यावर्षी अशा काही जोड्या सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच एकत्र पाहिले नाही. यांमध्ये अशी काही जोडपी आहेत जी वास्तविक जीवनात जीवनासाथीदेखील बनणार आहेत. यातली आणखीही काही जोडपी आहेत,जी पाहिल्यावर आपल्याला तोंडात बोटे घालावी लागणार आहेत.अजय देवगन आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदा रोहित शेट्टी यांच्या आगामी ‘गोलमाल 5’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहेत.अर्थात चित्रपटाच्या रिलीजनंतरच ही जोडी प्रेक्षकांना किती आवडते हे पाहावे लागणार आहे.
ऋत्विक रोशन - दीपिका पादुकोन ही जोडी पहिल्यांदाच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'फायटर' हा एक रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे. अक्षय कुमार सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'अतरंगी रे' मध्ये दिसणार आहे. याचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. या चित्रपटात धनुषही दिसणार आहे. आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर पहिल्यांदा 'चंडीगड करे आशिकी' चित्रपटात दिसणार आहेत. या रोमँटिक-विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहेत. हॉरर-कॉमेडी असलेल्या 'भूलभूलैया 2' चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलैया' या चित्रपटाचा हा रीमेक आहे. राजकुमार राव आणि जाह्नवी कपूर ही जोडी 'स्त्री' चा सिक्वेल असलेल्या 'रुही' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. या कॉमेडी-हॉरर चित्रपटात जान्हवी कपूर ग्लॅमरस अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता अहेत.
'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया-रणबीर
आलिया भट्ट सांगते की ती चित्रपटात देखील नव्हती, तेव्हापासून रणबीर कपूरचीही फॅन आहे. आता हे दोघे 'ब्रह्मास्त्र' मध्ये एकत्र काम करत आहेत, त्यामुळे प्रेक्षकही ही जोडी ऑनस्क्रीन पाहण्यास उत्सुक आहेत. जॅकलिन फर्नांडिज आणि रणवीर सिंगची जोडीही पहिल्यांदाच एकत्र ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट शेक्सपियरच्या 'कॉमेडी ऑफ एरर'वर आधारित आहे. फरहान अख्तर बॉक्सिंगवर आधारित 'तुफान' चित्रपटात दिसणार आहे, यात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर असणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. यावर्षी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी लव रंजनच्या एका अनामिक चित्रपटात दिसणार आहे. कार्तिक आर्यन आणि जाह्नवी कपूर 'दोस्ताना 2' मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांनी केली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डीच्या 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर याची जोडी परिणीती चोप्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी 'शेरशाह'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले असून चित्रपटाचे सह-निर्माता करण जोहर आहेत. जुलै 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
आयुष्मान खुरानाची जोडी ‘डॉक्टर जी’ मध्ये रकुल प्रीत सोबत दिसणार आहे. अनुभूती कश्यप दिग्दर्शित हा हलका-फुलका रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. 'पति पत्नी और वो' मध्ये अभिनय दाखवल्यानंतर अनन्या पांडे पुन्हा एकदा 'लायगर' चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात ती विजय देवरकोंडाच्या अपॉझिट आहे. पुरी जगन्नाथ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. अनन्या पांडे हिचा हा चित्रपट सप्टेंबर 2021 मध्ये रिलीज होईल. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन पहिल्यांदाच 'युधरा' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा रवी उदयवार दिग्दर्शित रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे.
2021 मध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये ही जोडपी धमाल करणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व जोडप्यांनी यापूर्वी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. यामुळे ही नवोदित जोडपी काय धमाल करणार हे लवकरच कळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment