Wednesday, May 5, 2021

ओटीटीवर बोल्ड सिरीजचा भडिमार


ओटीटीवर दाखविल्या जाणाऱ्या वेब सीरियल्समध्ये हिंसाचार, अश्लीलता आणि अभद्र भाषाचा आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने ओटीटीला नियमांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु नियमांचा हा लगाम निरर्थक ठरत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, निर्माते असे विषय हाताळत आहेत, जे सामाजिक स्तरावर उपेक्षित केले गेले आहेत. आहेत.  उदाहरणार्थ, आजकाल गे, लेस्बियन या समलैंगिक संबंधांवर आधारितसारख्या वेब सीरिजचा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर एकप्रकारचा पूरच आला आहे.  क्वचितच असा  ओटीटी प्लॅटफॉर्म असेल,ज्याने असे बोल्ड विषय हाताळले नसतील. 

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर समलैंगिक संबंधांवर आधारित विषयांचा भडिमार होत असल्याचे दिसत आहे. परंतु, असे विषय असलेले चित्रपट किंवा वेबसिरीज न आवडणाऱ्या प्रेक्षकांचाही एक वर्ग आहे. जवळपास 25 वर्षांपूर्वी, जेव्हा नंदिता दास आणि शबाना आझमी यांचा 'फायर' नावाचा समलैंगिक संबंधावर आधारित असलेला चित्रपट आला तेव्हा  देशात खळबळ उडाली होती.  परंतु आज असे विषय ओटीटीवर अंधाधुंदपणे दाखवले आणि पसंद केले जात आहेत.  समलैंगिक संबंधांवरील बर्‍याच वेब सिरीज महिला निर्मात्यांनी बनवल्या आहेत.  दीपा मेहता असो, एकता कपूर किंवा झोया अख्तर.

ओटीटी व्यासपीठावर वाढता हिंसाचार आणि अश्लीलता पाहूनच केंद्र सरकारने काही नियम जाहीर केले होते.  प्रेक्षकांच्या वयाप्रमाणे कार्यक्रम दर्शविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण नियम निरर्थक वाटत असल्यासारखी परिस्थिती दिसत आहे तर  दुसरीकडे नियमांवर अंकुश असूनही निर्माते बेलगाम झाले आहेत.  ओटीटी व्यासपीठावर सरकारच्या नियमांचे उल्लंघन करीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड विषयांचा अक्षरशः पूर आला आहे. 

यांपैकी अल्ट बालाजीच्या 'द मॅरीड वूमन' वेबसिरीजची बरीच चर्चा आहे.  एकमेकांकडे आकर्षित झालेल्या दोन स्त्रियांची ही कथा आहे.  एकता कपूरची 'हिज स्टोरी' समलैंगिक संबंधांवरच आहे.  नीरज धवनची 'गिली पुच्ची' नेटफ्लिक्सवर दाखवली जात आहे.  व्हीआरवन बॅनरच्या 'लव्ह मुबारक' ची दोन समलिंगी माणसांची कहाणी आहे.  'अजीब दस्तान है' ही दोन महिलांच्या प्रेम प्रकरणांची कथा असून ती वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडली गेली आहे.

 जोया अख्तरच्या ‘मेड इन हैवन’ वेब सिरीजमध्ये दोन वेडिंग प्लानर एक दुसऱ्याच्या प्रेमात पडतात पण नंतर मुलीला कळते की तिचा प्रेमी 'गे' आहे.  वेब सीरीज ‘रोमिल एंड जुगल’ मध्ये दोन पुरुषांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. ‘फोर मोर शार्ट्स’ मध्ये चार मुलींची कथा आहे. यात एक लेस्बियन जिम ट्रेनर आहे. दूसरी वकील, तिसरी पत्रकार आणि चौथी बेरोजगार आहे. चौघी मैत्रिणी आहेत आणि आयुष्य आपल्या मनासारखं जगू इच्छितात.  त्या समलैंगिकतेला चुकीचं मानत नाहीत.  ‘अदर लव स्टोरी’ हीसुद्धा दोन मुलींचीच कथा आहे.

 समलैंगिकतेच्या बाजूने कायदा असला तरी कायदा या संबंधांना भारतीय समाजात मान्यता नाही. अशा नात्यांना समाज तुच्छतेणे पाहतो. इतर क्षेत्रांप्रमाणे ग्लॅमरच्या जगात म्हणजेच बॉलिवूडमध्ये देखील समलिंगी आहेत, परंतु त्यांचे संबंध उघडपणे स्वीकारण्यास तयार होत नाहीत.  याउलट, हॉलिवूडमधील बरेच तारे समलिंगी आहेत आणि ते स्वीकारण्यात अजिबात संकोच करत नाहीत.  सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये असे म्हटले आहे की दोन प्रौढ लोक त्यांच्या जीवनाचे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार घेऊ शकतात.  कायदेशीर मान्यता असूनही भारतीय समाजाची स्वतःची एक मान्यता आहे.  त्यांचा असा विश्वास आहे की दोन विषम लिंगीमधील आकर्षण नैसर्गिक आहे, तर समान लिंगीमधील आकर्षण नैतिक नाही.

प्रेक्षकांवर सामाजिक अस्वीकृत विषयांची भुरळ घालण्यास बॉलिवूड निर्माते एका पायावर तयार असतात.  म्हणूनच चित्रपटांमध्ये समलैंगिक संबंधांनाही कथेचा विषय बनविण्यात आला होता. 'गर्लफ्रेंड', 'अलिगढ', 'माय ब्रदर निखिल', 'कपूर अँड सन्स', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'शुभ मंगलऔर ज्यादा सावधान' ' असे चित्रपट आहेत ज्यात समलैंगिक संबंधांना स्थान देण्यात आले होते.  2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'आयएम' चार कथांनी बनला होता. यातील एक कथा 'गे' नात्यांवर आधारित होती.या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात राहुल बोस ने प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये समलैंगिकतेवर कॅमेरा चालवला जात असला तरी निर्माते अशा बोल्ड विषयांना मोठ्या प्रमाणात सिनेमा निर्माण करताना दिसत नाहीत. समाजातील एक वर्ग असे विषय पसंद करतो तर दुसरे कडाडून विरोध करतात.


1 comment:

  1. हे' आहेत समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपट
    भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतं आहे. भारतात याआधी जरी समलैंगिक संबध हा गुन्हा मानला जात असला तरी बॉलिवूडमधील काही चित्रपटांत या मुद्द्यावर बिनधास्त भाष्य केलं आहे. बघूयात कोणते आहेत ते चित्रपट...
    कपूर अँड सन्स
    आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'कपूर अँड सन्स' चित्रपटात फवाद खान हा समलैंगिक दाखवला आहे. फवाद खानचं अस्तित्व घरच्यांसमोर आल्यानंतर ते त्याला कसं स्वीकारतात. याची कहाणी चित्रपटात आहे.
    अलीगढ
    २०१५मध्ये प्रदर्शित झालेला 'अलिगढ' चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. प्रोफेसर फक्त गे आहे, या कारणावरून त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात येतं आणि पुढे विद्यापीठ विरुद्ध प्रोफेसर यांचा कायदेशीर लढा चित्रपटात दाखवला आहे.
    गर्लफ्रेंड
    २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अनेक वादांना सामोर जावं लागलं होतं. चित्रपटात लेस्बियन संबंधावर प्रकाश टाकण्यात आला होता.
    फायर
    १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फायर' चित्रपटात दोन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. एकाच घरातील दोन सूना आणि त्यांच्यांतील संबंध याची कहाणी या चित्रपटात आहे. शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
     

    ReplyDelete

२०२३ बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले, बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ११ हजार कोटींची जबरदस्त कमाई

कोरोना काळात उद्ध्वस्त होत आलेला बॉलिवूड आता चांगलाच सावरला आहे. २०२३ हे वर्ष तर बॉलीवूडसाठी  ब्लॉकबस्टर साबित झाले आहे. विशेष म्हणजे चित्रप...