलिमै' या दाक्षिणात्य सिनेमामध्ये हुमा कुरेशीने पोलिसाची भूमिका साकारली आहे. या नॉन मेट्रो शहरांमध्येही तिच्या कामाचे कौतुक होत आहे. यासाठी तिने किक बॉक्सिंगही शिकली आहे. आता प्रेक्षकांना तिने अधिकाधिक अॅक्शन रोल करताना बघायचं आहे. 'वलिमै' चित्रपटामुळं मला जे प्रेम मिळत आहे ते आश्चर्यकारक असल्याचंही हुमाचं म्हणणं आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील एका खास गाण्यातही हुमा दिसली आहे. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे ते सोशल मीडियावर तिच्या सुंदर डान्स मूव्हसचं कौतुक करत आहेत. हुमानं इंडस्ट्रीमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत आणि तिच्या विविध भूमिकांद्वारे तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध केलं आहे, मग ते 'गैंग्स ऑफ वासेपूर', 'एक थी डायन', 'बदलापूर', 'जॉली एलएलबी २', 'महाराणी' किंवा आता 'वलिमै' असो. मागच्या वर्षी हुमानं झंक स्नायडरच्या 'आर्मी ऑफ द डेड'मधून हॉलीवूडमध्येही पदार्पण केलं आहे. त्यापूर्वी ती गुरिंदर चढ़ा यांच्या 'व्हाइसरॉय हाऊस'चाही भाग होती.
ReplyDeleteआलिया भट्ट हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड चित्रपटात काम करत असून सध्या लंडनमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
ReplyDeleteहॉलीवूडमधील लिओनार्डो डिकॅप्रियो हा एक नावाजलेला अभिनेता हा आहे. लिओनार्डोसोबत काम करायला मिळणे ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांचे असते. सध्या काही बॉलीवूडमधील कलाकार हॉलीवूडमध्ये जात आहेत. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्रींनी बॉलीवूडबरोबच हॉलीवूडमध्येही नाव कमावले आहे. पण बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हॉलीवूड स्टार लियोनार्डो डिकप्रियोच्या एका चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले. ते म्हणाले, 'हॉलीवूडचे दिग्दर्शक रिडले स्कॉट यांना त्यांच्या 'बॉडी ऑफ लाईज' या चित्रपटात नाना पाटेकर यांना कास्ट करायचे होते; परंतु त्यांनी दहशतवाद्याची भूमिका करणार नाही', असे सांगून ही ऑफर नाकारली.
ReplyDeleteप्रियांका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट 'लव्ह अगेन'मध्ये काम करत आहे. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. सॅम ह्यूगनसोबतच्या प्रियांकाच्या या रोमँटिक चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. या चित्रपटात प्रियांका मीरा रेच्या भूमिकेत दिसणार आहे.प्रियांका चोप्राकडे सध्या अॅक्शनपॅक्ड वेब सीरिज 'सिटाडेल' मध्ये दिसून येत आहे. ती लवकरच फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांच्या 'जी ले जरा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्या भूमिका आहेत. प्रियंका चोप्राचा पहिला हॉलीवुड चित्रपट 'बेवॉच' असून त्यानंतर प्रियांका अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको 2' मध्ये दिसली आहे.
ReplyDelete